Ravi Shastri Sakal
क्रिकेट वर्ल्ड कप

मी मानसिकरित्या खचलोय अन् खेळाडू तर...

त्यांच्या मार्गदर्शनाखाली टीम इंडियाला आयसीसीची स्पर्धा जिंकण्यात अपयश आले.

सुशांत जाधव

भारतीय संघातील खेळाडू मागील 6 महिन्यांपासून बायोबबलमध्ये आहेत. मी स्वत: मानसिकरित्या कमकुवत झालो असून संघातील खेळाडू मानसिक आणि शारीरिकरित्या थकले आहेत. आयपीएल आणि टी-20 वर्ल्ड कप स्पर्धेत अंतर असायला पाहिजे, असे मत शास्त्री यांनी व्यक्त केले. स्टार स्पोर्ट्सच्या कार्यक्रमात त्यांनी टीम इंडियाच्या पराभवाचे खापर हे बायोबबलच्या वातावणावर फोडल्याचे पाहायला मिळाले.

माझ्या पाच वर्षांच्या कारकिर्दीत भारतीय संघाने सर्वोच्च कामगिरी करुन दाखवली आहे. ज्यावेळी मी टीम इंडियाच्या प्रशिक्षक पदाची जबाबदारी हाती घेतली त्यावेळी काही तरी वेगळ करुन दाखवण्याच्या इराद्याने टीमसोबत जोडलो गेलो. पाच वर्षांच्या कार्यकाळामध्ये टीम इंडियाने सर्वोत्तम कामगिरी करुन दाखवली आहे. क्रिकेटच्या इतिहासातील एक सर्वोत्तम संघ या काळात निर्माण झाला, अशा शब्दांत रवि शास्त्री यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

टी-20 वर्ल्ड कप स्पर्धेनंतर रवि शास्त्री यांचा प्रशिक्षक पदाचा कार्यकाळ पूर्ण होत आहे. नामिबिया विरुद्धचा सामना प्रशिक्षक म्हणून त्यांच्यासाठी शेवटचा असेल. या सामन्यापूर्वी रवि शास्त्री यांनी प्रसारमाध्यमाशी बोलताना टीम इंडियाच्या दिमाखदार कामगिरीचा साक्षी झाल्याचा आनंद व्यक्त केला.

2017 मध्ये अनिल कुंबळे यांनी तडकाफडकी राजीनामा दिल्यानंतर रवि शास्त्री यांनी भारतीय संघाच्या प्रशिक्षकपदाची जबाबादारी स्विकारली होती. त्यांच्या मार्गदर्शनाखालील 43 कसोटी सामन्यात भारतीय संघाने 25 सामने जिंकले आहेत. वनडेत 72 पैकी 51 आणि टी-20 मध्ये 64 पैकी 42 सामन्यात संघाने यश मिळवले आहे. भारतीय संघाचे हे यश निश्चितच कौतुकास्पद आहे.

पण या यशासोबतच एक ठपकाही शास्त्रींच्या कोचिंगवर लागला. त्यांच्या मार्गदर्शनाखाली टीम इंडियाला आयसीसीची स्पर्धा जिंकण्यात अपयश आले. 2019 मध्ये इंग्लंडमध्ये झालेल्या वन डे वर्ल्ड कपमध्ये न्यूझीलंडने सेमीफायनलमध्ये टीम इंडियाचा प्रवास संपुष्टात आणला. त्यानंतर आयसीसी टेस्ट चॅम्पियनशिपची पहिली वहिली ट्रॉफी जिंकण्याची संधीही टीम इंडियाने गमावली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kolhapur : शेतकऱ्यानं म्हशी घ्यायला ७ लाख साठवले, सहावीत शिकणाऱ्या लेकानं गेमवर ५ लाख उडवले; बँक स्टेटमेंट बघून बसला धक्का

Weekly Astrology 7 to 13 July 2025: या आठवड्यात कोणत्या राशींना होणार आर्थिक लाभ अन् नोकरी व्यवसायत मिळेल उत्तम संधी, वाचा साप्ताहिक राशिभविष्य

Latest Maharashtra News Updates : मुंबईत वाहतूक ठप्प! मोनो रेल सेवा बंद, मेट्रोमध्ये तांत्रिक बिघाडाने प्रवाशांचे हाल

Global Club Championship: पाकिस्तानला डावलण्याची शक्यता; जागतिक क्लब अजिंक्यपद स्पर्धा : पाच संघांचा सहभाग

CA Result Success Story: रोज आठ ते दहा अभ्यासात जीव ओतून जिद्द व चिकाटीच्या जोरावर गेवराईच्या पृथ्वीराजचे 'सीए'परीक्षेत यश

SCROLL FOR NEXT