Danielle Wyatt weds Georgie Hodge  Sakal
Cricket

Danielle Wyatt: विराटला लग्नाची मागणी घालणारी इंग्लंडची क्रिकेटपटू गर्लफ्रेंडसोबत अडकली विवाहबंधनात, पाहा Photo

Danielle Wyatt Marriage: इंग्लंडची स्टार क्रिकेटपटू डॅनिएल वॅट तिच्या गर्लफ्रेंडबरोबर लग्नबंधनात अडकली आहे.

Pranali Kodre

Danielle Wyatt weds Georgie Hodge: इंग्लंड महिला क्रिकेट संघाची स्टार फलंदाज डॅनिएल वॅटने सोशल मीडियावर खास पोस्ट करत एक गोड बातमी दिली आहे. तिने पोस्ट करत ती लग्नबंधनात अडकली असल्याचे स्पष्ट केले आहे. वॅटने तिची गर्लफ्रेंड जॉर्जी हॉज हिच्याबरोबर लग्न केले आहे.

डॅनी आणि जॉर्जी या दोघीही गेल्या अनेक वर्षांपासून रिलेशनशीपमध्ये होत्या. त्यांनी गेल्यावर्षी मार्च महिन्यात एंगेजमेंट केली होती. त्यावेळी सर्वांना डॅनी जॉर्जीबरोबर रिलेशनशीपमध्ये असल्याचे समजले होते. आता एंगेजमेंटनंतर जवळपास एक वर्षांनंतर डॅनी आणि जॉर्जी यांनी लग्न केले आहे.

त्यांनी लग्न सोहळ्यातील काही निवडक फोटो सोशल मीडियावर शेअर केले असून त्याला कॅप्शन दिले आहे की 'आम्ही हे अधिकृत करत आहोत.'. त्यांच्या या पोस्टवर अनेक आजी-माजी खेळाडूंनी कमेंट करत त्यांचे अभिनंदन करत शुभेच्छा दिल्या आहेत.

जॉर्जी ही इंग्लंडमधील फुटबॉल एजंट आहे. ती लंडनमध्येच राहते. ती सीएए बेस महिला फुटबॉलची प्रमुखही आहे.

लक्षात घेण्यासारखी गोष्ट अशी की मनोरंजक गोष्ट अशी की डॅनीने 2014 साली भारताचा स्टार फलंदाज विराट कोहलीला लग्नाची मागणी घातली होती. तिने ट्वीट करत 'माझ्याशी लग्न करशील का?', असा प्रश्न विचारला होता. पण नंतर तिने तो फक्त एक गमतीचा भाग असल्याचे स्पष्ट केले होते.

डॅनीची अनेक भारतीय खेळाडूंबरोबर चांगली मैत्री आहे. ती भारताचा दिग्गज क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुनबरोबरही चांगली मैत्री आहे.

डॅनीने तिच्या कारकि‍र्दीत 2 कसोटी सामने खेळले आहेत, ज्यात तिने एका अर्धशतकासह 129 धावा केल्या आहेत. तिने 110 वनडेत 2 शतके आणि 5 अर्धशतकांसह 1907 धावा केल्या आहेत. तिने 27 विकेट्सही घेतल्या आहेत.

तसेच तिने 156 आंतरराष्ट्रीय टी20 सामन्यांत 2 शतके आणि 14 अर्धशतकांसह 2726 धावा केल्या आहेत. त्याचबरोबर 46 विकेट्स घेतल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vaibhav Suryavanshi इंग्लंडविरुद्ध विश्वविक्रमी शतक केल्यानंतर शुभमन गिलचं नाव घेत म्हणतोय, आता लक्ष्य २०० धावा; VIDEO

Crime News: "ऐका! आता मी शारीरिक संबंध ठेवणार नाही, माझ्या नवऱ्याला...", प्रियकर मानलाच नाही शेवटी असा धडा शिकवला की...

Thane Politics: पुलाचे घाईत उद्घाटन, चालकांचा जीव धोक्यात, गुन्हा दाखल करा; ठाकरे गट आक्रमक

संतापजनक घटना! 'फोटो व्हायरल करण्याची धमकी देवून महिलेवर अत्याचार'; उरुळी कांचन पोलिसांकडून दोघांना अटक

Pune Accident: 'आषाढी एकादशी दिवशीच पती-पत्नीचा अपघाती मृत्यू'; वारीवरून परतत असताना काळाचा घाला, परिसरात हळहळ

SCROLL FOR NEXT