T20 World Cup 2024 Ind vs Pak Pitch  sakal
क्रिकेट वर्ल्ड कप

Ind vs Pak मॅचच्या पिचबाबत मोठी अपडेट! वापरलेल्या 'या' खेळपट्टीवर होणार सामना; 100 पेक्षा कमी असेल स्कोअर?

T20 World Cup 2024 India vs Pakistan Pitch Report New York News : टी-20 वर्ल्ड कप 2024 चा हाय व्होल्टेज सामना आज रात्री 8 वाजता भारत आणि पाकिस्तान यांच्यात खेळला जाणार आहे. दोन्ही संघांची तयारी जवळपास पूर्ण झाली आहे.

Kiran Mahanavar

T20 World Cup 2024 Ind vs Pak Pitch Report : टी-20 वर्ल्ड कप 2024 चा हाय व्होल्टेज सामना आज रात्री 8 वाजता भारत आणि पाकिस्तान यांच्यात खेळला जाणार आहे. दोन्ही संघांची तयारी जवळपास पूर्ण झाली आहे. मात्र, सामन्यादरम्यान वापरल्या जाणाऱ्या खेळपट्टीबाबत मोठी माहिती समोर आली आहे.

भारत-पाकिस्तान सामना हा वापरलेल्या खेळपट्टीवर खेळला जाणार आहे. या खेळपट्टीवर नेदरलँड आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात स्पर्धेतील 16 वा सामना खेळला गेला होता.

प्रथम फलंदाजी करताना नेदरलँड्सने केवळ 103/9 धावा केल्या, ज्याच्या प्रत्युत्तरात दक्षिण आफ्रिकेने पहिल्या 4 विकेट केवळ 12 धावांत गमावल्या होत्या. मात्र डेव्हिड मिलरने एकट्याने किल्ला लढवला आणि संघाला विजय मिळवून दिला. आता अशी अटकळ बांधली जात आहे की, जर टीम इंडिया आणि पाकिस्तान संघ त्या खेळपट्टीवर खेळला तर स्कोअर 100 पेक्षा कमी होऊ शकतो.

नासाऊ काउंटी इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियमचे तात्पुरते बांधकाम गेल्या ३ महिन्यांत करण्यात आले आहे. ऑस्ट्रेलियातील ॲडलेड शहरातून बनवलेली खेळपट्टी या मैदानावर वापरण्यात येत आहेत. मात्र, या खेळपट्ट्यांवर आतापर्यंत खेळलेल्या सर्वच संघांचे फलंदाज संघर्ष करताना दिसले. या स्पर्धेतील पहिला सामना दक्षिण आफ्रिका आणि श्रीलंका यांच्यात झाला. प्रथम फलंदाजी करताना दक्षिण आफ्रिकेने 17व्या षटकात लक्ष्याचा पाठलाग करताना श्रीलंकेचा डाव केवळ 77 धावांत गुंडाळला.

भारत आणि आयर्लंड यांच्यात खेळल्या गेलेल्या दुसऱ्या सामन्यात आयरिश संघ केवळ 96 धावांवर गारद झाला आणि टीम इंडियाने 13व्या षटकात लक्ष्य गाठले. न्यूयॉर्कच्या मैदानाच्या खेळपट्टीवर 100 पेक्षा जास्त धावा करणारा कॅनडा पहिला संघ ठरला. कॅनडाने आयर्लंडविरुद्ध 137 धावा केल्या, प्रत्युत्तरात आयरिश संघ केवळ 125 धावा करू शकला.

तर चौथा सामना दक्षिण आफ्रिका आणि नेदरलँड्स यांच्यात खेळला गेला, ज्यामध्ये नेदरलँड्स संघ दक्षिण आफ्रिकेसमोर केवळ 104 धावांचे लक्ष्य ठेवू शकला. या लक्ष्याला प्रत्युत्तर देताना एके काळी दक्षिण आफ्रिका संघ सुधा हातबल दिसला, 10 षटकांत 4 बाद 32 धावा अशी अवस्था त्यांची झाली होती. परंतु नंतर डेव्हिड मिलरच्या शानदार अर्धशतकामुळे संघाने 19व्या षटकात विजय मिळवला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Auction Live : राजस्थानमधील १९ वर्षीय पोराच्या डोक्यावर CSK ने ठेवला हात! मोजले तब्बल १४ कोटी; Who is Kartik Sharma?

द फॅमिली मॅन फेम अभिनेत्याची ड्रग तस्करी प्रकरणात तुरुंगात रवानगी; फिल्म इंडस्ट्रीतील ओळखीचा करत होता गैरवापर

Paithan News : केकत जळगावमध्ये ग्रामस्थांची सतर्कता कामी आली; महावितरण तार चोरीचा प्रयत्न फसला!

Jalgaon News : थंडीचा कडाका अन् मेथीच्या लाडूंचा तडका! जळगावात घराघरांत दरवळला पारंपरिक स्वाद

IPL 2026 Auction: CSK ने प्रशांत वीरवर १४ कोटी का लावले? २० वर्षीय खेळाडूकडे असं काय आहे खास? वाचाल तर खूश व्हाल

SCROLL FOR NEXT