West Indies vs Australia X/windiescricket
क्रिकेट वर्ल्ड कप

WI vs AUS, Warm-Up Match: वेस्ट इंडिजचा ऑस्ट्रेलियाला पराभवाचा दणका; पूरनची 300 च्या स्ट्राईक रेटने फलंदाजी

West Indies beat Australia: टी20 वर्ल्ड कपच्या सराव सामन्यात वेस्ट इंडिजने ऑस्ट्रेलिया संघाला पराभवाचा मोठा धक्का दिला आहे. दरम्यान, या सामन्यासाठीही ऑस्ट्रेलियाने सपोर्ट स्टाफमधील सदस्यांना मैदानात उतरवले होते.

Pranali Kodre

WI vs AUS, Warm-Up Match: आगामी टी20 वर्ल्ड कपसाठी सध्या सराव सामने खेळवले जात आहेत. ऑस्ट्रेलियाचा दुसरा सराव सामना यजमान वेस्ट इंडिजविरुद्ध शुक्रवारी (31 मे) झाला. या सामन्यात वेस्ट इंडिजने ऑस्ट्रेलियाला 35 धावांनी पराभवचा धक्का दिला आहे.

या सराव सामन्यात वेस्ट इंडिजने ऑस्ट्रेलियासमोर विजयासाठी 20 षटकात 258 धावांचे लक्ष्य दिले होते. या लक्ष्याचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाला 20 षटकात 7 बाद 222 धावा करता आल्या.

दरम्यान, नामिबियाविरुद्ध झालेल्या पहिल्या सराव सामन्याप्रमाणेच दुसऱ्या सराव सामन्यातही ऑस्ट्रेलियाने 9 खेळाडूंसह क्षेत्ररक्षण केले, त्यांनी क्षेत्ररक्षणासाठी राखीव क्षेत्ररक्षक म्हणून सपोर्ट स्टाफमधील सदस्यांना उतरवले होते. ऑस्ट्रेलियाने आयपीएलमधून खेळून आलेल्या बऱ्याच खेळाडूंना यादरम्यान विश्रांती दिलेली असल्याने त्यांना क्षेत्ररक्षणासाठी उतरवले नव्हते.

शुक्रवारी झालेल्या सराव सामन्याबद्दल सांगायचे झाले, तर ऑस्ट्रेलियाचा कर्णधार मिचेल मार्शने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, वेस्ट इंडिजच्या फलंदाजांनी चांगलीच फटकेबाजी केली.

वेस्ट इंडिजकडून यष्टीरक्षक फलंदाज निकोलस पूरनने 25 चेंडूत 300 च्या स्ट्राईक रेटने 75 धावांची खेळी केली, तर कर्णधार रोवमन पॉवेलने 25 चेंडूत 52 धावांची खेळी केली. तसेच शेर्फेन रुदरफोर्डने 18 चेंडूत 47 धावा केल्या, तर जॉन्सन चार्ल्स 31 चेंडूत 40 धावांची खेळी केली. त्यामुळे वेस्ट इंडिजने 20 षटकात 4 बाद 257 धावांची खेळी केली.

ऑस्ट्रेलियाकडून ऍडम झम्पाने 2 विकेट्स घेतल्या, तर टीम डेव्हिड आणि ऍश्टन एगर यांनी प्रत्येकी 1 विकेट घेतली.

त्यानंतर ऑस्ट्रेलियाला 222 धावाच करता आल्या. ऑस्ट्रेलियाकडून जोश इंग्लिशने सर्वाधिक 55 धावांची खेळी केली. तसेच नॅथन एलिसने 22 चेंडूत 39 धावांची खेळी केली. याशिवाय ऍश्टन एगर (28), टीम डेव्हिड (25), मॅथ्यू वेड (25) आणि ऍडम झाम्पा (21) यांनी आक्रमक छोट्या खानी खेळी केल्या, मात्र त्यांना संघाला विजय मिळवून देता आला नाही.

वेस्ट इंडिजकडून गुडाकेश मोती आणि अल्झारी जोसेफ यांनी प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या. तसेच अकिल हुसैन, शामर जोसेफ, ओबेड मॅकॉय यांनी प्रत्येकी 1 विकेट घेतली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Salary Report 2025: भारतीयांच्या मासिक पगारात वाढ, केंद्र सरकारची आकडेवारी जाहीर, तुमचा ७ वर्षांत किती पगार वाढला?

Pune Murder News : पुण्यात पहाटे खुनाचा थरार! तरुणाच्या डोक्यात दगड घालून हत्या; कुठं घडली घटना?

Latest Marathi News Live Update: गौतमी पाटीलच्या वाहनाचा अपघात प्रकरण, अपघातावेळी चालकाने मद्य प्राशन केले नसल्याचे स्पष्ट

Navi Mumbai Airport: नवी मुंबई विमानतळाचा मुहूर्त ठरला! उद्घाटनानंतर ६० दिवसांत होणार पहिलं उड्डाण; कसं असेल नवं विमानतळ?

Nagpur Fraud: व्यापारी पगारिया यांची १८.३० कोटींनी फसवणूक; करारानंतरही विदेशी कंपनीकडून माल पाठविण्यास टाळाटाळ

SCROLL FOR NEXT