India vs Bangladesh, 2nd T20I Sakal
Cricket

IND vs BAN: भारताच्या वादळी सुरुवातीनंतरही पॉवरप्लेमध्ये बांगलादेशचं वर्चस्व; सूर्याही स्वस्तात बाद झाल्यानं पहिल्यांदाच असं घडलं

India vs Bangladesh 2nd T20I: भारतीय संघ बांगलादेशविरुद्ध दुसरा टी२० सामना दिल्लीत खेळत आहे. या सामन्यात भारताने सुरुवात चांगली केली होती. मात्र, बांगलादेशने पॉवरप्लेमध्ये भारतावर वर्चस्व ठेवत तीन विकेट्स घेतल्या.

Pranali Kodre

India vs Bangladesh T20I: भारतीय संघ बांगलादेशविरुद्ध दुसरा टी२० सामना दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर बुधवारी सुरू आहे. या सामन्यात भारताने सुरुवात चांगली केली होती. मात्र, बांगलादेशने पॉवरप्लेमध्ये भारतावर वर्चस्व ठेवले. या सामन्यात बांगलादेशने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता.

मात्र पहिल्याच षटकात भारताकडून सलामीला फलंदाजीला उतरलेल्या संजू सॅमसन आणि अभिषेक शर्मा यांनी १५ धावा ठोकल्या होत्या. मात्र दुसऱ्या षटकात तस्किन अहमदने चांगली गोलंदाजी केली. त्याने शेवटच्या चेंडूवर सॅमसनला चूक करण्यास भाग पाडले.

संजू सॅमसन तस्किनच्या गोलंदाजीवर नजमुल हुसैन शांतोच्या हातात झेल देत बाद झाला. त्याने ७ चेंडूत १० धावा केल्या. त्याच्यानंतर तिसऱ्या षटकात तान्झिम हसन साकिबने अभिषेक शर्माला क्लिनबोल्ड केले. अभिषेकने ११ चेंडूत १५ धावा केल्या.

त्यानंतरही सूर्यकुमार यादव नितीश रेड्डीच्या साथीने फलंदाजी करताना आक्रमक खेळण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, सूर्यकुमारचा अडथळा मुस्तफिझुरने दूर केला. त्याने सूर्यकुमारला ६ व्या षटकात शांतोच्या हातून झेलबाद केले. सूर्यकुमार ८ धावा करून माघारी परतला.

त्यामुळे भारताची अवस्था ६ षटकात ३ बाद ४५ धावा अशी झाली. दरम्यान, पहिल्या ६ षटकात म्हणजेच पॉवरप्लेमध्ये भारताने बांगलादेशविरुद्ध टी२० क्रिकेटमध्ये तीन विकेट्स गमावण्याची ही पहिलीच वेळ ठरली.

दरम्यान, या सामन्यासाठी भारताने प्लेइंग इलेव्हनमध्ये बदल केलेला नाही, तर बांगलादेशने प्लेइंग इलेव्हनमध्ये एक बदल केला असून शोरुफुल इस्लामच्या जागेवर तान्झिम साकिबला संधी दिली आहे.

पहिला सामना भारताने जिंकलेला असल्याने हा सामना जिंकून मालिकेत बरोबरी साधण्याचा प्रयत्न बांगलादेशचा असणार आहे. तसेच जर भारताने हा सामना जिंकला, तर ते मालिकाही खिशात घालतील.

असे आहेत प्लेइंग इलेव्हन

  • भारत - संजू सॅमसन, अभिषेक शर्मा, सूर्यकुमार यादव, नितीश कुमार रेड्डी, हार्दिक पांड्या, रियान पराग, रिंकु सिंग, वॉशिंग्टन सुंदर, वरुण चक्रवर्ती, अर्शदीप सिंग, मयंक यादव.

  • बांगलादेश - परवेझ हुसैन इमॉन, लिटन दास (यष्टीरक्षक), नजमुल हुसेन शांतो (कर्णधार), तौहीद हृदोय, महमुदुल्ला, जाकेर अली, मेहिदी हसन मिराझ, रिशाद हुसेन, तस्किन अहमद, तन्झिम हसन साकिब, मुस्तफिजुर रहमान

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

T20 WC, SA vs NZ Semi: दक्षिण आफ्रिकेसोबत चिटिंग झाली? एडन मार्करमची विकेट ढापली? 'त्या' कॅचवरून वाद पेटला Video

मुंबईत २ लाख ट्रक चालक-मालक धडकणार, ई-चालान प्रणालीविरोधात उतरणार रस्त्यावर

Latest Marathi News Live Update : नोकरीच्या आमिषाने १६ जणांची फसवणूक

Pune Fraud : मेट्रोसाठी सिमेंट-स्टील पुरवठ्याच्या आमिषाने पावणे चार कोटींची फसवणूक

Kamthi News : नागपूर हादरल! रंग उडवल्याच्या रागातून आजीने नातवावर ओतले उकळते पाणी

SCROLL FOR NEXT