Team India Sakal
क्रिकेट वर्ल्ड कप

T20 World Cup 2024: भारत-आयर्लंड न्युयॉर्कमध्ये येणार आमने-सामने; कधी अन् कसा पाहाणार सामना, जाणून घ्या एका क्लिकवर

India vs Ireland: टी20 वर्ल्ड कप 2024 मधील भारत आणि आयर्लंड यांच्यातील सामना बुधवारी रंगणार आहे.

Pranali Kodre

T20 World Cup 2024, India vs Ireland: भारतीय संघ सध्या अमेरिका येथे असून टी20 वर्ल्ड कप 2024 स्पर्धेची तयारी करत आहे. या स्पर्धेतील भारताचा पहिला सामना आयर्लंड विरुद्ध बुधवारी रंगणार आहे.

या सामन्यासह भारत आणि आयर्लंड हे दोन्ही संघ टी20 वर्ल्ड कप 2024 स्पर्धेतील आपल्या मोहिमेची सुरुवात करणार आहे. दरम्यान हा या स्पर्धेतील एकूण आठवा सामना असणार आहे.

भारताने हा सामना खेळण्याआधी सराव सामन्यात बांगलादेशविरुद्ध 60 धावांनी विजय मिळवला होता. तसेच आयर्लंडला मात्र सराव सामन्यात श्रीलंकेविरुद्ध 41 धावांनी पराभूत व्हावे लागले होते. दरम्यान आता भारत आणि आयर्लंड यांच्यातील सामना कधी, कुठे आणि कसा लाईव्ह पाहता येईल हे जाणून घेऊया.

भारत आणि आयर्लंड यांच्यातील सामना कधी आणि कुठे खेळवला जाणार?

भारत आणि आयर्लंड यांच्यातील सामना 5 जून रोजी न्यूयॉर्कमधील नासाऊ काउंटी इंटरनॅशनल स्टेडियमवर खेळवण्यात येणार आहे.

भारत आणि आयर्लंड यांच्यातील सामना किती वाजता सुरु होणार?

भारत आणि आयर्लंड यांच्यातील सामना भारतीय प्रमाणवेळेनुसार रात्री 8 वाजता सुरु होणार असून त्यापूर्वी 7.30 वाजता नाणेफेक होईल.

भारत आणि आयर्लंड यांच्यातील सामन्याचे लाईव्ह प्रक्षेपण टीव्हीवर आणि ऑनलाईन कसे पाहाता येईल?

भारत आणि आयर्लंड यांच्यातील सामन्याचे टीव्हीवर स्टार स्पोर्ट्स नेटवर्कच्या चॅनेलवर लाईव्ह प्रक्षेपण पाहाता येणार आहे. त्याचबरोबर डिज्नी प्लस हॉटस्टार या ऍप किंवा वेबसाईटवरही हा सामना लाईव्ह पाहाता येणार आहे.

दोन्ही संघ

  • भारत - रोहित शर्मा, यशस्वी जैस्वाल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), संजू सॅमसन (यष्टीरक्षक), हार्दिक पांड्या (उपकर्णधार), शिवम दुबे, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, युजवेंद्र चहल, अर्शदीप सिंग, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज.

    • राखीव खेळाडू : शुभमन गिल, रिंकू सिंग, खलील अहमद, आवेश खान

  • आयर्लंड - पॉल स्टर्लिंग (कर्णधार), मार्क एडेर, रॉस एडेर, अँड्र्यू बालबर्नी, कर्टिस कॅम्फर, गॅरेथ डेलेनी, जॉर्ज डॉकरेल, ग्रॅहम ह्यूम, जोश लिटल, बॅरी मॅककार्थी, नील रॉक, हॅरी टेक्टर, लॉर्कन टकर, बेन व्हाइट, क्रेग यंग

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT