India vs Bangladesh, 2nd T20I Sakal
Cricket

IND vs BAN: बांगलादेशने टॉस जिंकला, पण कर्णधार सूर्याची इच्छा पूर्ण झाली; दुसऱ्या T20I साठी असे आहेत 'प्लेइंग-11'

India vs Bangladesh, 2nd T20I: दिल्लीत होत असलेल्या टी२० सामन्यात बांगलादेशने भारताविरुद्ध नाणेफेक जिंकली आहे.

Pranali Kodre

India vs Bangladesh, 2nd T20I: भारत विरुद्ध बांग्लादेश संघात दिल्लीत अरुण जेटली स्टेडियमवर टी२० मालिकेतील दुसरा सामना बुधवारी (९ ऑक्टोबर) खेळला जात आहे. या सामन्यात बांगलादेशचा कर्णधार नजमुल हुसैन शांतोने नाणेफेक जिंकली असून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे भारतीय संघ प्रथम फलंदाजी करताना दिसेल.

दरम्यान, भारताचा कर्णधार सूर्यकुमार यादवने सांगितले की त्याने नाणेफेक जिंकली असती, तरी प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला असता. पण त्याने अशीही शंका व्यक्त केली की कदाचीत दवाचा परिणाम या सामन्यात दिसू शकतो.

परंतु, तो म्हणाला की त्यांना गोलंदाजांना थोडं चॅलेंज करायचे आहे की ते चेंडू जर ओला झाला, तर कसे गोलंदाजी करणार. त्यामुळे प्रथम फलंदाजीसाठीही संघ तयार असल्याचे त्याने स्पष्ट केले.

या सामन्यासाठी भारताच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये कोणताही बदल करण्यात आला आहे. त्यामुळे पहिल्या सामन्यात खेळलेले ११ खेळाडूच या सामन्यातही खेळताना दिसणार आहे.

तसेच बांगलादेशने प्लेइंग इलेव्हनमध्ये एक बदल केला आहे. त्यांनी शोरुफुल इस्लामच्या जागेवर तान्झिम साकिबला संधी दिली आहे. याशिवाय त्यांनी कोणताही बदल केलेला नाही.

दरम्यान, भारताने पहिला सामना जिंकल्याने मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे. आता दुसरा सामना जिंकून मालिका खिशात घालण्याची संधी भारताला असणार आहे. पण बांगलादेशही दुसरा सामना जिंकून मालिकेत बरोबरी करण्याच्या प्रयत्नात असेल.

लक्षात घेण्यासारखी गोष्ट अशी की भारत आणि बांगलादेश संघात दिल्लीत अखेरचा टी२० सामना २०१९ मध्ये खेळवला गेला होता. त्या सामन्यात बांगलादेशने भारताला पराभूत केलं होतं. आंतरराष्ट्रीय टी२० मध्ये बांगलादेशविरुद्ध झालेला भारताचा हा पहिला पराभव आहे.

असे आहेत प्लेइंग इलेव्हन

  • भारत - संजू सॅमसन, अभिषेक शर्मा, सूर्यकुमार यादव, नितीश कुमार रेड्डी, हार्दिक पांड्या, रियान पराग, रिंकु सिंग, वॉशिंग्टन सुंदर, वरुण चक्रवर्ती, अर्शदीप सिंग, मयंक यादव.

  • बांगलादेश - परवेझ हुसैन इमॉन, लिटन दास (यष्टीरक्षक), नजमुल हुसेन शांतो (कर्णधार), तौहीद हृदोय, महमुदुल्ला, जाकेर अली, मेहिदी हसन मिराझ, रिशाद हुसेन, तस्किन अहमद, तन्झिम हसन साकिब, मुस्तफिजुर रहमान

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

High Court: "बिचारे देव मतदान करू शकत नाही, म्हणून..."; उच्च न्यायालयाने अधिकाऱ्यांना फटकारले, काय आहे प्रकरण?

Ichalkaranji Firing News : इचलकरंजीत पोलिसादेखत गुंडावर गोळीबार, भरवस्तीत प्रकाराने एकच धावाधाव; जखमी सांगलीचा; हल्लेखोर पसार

Latest Marathi News Live Update : एसबीआय एनर्जी लिमिटेड कंपनीच्या स्फोटातील आरोपी कंपनी मालक अद्यापही फरार

मोठी बातमी! सोलापूर जिल्ह्यातील दोन लाख ग्राहकांचे वीज कनेक्शन तोडले जाणार; ‘हे’ आहे कारण, महावितरणकडून ग्राहकांना इशारा, वाचा...

अग्रलेख : युद्धाच्या पडछायेत...

SCROLL FOR NEXT