Amit Mishra on Virat Kohli and Rohit Sharma sakal
Cricket

Virat Kohli : 'ज्या चिकूला मी ओळखत होतो तो...' कोहलीवर दिग्गज भारतीय क्रिकेटरची टीका, रोहितबद्दल मात्र...

विराट कोहली हे आता भारतीय क्रिकेटमधलं एक मोठं नाव आहे. कोहलीने आपल्या खेळाने छाप पाडून जगभरात ही कीर्ती मिळवली आहे.

Kiran Mahanavar

Amit Mishra on Virat Kohli : विराट कोहली हे आता भारतीय क्रिकेटमधलं एक मोठं नाव आहे. कोहलीने आपल्या खेळाने छाप पाडून जगभरात ही कीर्ती मिळवली आहे. यादरम्यान टीम इंडियाचा माजी लेगस्पिनर अमित मिश्राने भारतीय कर्णधार रोहित शर्मा आणि विराट कोहली यांच्या स्वभावातील फरकाविषयी सांगितले. यासोबत त्याने विराट कोहलीबाबत खळबळजनक विधान केले आहे.

एका यूट्यूब चॅनलवर झालेल्या पॉडकास्टमध्ये अमित मिश्रा यांनी विराट कोहलीबद्दल तिखट विधान केले. त्याच्या मते चिकू म्हणजे विराट कोहली आता पूर्वीपेक्षा खूप बदलला आहे.

माजी फिरकीपटू अमित मिश्रा विराट कोहलीबद्दल म्हणाला की, मी विराटला खूप बदलल्याचे पाहिले आहे. आणि आमचे बोलणे जवळपास बंद झाले आहे. प्रसिद्धी आणि सत्ता मिळाली की लोक फक्त कामासाठी बोलतात असे काही लोकांना वाटते.

पुढे तो म्हणाला की, एक क्रिकेटर म्हणून मी विराट कोहलीचा खूप आदर करतो, पण आता त्याच्याशी पूर्वीसारखे नाते राहिलेले नाही. मी चिकूला 14 वर्षांचा असल्यापासून ओळखतो, जेव्हा तो रोज रात्री समोसे आणि पिझ्झा खात होता. पण माझ्या ओळखीचा चिकू आणि सध्याचा विराट कोहली यात खूप फरक आहे.

रोहित शर्माबद्दल अमित मिश्रा म्हणाला की, त्याच्यामध्ये कोणताही बदल झालेला नाही.

अमित मिश्राचा जन्मही दिल्लीत झाला होता, पण तो रणजी ट्रॉफीमध्ये हरियाणाकडून खेळला होता आणि त्यामुळेच तो विराट कोहलीला खूप दिवसांपासून ओळखतो. दोघांनी देशांतर्गत स्तरावरही खूप खेळले आहेत. 41 वर्षांचा अमित मिश्रा अजूनही आयपीएलमध्ये खेळताना दिसत आहे.

अमित मिश्राच्या कारकिर्दीबद्दल बोलायचे झाल्यास, त्याने आपल्या कारकिर्दीत 22 कसोटी, 36 एकदिवसीय आणि 10 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले. या काळात त्याने कसोटी सामन्यात 76, टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यात 16 आणि एकदिवसीय सामन्यात 64 विकेट घेतले. याशिवाय अमित मिश्राची आयपीएल कारकीर्दही खूप यशस्वी ठरली. त्याने आतापर्यंत 162 सामने खेळले असून त्यात त्याने 174 विकेट घेतल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

१४१३ कोटींची संपत्ती, पण ना मर्सिडीज ना ऑडी; डीके शिवकुमार यांच्या नावावर फक्त एकच जुनी कार!

Thane News: खोट्या कागदपत्रांच्या आधारे उभारली सात मजली इमारत, बिल्डरला अटक; रहिवाशांचे काय होणार?

'कृष्णाईच्या लेकी'मध्ये 'हा' अभिनेता साकारणार नायक; 'सहकुटुंब सहपरिवार'मधील अभिनेत्रीचीही एंट्री; पाहा संपूर्ण कास्ट

Latest Marathi News Update : नीट पेपरफुटी प्रकरणी मनिषा हवालदारची जेलमध्ये रवानगी

हसवणार... घाबरवणार... आणि वेड लावणार ! ‘भूतम भयम्’ २४ जुलैला थिएटरमध्ये धडकणार

SCROLL FOR NEXT