India vs Sri Lanka 3rd ODI Sakal
Cricket

IND vs SL, 3rd ODI: आऊट अन् मग नॉट आऊट; ऋषभ पंतच्या स्टंपिंगवर गोंधळ, जयसूर्याही झाला चकीत

श्रीलंकेविरुद्धच्या तिसऱ्या वनडेत ऋषभ पंतने केलेल्या स्टंपिंगवर थर्ड अंपायरकडूनही गोंधळ झाल्याचे दिसून आले.

Pranali Kodre

श्रीलंका विरुद्ध भारत संघात बुधवारी (७ ऑगस्ट) वनडे मालिकेतील तिसरा आणि अखेरचा सामना कोलंबोला खेळवला जात आहे. या सामन्यात भारतासमोर श्रीलंकेने २४८ धावांचे लक्ष्य ठवेले आहे. दरम्यान, या सामन्यात ४९ व्या षटकात एक गोंधळ झाल्याचे पाहायला मिळाले.

झाले असे की श्रीलंकेचा संघ फलंदाजी करत असताना ४९ व्या षटकात कुलदीप यादव गोलंदाजी करत होता. यावेळी त्याने टाकलेल्या शेवटच्या चेंडूवर स्ट्राईकवर असणाऱ्या महिश तिक्षणाने पुढे येऊन शॉट खेळण्याचा प्रयत्न केला. पण तो चूकला. यावेळी पंतने चेंडू पकडला आणि स्टंपवरील बेल्स उडवले. सुरुवातीला तिक्षणा यष्टीचीत झाल्याचे वाटले.

भारतीय संघानेही विकेटचे सेलीब्रेशन केले. तिक्षणालाही तो वेळेत क्रिजमध्ये पोहचला नसल्याचे वाटले आणि तो माघारी जायला निघाला. पण पंचांनी टीव्ही अंपायरकडे याबाबत रिव्ह्यूची मागणी केली. त्यानंतर रिप्लेमध्ये दिसले की पंतने स्टंपवरील बेल्स उडवण्याआधीच तिक्षणाची बॅट क्रिजमध्ये पोहचली होती. त्यामुळे तो नाबाद असल्याचे स्पष्ट दिसले.

पण पुन्हा यावेळी एक गोंधळ झाला टीव्ही अंपायरने त्याला नाबाद देण्याऐवजी आधी बाद असं दिसलं, पण चूक लक्षात येताच लगेचच नाबाद दिलं. बाद आणि मग नाबाद असं मोठ्या स्क्रिनवर पाहून पहिले प्रेक्षकांबरोबरच श्रीलंकेचा मुख्य प्रशिक्षक सनथ जयसूर्याही गोंधळला. पण झालेली घटना पाहून त्यालाही हसू आवरता आले नाही.

दरम्यान, तिक्षणा जीवदानानंतर अखेरच्या षटकात २ चेंडू खेळण्याची संधी मिळाली, ज्यात त्याने तीन धावा काढल्या.

दरम्यान, समन्याबद्दल सांगायचे झाले, तर श्रीलंकेने प्रथम फलंदाजी करताना ५० षटकात ७ बाद २४८ धावा केल्या. श्रीलंकेकडून अविष्का फर्नांडोने १०२ चेंडूत ९ चौकार आणि २ षटकारांसह ९६ धावा केल्या. यष्टीरक्षक कुशल मेंडिसने ८२ चेंडूत ५९ धावांची खेळी केली. याशिवाय पाथम निसंकाने ६५ चेंडूत ४५ धावांची खेळी केली. त्याचबरोबर कामिंडू मेंडिसने २३ धावांची नाबाद खेळी केली.

भारताकडून गोलंदाजी करताना रियान परागने सर्वाधिक ३ विकेट्स घेतल्या, तर मोहम्मद सिराज, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर आणि कुलदीप यादव यांनी प्रत्येकी १ विकेट घेतली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Adani Project Cost Reduction : अदानींच्या साताऱ्यातील ५,६७५ कोटींचा प्रकल्पात थेट ९९ टक्के कपात; सह्याद्री जंगल संवर्धन रक्कमही केली कमी, केंद्र सरकारकडून चौकशीचे आदेश

'रामायण'मधील तो थरारक सीन हिंदीतून कट! राम-सीता अन् लक्ष्मणाचा Deleted Video व्हायरल; पाहून अंगावर येईल काटा

IND vs NZ 4th ODI Live: W,W,W! रोहित शर्मा, विराट कोहली, श्रेयस अय्यर OUT; भारताने शून्य धावांत गमावले ३ शिलेदार, मॅट हेन्रीचा कहर

Latest Marathi News Live Update : नंदुरबार दौऱ्यावर असलेल्या अदिती तटकरे दौरा अर्धवट सोडून तातडीने मुंबईला रवाना

Sonia Farande Success Story : वडिलांनी पाहिलेलं 'स्वप्न' लेकीनं केलं पूर्ण! MPSC परीक्षेत बाजी मारत आनेवाडीच्या सोनियाची सहायक नगर रचनाकारपदी निवड, संपूर्ण तालुक्याला अभिमान

SCROLL FOR NEXT