Cricket Viral Video Sakal
Cricket

Cricket: गोंधळच गोंधळ! रनआऊटसाठी बॉल हातातच येईना, छोट्या फिल्डर्सची पळता भुई थोडी, पाहा मजेशीर Viral Video

Cricket Viral Video: अनेक प्रयत्न करूनही चेंडू हातात न आल्याने फलंदाजाला रनआऊट करण्यात फिल्डर्सला अपयश आले, अशा घटनेचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

Pranali Kodre

Cricket Viral Video: क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ आहे, असं म्हटलं जातं. कारण क्रिकेटमध्ये कधी सामना वळण घेईल सांगता येत नाही. दरम्यान, क्रिकेटमध्ये फलंदाजी आणि गोलंदाजीबरोबरच क्षेत्ररक्षणही महत्त्वाचे असते.

क्षेत्ररक्षणात चूक झाल्यास फलंदाजाला जीवनदान मिळू शकते आणि हे जीवनदान गोलंदाजी करणाऱ्या संघाला महागातही पडू शकते. कधीकधी क्षेत्ररक्षण करताना काही गमतीशीर घटनाही घडतात. असाच एक व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. लहान वयोगटातील एका क्रिकेट सामन्यातील हा व्हिडिओ आहे.

या व्हिडिओत दिसते त्याप्रमाणे फलंदाजी करणाऱ्या संघाला 1 चेंडूत 41 धावांची गरज आहे. तसेच फलंदाजी करणाऱ्या संघाचे ७ विकेट्स गेल्या आहेत. यावेळी फलंदाजाने एक शॉट खेळला.

त्यावेळी शॉर्टला क्षेत्ररक्षण करणाऱ्या खेळाडूने चेंडू पकडण्याचा प्रयत्न केला, पण त्याच्या हातून दोन-तीन वेळा चेंडू निसटला. यावेळी चेंडू स्ट्राईकवर असलेला फलंदाज धाव घेण्यासाठी पळाला, पण नॉन-स्ट्रायकरचा फलंदाज अर्ध्यात जाऊन चेंडू पकडल्याचे पाहून मागे फिरला. त्यामुळे दोन्ही फलंदाज नॉन-स्ट्रायकरला आले.

ते पाहून क्षेत्ररक्षकाने चेंडू यष्टीरक्षकाच्या दिशेने फेकला. पण तिथेही दोन-तीन खेळाडूंकडून चेंडू स्टंपवर मारण्याचा प्रयत्न झाला, पण तो लागलाच नाही आणि चेंडू निसटून लांब गेला. याचा फायदा घेत फलंदाज पुन्हा स्ट्राईकवर गेला. या गोंधळात फलंदाजी संघाला एक धावही मिळाली नाही आणि क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाला विकेटही मिळाली नाही.

दरम्यान, हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत असून त्यावर अनेक प्रतिक्रियाही आल्या आहेत. मात्र, हा व्हिडिओ कोणत्या स्पर्धेतील आहे आणि कोणत्या सामन्यात आहे, तसेच कधीचा आहे, याबाबत माहिती मिळालेली नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT