क्रिकेट वर्ल्ड कप

IND vs NZ : दिवाळीआधी टीम इंडियाचा शिमगा!

सुशांत जाधव

T20 World Cup 2021 India vs New Zealand : आयसीसी स्पर्धेतील आपला विजयी रुबाब कायम ठेवत न्यूझीलंडने टीम इंडियाला पराभवाचा धक्का दिला. या पराभवामुळे टीम इंडियासाठी सेमी फायनलचे दरवाजे जवळपास बंद झाले आहेत. टॉस जिंकून केन विल्यमसनने पहिल्यांदा गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. त्याचा हा निर्णय गोलंदाजांनी सार्थ ठरवला. टीम इंडियाला त्यांनी अवघ्या 110 धावांवर रोखले. या धावांचा पाठलाग करण्यासाठी डॅरेल मिशेल आणि मार्टिन गप्टिल या जोडीनं न्यूझीलंडच्या डावाची सुरुवात केली. धावफलकावर अवघ्या 24 धावा असताना गप्टिलच्या रुपात न्यूझीलंडला पहिला धक्का बसला. बुमराहने त्याला 20 धावांवर बाद केले.

पहिली विकेट गमावल्यानंतर मिशेलने कर्णधार केन विल्यमसनच्या साथीने संघाच्या डावाला आकार दिला. या दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी 62 धावांची भागीदारी केली. बुमराहने अर्धशतकाच्या उंबरठ्यावर डॅरेल मिशेलला बाद केले. केन विल्यमसनने 31 चेंडूत नाबाद 33 आणि कॉन्वेन नाबाद 2 धावा करत संघाला 8 विकेट्सनी विजय मिळवून दिला. या विजयासह न्यूझीलंडनं स्पर्धेत सेमीफायनल खेळण्याची आपली दावेदारी भक्कम केली आहे.

2003 च्या वनडे वर्ल्ड कप स्पर्धेत भारतीय संघाने फायनलपर्यंत मजल मारली होती. यावेळी सौरव गांगुलीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने न्यूझीलंडला पराभूत केले होते. त्यानंतर आतापर्यंत आयसीसीच्या स्पर्धेत भारतीय संघ न्यूझीलंडला पराभूत करु शकलेला नाही. इंग्लंडमध्ये रंगलेली वनडे वर्ल्ड कप स्पर्धेत न्यूझीलंड संघानेच सेमीफायनलमध्ये भारताचा खेळ खल्लास केला होता. त्यानंतर भारत आणि न्यूझीलंड यांच्यातच वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची फायनल रंगली होती. यावेळीही टीम इंडिया पराभूत झाली होती. आयसीसी स्पर्धेतील आपला दबदबा कायम राखत न्यूझीलंडने भारताला आणखी एक दणका दिला आहे.

सलामीच्या लढतीत भारत-न्यूझीलंड दोन्ही संघाला पाकिस्तानने पराभूत केले होते. पाकिस्तानने भारतीय संघाला एकतर्फी मात दिली होती. दुसरीकडे न्यूझीलंडने पाकिस्तानला कडवी झुंज दिली होती. त्याचा कुठेतरी न्यूझीलंड संघाल टीम इंडियाविरुद्धच्या लढतीत फायदा झाला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Live Update : पदवीधर व शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुका जाहीर; चार आमदारांचा कार्यकाळ ७ जुलैला संपणार

Game Of Thrones : 'गेम ऑफ थ्रोन्स' मधील 'या' कलाकाराचं निधन; "त्यांच्याशिवाय जगणं मुश्किल.." पार्टनरची पोस्ट चर्चेत

Sushma Andhare : मुख्यमंत्र्यांच्या विरोधात अंधारे करणार तक्रार; प्रचार सभेतील भाषणावर घेतला आक्षेप

Google Wallet: गुगल वॉलेट भारतात लाँच; Google Payपेक्षा कसे आहे वेगळे, करता येणार 'ही' महत्त्वाची कामे

IPL 2024 Points Table: 16 पाँइंट्स अन् केवळ तीनच पराभव, तरी कोलकाता-राजस्थानला अद्यापही का मिळालं नाही प्लेऑफचं तिकीट?

SCROLL FOR NEXT