Team India | T20 World Cup 2024 Sakal
क्रिकेट वर्ल्ड कप

Virat Kohli: वानखेडे स्टेडियमवरील सेलीब्रेशनवेळी 'वंदे मातरम' म्हणण्याची कल्पना होती विराट कोहलीची? Video होतोय व्हायरल

T20 World Cup 2024: टी२० वर्ल्ड कप विजयाच्या सेलिब्रेशनवेळी भारतीय संघाने प्रेक्षकांसह वंदे मातरम हे गाणं म्हटलं होतं.

Pranali Kodre

T20 World Cup 2024 Celebration: भारतीय क्रिकेट संघाने टी२० वर्ल्ड कप जिंकून आता आठवडा उलटून गेला असेल, मात्र अद्यापही त्याबद्दल चर्चा होत आहे. टी२० वर्ल्ड कप २९ जून रोजी जिंकल्यानंतर ४ जुलैला भारतीय संघ मायदेशात परतला होता. त्यावेळी भारतात संघाचं मोठ्या उत्साहात स्वागत झालं होतं.

मुंबईतील वानखेडे स्टेडियममध्येही संघाचा सत्कार सोहळा पार पडला होता. याच सत्कार सोहळ्यानंतर एक व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे.

भारतीय संघ मायदेशात परतल्यानंतर आधी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट खेळाडूंनी घेतली होती. यानंतर संध्याकाळी मुंबईत भारताची वानखेडे स्टेडियमवर विजयी मिरवणूक काढण्यात आली होती. त्यानंतर भारतीय संघ वानखेडे स्टेडियमवर पोहचला होता. त्यावेळी वानखेडे स्टेडियम प्रेक्षकांनी गच्च भरलेले होते.

यावेळी जेव्हा सत्कार सोहळ्यानंतर भारतीय खेळाडू वानखेडे स्टेडियमला फेरी मारली होती, तेव्हा स्टेडियममध्ये वंदे मातरम हे गाणं वाजत होतं. त्यामुळे भारतीय संघानेही प्रेक्षकांसह वंदे मातरम हे गाणं म्हणण्यास सुरुवात केली.

पण आता हे गाणं म्हणण्यापूर्वीचा एक व्हिडिओ व्हायरल होतोय, ज्यात विराट बाकी खेळाडूंना काहीतरी सांगताना दिसतो. त्यानंतरच सर्व खेळाडू प्रेक्षकांसोबत वंदे मातरम म्हणण्यास सुरुवात करताना दिसत आहेत. या व्हिडिओमुळे असा कयास लावला जात आहे की वंदे मातरम म्हणण्याची कल्पना विराट कोहलीची होती.

दरम्यान, या सेलीब्रेशन दरम्यानचे अनेक व्हिडिओ बीसीसीआयनेही शेअर केले होते. यामध्ये विराट आणि रोहित शर्मा यांच्यासह भारतीय संघ ढोल-ताशांच्या गजरात डान्स करताना दिसत होता.

अंतिम सामन्यात भारताचा विजय

टी२० वर्ल्ड कप २०२४ स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारतीय संघाने दक्षिण आफ्रिकेला अवघ्या ७ धावांनी पराभूत केले होते. या सामन्यात भारताने २० षटकात ७ बाद १७६ धावा केल्या होत्या. त्यानंतर १७७ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकेला २० षटकात ८ बाद १६९ धावाच करता आल्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Team India Selection : रिषभ पंतला वन डे संघात स्थान नाही, पण मिळाले कर्णधारपद; Asian Games साठीच्या संघातही दोन बदल, भन्नाट टीम्स

MPSC Paper Leak : एमपीएससी अध्यक्षांच्या राजीनाम्याची मागणी; अभिजीत दिपकेंचं उमेदवारांना आंदोलनाचं आवाहन

Umarga News : उमरगा सामाजिक वनीकरण विभागात भ्रष्टाचाराचा आरोप; कारवाईत दिरंगाईमुळे युवासेनेकडून वनरक्षकावर शाईफेक

India Squad for WI Series: हार्दिक पांड्या संघाबाहेरच, जसप्रीत बुमराहचेही नाव गायब; ऋतुराज गायकवाडची वापसी, तर एक सप्राईज पॅकेज, जाणून घ्या भन्नाट टीम इंडिया

Censor Board: केंद्राकडून सेन्सॉर बोर्डाची फेररचना! १८ सदस्यांची निवड; निशिगंधा वाड, वामन केंद्रे, मनोज जोशींचा समावेश

SCROLL FOR NEXT