Babar Azam and Mohammad Rizwan Sakal
क्रिकेट वर्ल्ड कप

IND vs PAK : धमाकेदार विजयानंतर बाबर म्हणाला, हा फक्त ट्रेलर!

स्पर्धा गाजवायला सज्ज असल्याचे संकेत पाकिस्तान संघाचा कर्णधार बाबर आझमने विजयानंतर दिले.

सुशांत जाधव

T20 World Cup 2021, India vs Pakistan : बाबर आझमच्या नेतृत्वाखालील पाकिस्तान संघाने टी-20 वर्ल्ड कप स्पर्धेत नव्या अध्यायाला सुरुवात केली. वर्ल्ड कपच्या इतिहासात आतापर्यंत जी गोष्ट झाली नाही ती त्यांनी करुन दाखवली. दुबईच्या मैदानात रंगलेल्या हायहोल्टेज सामन्यात पाकिस्तानने टीम इंडियाची बत्तीगूल करुन 10 विकेट्सनी विजय नोंदवला. टी-20 वर्ल्ड कप स्पर्धेतील दुसऱ्या गटातील पहिल्या सामन्यात मोठ्या फरकाने विजय मिळवल्याने पाकिस्तान संघाचा आत्मविश्वास गगनाला भिडला नाही तर नवलंच ठरेल. ही फक्त सुरुवात आहे, असे सांगत स्पर्धा गाजवायला सज्ज असल्याचे संकेत पाकिस्तान संघाचा कर्णधार बाबर आझमने विजयानंतर दिले.

सुपर 12 मधील ग्रुप 2 मधील धमाकेदार विजयानंतर बाबरने विजयाचे श्रेय गोलंदाजांना दिले. तो म्हणाला की, गोलंदाजांनी सुरुवातीला मिळवलेल्या विकेटमुळे सामन्यावर पकड निर्माण करणे सहज सोपे झाले. शाहीन आफ्रिदीने घेतलेल्या सुरुवातीच्या दोन विकेट्स संघाला आत्मविश्वास देणाऱ्या होत्या. त्यानंतर फिरकीपटूंनी आपली जबाबदारी चोख बजावली.

बाबर आझमने नाणेफेक जिंकून पहिल्यांदा गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. पाकिस्तानी गोलंदाजांनी कर्णधाराचा निर्णय सार्थ ठरवत टीम इंडियाला सुरुवातीलाच धक्के दिले. भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीने अर्धशतकी खेळी करत टीम इंडियाच्या धावफलकावर समाधानकारक धावसंख्या उभारली. पण त्यांनी उभारलेली 152 धावांचे टार्गेट पाकिस्तानने सहज पार केले. बाबर आझम आणि रिझवानच्या नाबाद अर्धशतकाच्या जोरावर पाकिस्तानने टीम इंडिलाला 10 विकेट्स राखून पराभूत केले.

टीम इंडिया विरुद्धच्या धमाकेदार विजयामुळे पाकिस्तानने स्पर्धेतील दावेदारी भक्कम असल्याचे संकेतच दिले आहे. टीम इंडिया ही यंदाच्या टी-20 वर्ल्ड कप स्पर्धेतील प्रबळ दावेदारापैकी एक आहे. पाकिस्तानने त्यांना पहिल्याच सामन्यात पराभवाचा दणका देत ''हम भी किसी से कम नहीं" या अंदाजात स्पर्धेची सुरुवात केली आहे. युएईमध्ये रंगलेल्या टी-20 वर्ल्ड कप स्पर्धेचे यजमानपद टीम इंडियाकडे आहे. आयपीएलमधील टीम इंडियातील खेळाडूंचा सराव आणि युएईतील खेळपट्ट्या या भारतीय खेळपट्टीशी मिळत्या जुळत्या असल्यामुळे भारतीय संघ दबदबा दाखवून देईल असे मानले जात होते. वर्ल्ड कपचा थरार ज्या मैदानात रंगला आहे त्या खेळपट्ट्यांवर पाकिस्तान संघाला दांडगा अनुभव आहे. या अनुभवाकडे दुर्लक्ष करु नका, अस इशाराच पाकिस्तानने सलामीच्या लढतीत दिलाय.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

सचिनचा 'अजिंक्य' मानला जाणारा विक्रम मोडला जाणार? ECB चा मास्टरस्ट्रोक, Joe Root सोबत केला खास करार

Yavatmal News : शिंदेसेनेचा गड आला, पण सिंह गेला! मध्यवर्ती बँकेत शिंदेसेना ठरली युतीत ‘मोठा भाऊ’; काँग्रेसची सत्ता उलथवली, प्रतिष्ठेच्या लढतीत दिग्गजांना धक्के

Karmad News : पीएम धन-धान्य कृषी योजनेतील कामगिरीबद्दल जिल्ह्याचा दिल्लीत गौरव

Ramlila Maidan Protest: रामलीला मैदानाचं एका दिवसाचं भाडं 1 लाख 21 हजार रुपये; पण यावर्षी केवळ तीनच दिवस उपलब्ध

MPSC Student Agitation : आंदोलन थांबले, पण असंतोष कायम; ‘एमपीएससी’ अध्यक्षांच्या राजीनाम्याची मागणी अपूर्णच

SCROLL FOR NEXT