Virat Kohli on Rohit Sharma; Team India Victory Parade sakal
क्रिकेट वर्ल्ड कप

Virat Kohli on Rohit Sharma : "15 वर्षांत पहिल्यांदाच…” विराट कोहलीने रोहित शर्माबद्दल केला मोठा खुलासा

Team India Victory Parade : वर्ल्ड कप 2024 च्या चॅम्पियन भारतीय संघाचा मुंबईतील वानखडे स्टेडियमवर भव्य सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता.

Kiran Mahanavar

Virat Kohli on Rohit Sharma : वर्ल्ड कप 2024 च्या चॅम्पियन भारतीय संघाचा मुंबईतील वानखडे स्टेडियमवर भव्य सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता. स्टेडियमवर पोहोचण्यापूर्वी टीम इंडियाने विजयी परेड काढली. यानंतर टीम इंडियाचा खेळाडू आणि प्रशिक्षक राहुल द्रविडने स्टेडियममध्ये टूर्नामेंटशी संबंधित आपल्या आठवणी शेअर केल्या. यादरम्यान टीमचा स्टार क्रिकेटर विराट कोहलीने सत्कार समारंभात वानखेडे स्टेडियमवर खचाखच भरलेल्या प्रेक्षकांसमोर खुलासा केला.

'विक्ट्री परेड'नंतर आयोजित सत्कार समारंभात कोहली म्हणाला की, '15 वर्षांत पहिल्यांदाच रोहितला इतका भावूक होताना मी पाहिलं आहे. विजेतेपद मिळवल्यानंतर मी ड्रेसिंग रुमध्ये परतत होतो त्यावेळी डोळ्यात अश्रू होते. समोर रोहित आला त्याचेही डोळे पाणावले होते आम्ही दोघांना अलिंगन दिले. तो भावनिक क्षण भारतीय क्रिकेटचा होता.

सामन्यामध्ये एक क्षण असा आला होता की, हा करंडकही आमच्या हातून निसटत असल्याचे जाणवत होते, पण बुमराने कमालीची गोलंदाजी केली आणि सामन्याला कलाटणी दिली तो खरा मॅचविनर आहे, अशा शब्दात विराटने बुमराचे कौतू केले.

29 जून रोजी टी-20 वर्ल्ड कप जिंकल्यानंतर भारतीय संघ वादळामुळे बार्बाडोसमध्ये अडकला होता. चाहते खेळाडूंची आतुरतेने वाट पाहत होते. गुरुवारी ४ जुलै रोजी भारतीय खेळाडूंचे विमान भारतात दाखल होताच संपूर्ण देश जल्लोषात गेला.

दिल्ली विमानतळापासून ते आयटीसी मौर्यपर्यंत सर्वजण आनंदोत्सव साजरा करत होते. टीम मुंबईत पोहोचली तेव्हा मरीन ड्राईव्हवर प्रचंड गर्दी पाहायला मिळाली. तिथे उपस्थित असलेली गर्दी पाहून भारतीय खेळाडूंनाही आश्चर्य वाटले. विजयाच्या परेडनंतर खेळाडू वानखेडे स्टेडियमवर पोहोचले. तिथे बीसीसीआयने 125 कोटींचा धनादेश देऊन त्यांचा गौरव केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

राज्यात वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता, १४ जिल्ह्यांत जोरदार बरसणार; ४८ तास धोक्याचे

Latest Marathi News Updates: आयुष कोमकर हत्या प्रकरणी आंदेकर कुटुंबातील आणखी चौघांना अटक

Pune Theatre Festival : नाट्यप्रेमींसाठी तीन दर्जेदार नाटकांची पर्वणी; ‘सकाळ’तर्फे येत्या आठवड्यात नाट्य महोत्सवाचे आयोजन

Gondia News: देवरी एमआयडीसीतील सुफलाम कंपनीत भीषण अपघात; मशीनमध्ये अडकून मजुराचा होरपळून मृत्यू

TET Exam Date : टीईटी परीक्षेची तारीख ठरली, परीक्षेसाठी ऑनलाईन अर्ज व परीक्षा शुल्क 'या' तारखेपासून भरता येणार

SCROLL FOR NEXT