Team India Sakal
क्रिकेट वर्ल्ड कप

T20 WC : जर असं घडलं तर टीम इंडिया सेमी फायनल खेळू शकते

न्यूझीलंड विरुद्धच्या पराभवानंतरही सेमी फायनलमध्ये धडक मारण्याची टीम इंडियाला संधी, पण....

सुशांत जाधव

T20 World Cup 2021 : टी-20 वर्ल्ड कप स्पर्धेतील सुपर 12 मधील दुसऱ्या गटात भारतीय संघाला सलग दुसऱ्या पराभवाचा सामना करावा लागला. न्यूझीलंड विरुद्धच्या पराभवामुळे यजमान भारतीय संघासमोरील सेमी फायलची वाट मुश्किल झाली आहे. टीम इंडिया न्यूझीलंड विरुद्ध पराभूत झाली असली तरी तार्किकदृष्ट्या सेमी फायनलमध्ये धडक मारण्याची त्यांची आशा अजूनही कायम आहे. यासाठी उर्वरित स्पर्धेत मोठी उलटफेर व्हायला हवी. भारतीय संघाचे उर्वरित सामने हे नामिबिया, अफगाणिस्तान आणि स्कॉटलंड या संघाविरुद्ध होणार आहेत. हे सर्व सामने जिंकले तर टीम इंडियाच्या खात्यात 6 गुण जमा होतील.

टीम इंडिया ज्या संघांविरुद्ध खेळणार आहे त्याच संघाविरुद्ध न्यूझीलंडही भिडणार आहे. जर न्यूझीलंडच्या संघाने उर्वरित सामन्यातील अफगाणिस्तान विरुद्धचा सामना गमावला तर दुसऱ्या गटात ट्विस्ट निर्माण होईल. दुसरीकडे भारतीय संघाने अफगाणिस्तानला नमवले आणि त्यांनी न्यूझीलंडसह इतर सामने जिंकले तर भारत-न्यूझीलंड आणि अफगाणिस्तान यांच्या खात्यात प्रत्येकी 6 गुण जमा होतील. ज्या संघाचे नेट रनरेट उत्तम असेल तो संघ सेमीफायनलसाठी पात्र ठरेल.

भारतीय संघ 3 नोव्हेंबरला अफगाणिस्तान विरुद्ध भिडणार आहे. या सामन्यात मोठ्या फरकाने विजय मिळवणे टीम इंडियासाठी गरजेचे असेल. त्यानंतर त्यांना 7 नोव्हेंबरला न्यूझीलंड आणि अफगाणिस्तान यांच्यातील सामन्याच्या निकालावर अवलंबून रहावे लागेल. जर अफगाणिस्तान जिंकले तर भारतीय संघाच्या स्पर्धेतील आशा पल्लवित होती. अफगाणिस्तानने आश्चर्यकारकरित्या भारत-न्यूझीलंड दोन्ही संघाने पराभवाचा धक्का दिला तर तेही सेमीफायलसाठी पात्र ठरु शकतात.

गुणतालिकेतील सध्याची स्थिती

सुपर 12 मधील दुसऱ्या गटात पाकिस्तानचा संघ तीन पैकी तीन सामन्यातील विजयासह 6 गुण मिळवून अव्वलस्थानी आहे. त्यांच्या उर्वरित लढती या नामिबिया आणि स्कॉटलंड विरुद्ध आहेत. त्यामुळे त्यांच्या स्थान जवळपास निश्चित मानले जाते. या गटात दुसऱ्या क्रमांकावर अफगाणिस्तानचा संघ आहे. अफगाणिस्तानने दोन सामने खेळले आहेत. यात स्कॉटलंड विरुद्ध त्यांनी विजय नोंदवला असून पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यात त्यांना पराभव स्विकारावा लागला होता. त्यांच्या खात्यात दोन गुण आहेत. अफगाणिस्तान पाठोपाठ आता न्यूझीलंडचा संघ दोन सामन्यातील एका विजयासह 2 गुण मिळवून तिसऱ्या स्थानावर आहे. नामिबियानेही दोन पैकी एक सामना जिंकत दोन गुण मिळवले असून ते चौथ्या आणि भारतीय संघ 2 पैकी 2 पराभवासह पाचव्या स्थानावर आहे. भारतासह स्काटलंडचा संघ पहिल्या विजयाच्या प्रतिक्षेत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Flood : पुणे शहरात पुरामुळे पंधराशे नागरिकांना हलविले; मुळामुठा नदीत ८५ हजार क्यूसेस पाणी सोडले

Indian Railways Special Trains: मोठी बातमी! दिवाळी-छठ दरम्यान रेल्वे तब्बल १२ हजारांहून अधिक विशेष गाड्या चालवणार

ICC ODI Rankings: केशव महाराज झाला नंबर वन बॉलर! पण बुमराहचं नाव झालं गायब? चर्चेला उधाण

MLA Prakash Solanke : मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला प्रकाश सोळंके यांचा पाठिंबा; सोशल मीडियावर 'मी येतोय तुम्ही या'चे आवाहन

पोलिस भरतीचे वेळापत्रक ठरलं! राज्यात १५,६३१ पोलिसांची भरती; वयोमर्यादा संपलेल्या ‘या’ उमेदवारांना एक संधी; अर्जासाठी ४५० ते ३५० रुपये शुल्क

SCROLL FOR NEXT