Virat Kohli And Shami
Virat Kohli And Shami Sakal
क्रिकेट वर्ल्ड कप

जिंकूनही असमाधानी! पाक पत्रकारानं पेटवलं धर्मयुद्ध

सुशांत जाधव

भारत-पाकिस्तान यांच्यातील हायहोल्टेज सामन्याचा निकालाची क्रिकेट वर्तुळात जोरदार चर्चा सुरु आहे. 29 वर्षानंतर भारताविरुद्ध पाकिस्तानचा संघ अखेर जिंकला. या विजयाचे सेलिब्रेशन करत असतानाही पाकिस्तानी लोकांच्या मनातील द्वेषाची भावना काही कमी झालेली नाही. जिंकूनही काही पाकिस्तानी असमाधानी असल्याचे चित्र समोर येत आहे. पाकिस्तानमधील पत्रकार मुबाशेर लुकमान (Mubasher Lucman) याने भारतीय संघात नाक खूपसत अजब तर्क काढून धार्मिक वाद पेटवण्याचे काम केले आहे.

या पत्रकाराने आपल्या युट्युब चॅनेलवरील कार्यक्रमातून भारतीय संघाटचा कर्णधार विराट कोहलीवर गंभीर आरोप केले आहेत. मोहम्मद शमी मुस्लीम असल्याने कोहलीने पाक विरुद्ध त्याला बळीचा बकरा बनवले असा अजब-गजब दावा या पत्रकाराने केला आहे. रविवारी दुबईच्या मैदानात रंगलेल्या सामन्यात पाकिस्तान संघाने भारतीय संघाला 10 विकेट्सने पराभूत केले होते.

मुबाशेर लुकमान (Mubasher Lucman) याने 9 मिनिट 24 सेकंदाच्या व्हिडिओत अकलेचे तारे तोडून फुकाचा वाद निर्माण केलाय. सामन्यावेळी समालोचन करणारे महत्त्वाच्या क्षणी कोहलीने शमीच्या हाती चेंडू सोपवल्याचे सांगत होते. विराट कोहलीनं असं का केलं, असा विचार माझ्या मनात मॅच पाहताना आला. गोलंदाजीचे अन्य पर्याय उपलब्ध असताना कोहलीने त्याची निवड केली. मुस्लीम असल्यामुळेच कोहलीने असे केले. एवढेच नाही तर टीम इंडियाला या महाशयांनी मोदींची टीम अशी उपमाही दिली. यापूर्वी पाकिस्तानचे गृह मंत्री शेख राशिद अहमद यांनी अनोखा दावा केला होता. भारता विरुद्ध पाकिस्तान संघाने मिळवलेला विजय हा जगातील सर्व मुस्लीमांचा विजय आहे, असे वक्तव्य त्यांनी केले होते.

पाकिस्तान विरुद्धच्या पराभवानंतर सोशल मीडियावर मोहम्मद शमीला ट्रोल करण्यात आले. विराट कोहली शिवाय अन्य खेळाडूंनाही निशाणा करण्यात आले. मात्र काहींनी केवळ मोहम्मद शमीचा विषय उचलून धरत भारत-पाक सामन्याला धार्मिक रंग देण्याचा प्रकार केल्याचे दिसते. भारतीय संघाच्या पराभवानंतर शमीला टार्गेट करणं चुकीच आहे, असे खासदार असदुद्दीन ओवैसी यांनीही म्हटले आहे. त्यांनी शमीला पाठिंबा देत नेटकऱ्यांना संतप्त सवालही केलाय.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gulabrao Patil: भाजपवाल्यांनी काम केलं नाही तर आम्ही... गुलाबराव पाटलांच्या वक्तव्यामुळे BJP कार्यकर्त्यांमधे संभ्रम

Bajrang Punia Suspended : बजरंग पुनियाचे स्वप्न भंगले... डोपिंग टेस्ट न केल्याने निलंबित

Summer Fashion Tips : उन्हाळ्यात कूल आणि स्टायलिश दिसायचंय? मग, अशा प्रकारच्या कलर पॅटर्न्सची करा निवड

Raju Shetti in Hatkanangale: 'राजकारणात यायचं म्हणजे गेंड्याची कातडी लागते'; राजकारण की चळवळ, राजू शेट्टींची कशाला पसंती?

Latest Marathi News Live Update : नसीम खान असणार काँग्रेसचे स्टार प्रचारक

SCROLL FOR NEXT