Rohit Sharma And Virat Kohli Sakal
क्रिकेट वर्ल्ड कप

पुढचा कॅप्टन रोहितच; खुद्द कोहलीनं दिले संकेत

कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने आतापर्यंत एकही आयसीसी स्पर्धा जिंकलेली नाही.

सुशांत जाधव

भारत आणि नामिबिया यांच्यातील सामन्यानंतर भारतीय टी-20 संघाला नवा कर्णधार मिळणार आहे. पुढचा कॅप्टन कोण? अशी चर्चा रंगत असताना खुद्द किंग कोहलीने रोहित शर्माच्या खांदयावर नेतृत्वाची धूरा पडणार असल्याचे संकेत दिले. T20 मध्ये अखेरच्या सामन्यात कॅप्टन्सी करताना कोहलीने नामिबिया विरुद्ध टॉस जिंकला. टॉसनंतर त्याने भारतीय संघाच्या नव्या कर्णधारासंदर्भात मोठा इशारा दिला.

टॉसनंतर विराट कोहली म्हणाला की, भारतीय संघाचे नेतृत्व करणे ही सन्मानाची गोष्ट आहे. संघाचे नेतृत्व करताना सर्वोत्तम देण्याचा प्रयत्न केला. कॅप्टन्सी करण्याची संधी दिल्याबद्दल आभारी आहे. टीमला पुढे घेऊन जाण्यासाठी बदलाची गरज आहे. रोहित इथे आहे तो बऱ्याच काळापासून संघासोबत आहे. भारतीय क्रिकेट चांगल्या हातामध्ये आहे, असे सांगत कोहलीने रोहित शर्माच पुढचा कॅप्टन असल्याचे संकेत दिले. विराट कोहलीसाठी हा 50 वा टी-20 सामना असून कॅप्टन्सीमध्ये त्याचा शेवटचा सामना आहे.

भारत आणि नामिबाया दोन्ही संघांसाठी सेमी फायनलचे दरवाजे बंद झाले आहेत. सुपर 12 च्या दुसऱ्या गटातील या सामन्याने साखळी फेरीतील लढतीचा दि एन्ड होणार आहे. भारतीय संघाला पाकिस्तान आणि न्यूझीलंड विरुद्धचा पराभव चांगलाच महागात पडला. टी-20 वर्ल्ड कप स्पर्धा युएईच्या मैदानात रंगली असली तरी याचे यजमानपद हे भारताकडे आहे. पण भारतीय संघच साखळी फेरीत गारद झाल्याची वेळ आली. कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने आतापर्यंत एकही आयसीसी स्पर्धा जिंकलेली नाही. 2017 मधील आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीपासून ते टी-20 वर्ल्ड कप स्पर्धेपर्यंत विराटने 4 संधी गमावल्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026: 'पॅट कमिंस SRH संघात आला तरी ईशान किशनच हवा कर्णधार, कारण...', काव्या मारनला मिळाला सल्ला

Gas Pipeline Leak: छत्रपती संभाजीनगर तालुक्यात थरारक घटना; गॅस लाईन फुटल्याने आग, मोठा अनर्थ टळला..

Latest Marathi News Live Update : बारामती पोटनिवडणुकीसाठी सुनेत्रा पवारांसह जय पवार आणि पार्थ पवार यांनी बजावला मतदानाचा हक्क

Supreme Court: डीएनएत पिता नसल्यास मुलाच्या पालनपोषणासाठी पोटगी नाही, सुप्रीम कोर्टाचा निर्णय, काय होता खटला?

बारामतीत २०२९ ला जय पवारांची एंट्री? लोकांची इच्छा, पण निर्णय बाकी… जय पवारांचं सूचक विधान!

SCROLL FOR NEXT