t20-world cup-trophy-inside-air-india-flight-rohit-sharma-virat-kohli-celebrate-video  sakal
क्रिकेट वर्ल्ड कप

Team India Arrival : फ्लाइटमध्ये ट्रॉफीचं अनबॉक्सींग अन् रोहित-सूर्याचा धुमाकूळ! BCCI शेअर केला 'तो' व्हिडिओ

अशा प्रकारे रोहित-विराटने फ्लाइटमध्ये ट्रॉफीसह साजरा केला आनंद, व्हिडिओ समोर आला आहे

Kiran Mahanavar

आता टीम इंडिया टी-20 वर्ल्ड कप ट्रॉफी जिंकून भारतात परतली आहे. वादळ आणि पावसामुळे टीम इंडिया गेल्या 4 दिवसांपासून बार्बाडोसमध्ये अडकली होती, त्यानंतर टीम इंडियाला आणण्यासाठी भारतातून विशेष विमान पाठवण्यात आलं होतं. दरम्यान विमानातून रोहित शर्मा आणि विराट कोहली यांचा ट्रॉफीसोबत सेलिब्रेशन करतानाचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे.

बीसीसीआयने शेअर केला खास व्हिडिओ

बीसीसीआयने सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यामध्ये टीम इंडियाचे खेळाडू ट्रॉफी अनबॉक्स करताना दिसत आहेत. या व्हिडिओमध्ये रोहित शर्मा, विराट कोहलीपासून ते जसप्रीत बुमराह, युझवेंद्र चहल, रवींद्र जडेजा आणि शिवम दुबेपर्यंत सर्वजण ट्रॉफी हातात धरताना दिसत आहेत.

आयसीसी ट्रॉफी जिंकण्यासाठी भारतीय चाहते 11 वर्षांपासून वाट पाहत होते, जो यावेळी रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने संपवला. दरम्यान टीम इंडिया गेल्या 4 दिवसांपासून बार्बाडोसमध्ये अडकली होती. आता चाहत्यांची ही प्रतीक्षाही संपली आहे. टीम इंडिया ट्रॉफीसह परतली आहे. टीम इंडियाच्या स्वागतासाठी चाहते दिल्ली विमानतळावर उभे होते.

टी-20 वर्ल्ड कप 2024 चे विजेतेपद जिंकल्यानंतर रोहित शर्मा आणि विराट कोहली यांनी टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली होती. त्यामुळे चाहत्यांची मनं नक्कीच तुटली आहेत. आता हे दोन्ही दिग्गज क्रिकेटच्या छोट्या फॉरमॅटमध्ये टीम इंडियाकडून खेळताना दिसणार नाहीत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

कॅब लवकर हवी? आता आधीच टिप देण्याचा खेळ संपला! सरकारचा Uber-Ola ला मोठा आदेश

Onion Rate : मंचर बाजार समितीत कांद्याला दहा किलोस मिळाला ४११ रुपये उच्चांकी बाजार भाव

Sangli Accident: रेणावी घाटात काळाचा घाला! दोन एसटी बस समोरासमोर धडकल्या, तीन जणांचा मृत्यू, काही जखमी

Pune News : प्रशासनातील वाद चव्हाट्यावर! वरिष्ठ अधिकारी दुजाभाव करतात; महापालिका आयुक्तांकडे तक्रार

Pune News : महापौर बंगल्याच्या नामांतरावरून आजीमाजी महापौर आमनेसामने

SCROLL FOR NEXT