West Indies vs Uganda T20 World Cup sakal
क्रिकेट वर्ल्ड कप

T20 World Cup : टी-20 वर्ल्ड कपमध्ये 'या' देशाचा लाजिरवाणा पराक्रम! वेस्ट इंडिजविरुद्ध अवघ्या 39 धावांवर खेळ खल्लास अन्...

West Indies vs Uganda 18th Match T20 World Cup : गयाना येथे खेळल्या गेलेल्या टी-20 वर्ल्ड कप 2024 च्या 18 व्या सामन्यात वेस्ट इंडिजने युगांडाचा 134 धावांनी पराभव केला.

Kiran Mahanavar

West Indies vs Uganda T20 World Cup : गयाना येथे खेळल्या गेलेल्या टी-20 वर्ल्ड कप 2024 च्या 18 व्या सामन्यात वेस्ट इंडिजने युगांडाचा 134 धावांनी पराभव केला. प्रथम फलंदाजी करताना कॅरेबियन संघाने निर्धारित 20 षटकांत 5 गडी गमावून 173 धावा केल्या, मात्र प्रत्युत्तरात युगांडाचा संघ केवळ 39 धावांत गारद झाला.

टी-20 क्रिकेटच्या इतिहासातील ही सर्वात कमी धावसंख्या असून वेस्ट इंडिजने ऐतिहासिक विजय मिळवला. त्याच्याकडून अकिल हुसेनने आपल्या कारकिर्दीतील सर्वोत्तम गोलंदाजी केली आणि 4 षटकात केवळ 11 धावा देत 5 बळी घेतले.

याआधी फलंदाजीला आलेल्या वेस्ट इंडिजकडून जॉन्सन चार्ल्सने जबरदस्त खेळी केली. त्याने 42 चेंडूत 44 धावा केल्या. त्याच वेळी, आंद्रे रसेलने 17 चेंडूत नाबाद 30 धावा करत वेस्ट इंडिजला 173 धावांपर्यंत नेले. युगांडाकडून कर्णधार मसाबाने दोन विकेट घेतल्या.

लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी आलेला युगांडाचा संघ स्पर्धेत कधीच दिसला नाही. खातेही न उघडता त्याला पहिला धक्का बसला. यानंतर संघ सावरू शकला नाही आणि सतत विकेट गमावत राहिला. केवळ 25 धावांत त्यांच्या 8 विकेट पडल्या होत्या आणि त्यानंतर संपूर्ण संघ 39 धावांत गडगडला.

टी-20 वर्ल्ड कपच्या इतिहासातील ही सर्वात कमी धावसंख्या आहे. यापूर्वी 2014 च्या टी-20 वर्ल्ड कपमध्ये नेदरलँडचा संघ श्रीलंकेविरुद्ध अवघ्या 39 धावांत ऑल-आऊट झाला होता. युगांडाने या विक्रमाची बरोबरी केली आहे.

टी-20 वर्ल्ड कपच्या इतिहासातील सर्वात कमी धावसंख्येवर ऑल-आऊट झालेले संघ :

  • नेदरलँड्स - 39 धावा (वि श्रीलंका, 2014)

  • युगांडा - 29 धावा (वि. वेस्ट इंडीज, 2024)

  • नेदरलँड्स - 44 धावा (वि श्रीलंका, 2021)

  • वेस्ट इंडिज - 66 धावा (वि. इंग्लंड, 2021)

  • युगांडा – 58 धावा (वि अफगाणिस्तान, 2024)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Medha Kulkarni Hospitalized : भाजप खासदार मेधा कुलकर्णी रूग्णालयात दाखल ; काही दिवस संपर्कात नसणार!

Uddhav Thackeray : दगाबाज रे.. सरकार पॅकेजचे काय झाले? उद्धव ठाकरे यांनी भुम, परंडा, वाशी या भागाचा केला पाहणी दौरा

ट्रेनच्या शौचालयात ‘प्रेम’ व्यक्त करणाऱ्यांनो सावधान! आता कुणाचा नंबर किंवा नाव लिहिलंत तर...; रेल्वे प्रशासनाचा थेट इशारा

पेट्रोल, डिझेल, सीएनजी आणि इलेक्ट्रिक चार्जिंग... एसटी पेट्रोल पंप सर्वांसाठी खुले होणार! सुविधा कुठे उपलब्ध असणार?

Vegetable Vendor Wins 11 crore Lottery Video : नशीब असावं तर असं! मित्राच्या पैशाने लॉटरीचं तिकीट खरेदी केलेल्या भाजी विक्रेत्याने जिंकलं तब्बल ११ कोटींचं बक्षीस

SCROLL FOR NEXT