Jay Shah | Paris Olympic 2024 Sakal
Cricket

भारीच! ऑलिम्पिकला जाणाऱ्या भारतीय खेळाडूंना BCCI ची ८.५ कोटींची मदत, जय शाह यांची घोषणा

Paris Olympic 2024: बीसीसीआयकडून पॅरिस ऑलिम्पिकमध्ये सहभागी होणाऱ्या भारतीय खेळाडूंसाठी ८.५ कोटींचा निधी दिला जाणार आहे.

Pranali Kodre

BCCI annouced support to India's Paris Olympics athletes: पॅरिसमध्ये २६ जुलैपासून ऑलिम्पिक २०२४ स्पर्धा खेळली जाणार आहे. या खेळांच्या कुंभमेळ्या भारतीय खेळाडूही मोठ्या प्रमाणात सहभागी होणार आहे. यासाठी आता भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) मदतीचा हात पुढे केला आहे.

बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी जाहीर केले आहे की बीसीसीआयकडून भारतीय ऑलिम्पिक संघटनेला (IOA) ८.५ कोटी रुपयांचा निधी देण्यात येणार आहे.

त्यांनी ट्वीटमध्ये लिहिले की 'मला हे जाहीर करताना आनंद होत आहे की पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करणाऱ्या खेळाडूंना बीसीसीआयकडूनही पाठिंबा दिला जाईल. आम्ही या मोहिमेसाठी आयओएला ८.५ कोटी रुपये देत आहोत. आपल्या संपूर्ण भारतीय संघाला खूप शुभेच्छा. देशाचं नाव उज्जल करा.'

दरम्यान यंदा पॅरिस ऑलिम्पिकसाठी आयओएने ११७ खेळाडूंची अंतिम निवड केली आहे. तसेच या ऑलिम्पिकसाठी भारताच्या ताफ्यात ११७ खेळाडूंसह १४० सपोर्ट स्टाफ सदस्य आहेत, ज्यात काही अधिकारीही आणि मेडिकल स्टाफही आहे.

भारतीय ताफ्यातील सर्वाधिक २९ खेळाडू हे ऍथलेटिक्समध्ये सहभागी होणार आहेत, त्यापाठोपाठ नेमबाजीत भारताचे २१ खेळाडू उतरणार आहेत.

याशिवाय १९ जणांचा भारतीय पुरुष संघही या स्पर्धेत सहभागी होत आहे. तसेच टेबल टेनिसचे ८ आणि बॅडमिंटनमध्ये ७ खेळाडू सहभागी होणार आहेत. कुस्ती, तिरंदाजी आणि बॉक्सिंग या खेळामध्ये प्रत्येकी ६ खेळाडू सहभागी होणार आहेत.

त्याचबरोबर गोल्फमध्ये ४ खेळाडू आणि टेनिसमध्ये ३ खेळाडू सहभागी होतील, तर स्विमिंगमध्ये २ आणि सेलिंग या क्रीडा प्रकारात प्रत्येकी २ खेळाडूंना संधी मिळाली आहे. घोडेस्वारी, ज्युदो, रोइंग आणि वेट लिफ्टिंग या खेळांचे प्रत्येकी १ खेळाडू भारताच्या ताफ्यात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

घातपात, हलगर्जीपणा की गुन्हेगारी कृत्य... अजित पवारांच्या मृत्यूमागे नेमकं काय? पत्रकार परिषदेत सीआयडीनं कोणते संकेत दिले? वाचा...

Explained : दक्षिण आफ्रिककडून वेस्ट इंडिजचा पराभव व्हावा, ही तर भारताची इच्छा! पण, का?

Ajit Pawar Plane Crash: ''आम्हांला काही पुरावे सापडले आहेत'', अजित पवारांच्या विमान अपघातप्रकरणी सीआयडीची पत्रकार परिषद

India Semi-Final Scenario: बापरे! भारताला तब्बल २९० धावांनी झिम्बाब्वेला हरवावं लागेल? नेमकं कसं आहे गणित, जाणून घ्या

Kolhapur Ratnagiri Highway Truck Fire: कोल्हापूर -रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर वाघबीळ घाटात धान्याच्या ट्रकला आग; वाहतूक ठप्प

SCROLL FOR NEXT