Virat Kohli | Ravindra Jadeja | T20 World Cup 2024 Sakal
क्रिकेट वर्ल्ड कप

Team India Victory Parade: "थँक्य यू मुंबई पोलीस!" विजयी मिरवणूकीनंतर विराट-जडेजाने 'रिअल हिरोंचे' मानले आभार; पाहा पोस्ट

T20 World Cup 2024: टी20 वर्ल्ड कप विजेत्या भारतीय संघाची मरिन ड्राईव्ह येथे विजयी मिरवणूक काढण्यात आली होती. यावेळी सुरक्षेसाठी जवळपास 5000 पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आले होते.

Pranali Kodre

Virat Kohli-Ravindra Jadeja Thanks Mumbai Police: टी२० वर्ल्ड कप २०२४ स्पर्धा भारतीय संघाने २९ जून रोजी जिंकली. बार्बाडोसला झालेल्या अंतिम सामन्यात रोहित शर्मा कर्णधार असलेल्या भारतीय संघाने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध ७ धावांनी रोमांचक विजय मिळवला.

मात्र, या विजयानंतर तीन दिवस बार्बाडोसला आलेल्या वादळामुळे भारतीय संघाला तिथेच थांबावे लागले होते. अखेर गुरुवारी भारतीय संघ बीसीसीआयने पाठवलेल्या स्पेशल विमानाने मायदेशी परतला. मायदेशी परतल्यानंतर भारतीय संघ संध्याकाळी मुंबईत दाखल झाला.

मुंबईत भारतीय संघाची नरीमन पाँइट ते वानखेडे स्टेडियम अशी विजयी मिरवणूक काढण्यात आली. यावेळी लाखोंच्या संख्येने चाहते मरिन ड्राईव्हवर उपस्थित होते. त्यामुळे जवळपास ५००० पोलीस कर्मचारी सुरक्षेसाठी तैनात होते. ही गर्दी पाहून पोलीसांनी बदललेल्या वाहतुकीची नियमावलीही जाहीर केली होती.

लाखो चाहत्यांची गर्दी सांभाळण्याचं काम पोलीसांनी सुरुवातीपासून शेवटपर्यंत चोख पार पाडण्याचा प्रयत्न केला. यावेळी काहीवेळेस सुरक्षेच्या कारणाने त्यांना कठोरही व्हावं लागलं होतं. दरम्यान, या विजयी मिरवणूकीनंतर मुंबई पोलिसांच्याप्रती भारतीय संघातील स्टार खेळाडू विराट कोहली आणि रविंद्र जडेजा यांनी आभार मानले आहेत.

जडेजाने पोस्ट केली की 'मुंबई पोलिसांचे खूप आभार. तुम्ही रात्री खूप शानदार काम केलं.' या पोस्टमध्ये त्याने रिअल हिरो असा हॅशटॅगही टाकला आहे.

तसेच विराटने केलेल्या पोस्टमध्ये लिहिले, 'मुंबई पोलीसचे सर्व अधिकारी आणि कर्मचारी यांचे मनापासून आभार. भारतीय संघाच्या विजयी मिरवणूकीदरम्यान तुम्ही शानदार काम केलं. तुमचं समर्पण आणि सेवा याचं कौतुक. जय हिंद.'

दरम्यान, विजयी मिरवणूकीनंतर भारतीय संघाचा वानखेडे स्टेडियमवर सत्कार करण्यात आला. यावेळी बीसीसीआयने १२५ कोटी रुपयांचे बक्षीसही भारतीय संघाला दिले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Top gaining stocks list: शेअर बाजार कोसळला तरी 'या' 5 शेअर्सनी दिले बंपर रिटर्न! फक्त पाच दिवसांमध्ये 47 टक्क्यांपर्यंत धावले

Uttarakhand: ट्रिप करणाऱ्यांसाठी गुड न्यूज! भीमताल ते नैनीताल प्रवास होणार मिनिटांत? रोपवे प्रकल्पांना मुख्यमंत्र्यांचा ग्रीन सिग्नल

Strait of Hormuz: 'होर्मुझ सामुद्रधुनी'वरून इराणमध्येच पडले दोन गट; लष्कर आणि सरकारमध्ये बिनसलं, जगावर पुन्हा इंधन संकटाचं सावट

Shirampur Murder: जेवण उशिरा मिळाल्याचा वाद जीवावर बेतला; हॉटेल मालकाची निर्घृण हत्या, श्रीरामपूर हादरले!

Latest Marathi News Update: आदिती तटकरे पालखी सोहळ्यामध्ये डोक्यावर तुळशी वृदांवन घेऊन सहभागी

SCROLL FOR NEXT