Ricky Ponting Sourav Ganguly X/DelhiCapitals
Cricket

Delhi Capitals: रिकी पाँटिंग अन् दिल्लीचे मार्ग झाले वेगळे, IPL 2025 साठी संघाला मिळणार नवा कोच

Ricky Ponting: रिकी पाँटिंगचा दिल्ली कॅपिटल्सबरोबरचा मुख्य प्रशिक्षपदाचा करार संपला असून फ्रँचायझीने त्याला भावूक निरोप दिला आहे.

Pranali Kodre

Delhi Capitals part ways with Ricky Ponting: इंडियन प्रीमियर लीग २०२५ स्पर्धेसाठी होणाऱ्या मेगा ऑक्शनपूर्वी दिल्ली कॅपिटल्स फ्रँचायझीने मोठा निर्णय घेतला आहे. दिल्लीने मुख्य प्रशिक्षक रिकी पाँटिंगला निरोप दिला आहे. त्यामुळे आयपीएल २०२४ नंतर पाँटिंगचा दिल्लीबरोबर असलेला मु्ख्य प्रशिक्षकपदाचा करार संपला.

रिकी पाँटिंग गेल्या ७ वर्षांपासून दिल्लीचा मुख्य प्रशिक्षक होता. मात्र गेल्या ७ वर्षात एकदाही दिल्लीला विजेतेपदाला गवसणी घालता आली नाही. पाँटिंगने २०१८ मध्ये सर्वात पहिल्यांदा या संघाचं प्रशिक्षकपद स्विकारलं होतं. त्यावर्षी संघ सर्वात खालच्या क्रमांकावर राहिला होता.

मात्र त्यानंतर २०१९, २०२० आणि २०२१ अशा सलग तीन वर्षी संघानं प्लेऑफ गाठली. २०२० मध्ये त्यांना अंतिम सामन्यात पराभूत व्हावं लागल्याने उपविजेतेपदावर समाधान मानावं लागलं. २०२२, २०२३ आणि २०२४ मध्ये मात्र दिल्लीला प्लेऑफ गाठता आली नव्हती.

दिल्लीने सोशल मीडियावर पोस्ट करत याबाबत माहिती दिली आहे. त्यांनी पोस्टच्या कॅप्शनमध्ये लिहिले की '७ हंगामांनंतर दिल्ली कॅपिटल्सने रिकी पाँटिंगसोबतचा मार्ग वेगळा करण्याचा निर्णय घेतला आहे. कोच, हा खूप चांगला प्रवास होता. प्रत्येक गोष्टीसाठी थँक यू.'

याशिवाय पोस्टमध्ये दिल्लीने लिहिले, 'आमच्या मुख्य प्रशिक्षकापासून वेगळे होण्याबद्दलच्या भावना शब्दात मांडणं आमच्यासाठी कठीण आहे. तू प्रत्येक हडलमध्ये काळजी, वचनबद्धता, ऍटिट्यूड आणि प्रयत्न या चार गोष्टी सांगितल्यास. त्यातून आपली ७ वर्षे एकत्र कशी होतात, हे कळून येतं.

'सात उन्हाळे तू डोक्यावर आणि पाठीवर हात ठेवलास म्हणून आम्ही आणखी चांगले बनू शकलो, फक्त एक खेळाडू म्हणून नाही, तर माणूस म्हणून देखील. तू सातही वर्षात ट्रेनिंससाठी सर्वातआधी हजर व्हायचा आणि शेवट जायचास.'

'तू सातही वर्षे टाईमआऊटवेळी डगआऊटमधून धावत यायचास आणि तुझी नखं संपत नाहीत, तोपर्यंत ती कुरतडायचास. सातही वर्षे तुझी ड्रेसिंग रूममधील भाषणं, तुझी मिठी, तुझी शाबासकी...सर्व गोष्टींसाठी आभार.'

रिकी पाँटिंग आयपीएलशी खूप आधीपासून जोडलेला आहे. त्याने मुंबई इंडियन्सचे नेतृत्वही केले आहे. पण खेळाडू म्हणून निवृत्तीनंतर त्याने प्रशिक्षण क्षेत्रात पाऊल टाकले होते. गेल्या ७ वर्षात त्याने दिल्लीसाठी प्रशिक्षक म्हणून मोठे योगदान दिले.

पाँटिंगला क्रिकेट विश्वात एक दिग्गज खेळाडू आणि उत्तम कर्णधार म्हणून समजले जाते. त्याने आंतरराष्ट्रीय कारकि‍र्दीत ५६० सामने खेळताना २७४८३ धावा केल्या आहेत. यामध्ये त्याच्या ७१ शतकांचा समावेश आहे.

गांगुली बनणार प्रशिक्षक?

दरम्यान, आता पाँटिंग प्रशिक्षकपदावरून पायउतार झाल्यानंतर आयपीएल २०२५ मध्ये दिल्लीला नवा प्रशिक्षक मिळणार हे निश्चित झाले आहे. त्यासाठी माजी भारतीय कर्णधार सौरव गांगुलीचे नाव आघाडीवर आहे. गांगुली दिल्लीचा क्रिकेट संचालक आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

RJD Candidate Arrested : उमेदवारी अर्ज दाखल करताच 'राजद'च्या उमेदवारास झारखंड पोलिसांनी केली अटक!

Deglur Accident : बस व ट्रॅव्हल्स समोरासमोर अपघात २८ जण गंभीर जखमी, लेंडी पुला जवळील घटना; २ तास वाहतूक खोळंबंली

'२०२७ वनडे वर्ल्ड कप जिंकायचा असेल, तर आगरकर - गंभीरला पदावरून हटवा!', Navjot Singh Sidhu खरंच असं म्हणाले? स्वत:च केला खुलासा

Diwali Celebration : ऑपरेशन पहाट; सोलापूर पोलिसांनी पारधी कुटुंबांसोबत साजरी केली दीपावली, शासकीय योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन

Actor Asrani Passes Away : ज्येष्ठ अभिनेते असरानी यांचं निधन, ८४व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास, 'अंग्रेजों के जमाने का जेलर' काळाच्या पडद्याआड

SCROLL FOR NEXT