Team India Sakal
Cricket

IND vs SL: मॉर्ने मॉर्केल नाही, तर 'हा' माजी भारतीय खेळाडू श्रीलंका दौऱ्यात असणार टीम इंडियाचा गोलंदाजी प्रशिक्षक

Team India Bowling Coach: जुलैच्या अखेरीस होणाऱ्या श्रीलंका दौऱ्यासाठी मॉर्ने मॉर्केल उपलब्ध नसल्याने भारतीय संघाच्या गोलंदाजी प्रशिक्षकाची जबाबदारी माजी भारतीय क्रिकेटपटूच्या खांद्यावर सोपवण्यात आली आहे.

Pranali Kodre

India Bowling Coach for Sri Lanka Tour: भारतीय क्रिकेट संघाला जुलैच्या अखेरीस श्रीलंका दौऱ्यावर जायचे आहे. २७ जुलैपासून चालू होणाऱ्या श्रीलंका दौऱ्यात भारताला ३ वनडे आणि ३ टी२० सामने खेळायचे आहेत.

या दौऱ्यासाठी भारतीय संघाची निवडही झाली आहे. आता या दौऱ्यासाठी भारतीय संघासह प्रभारी गोलंदाजी प्रशिक्षक म्हणून माजी क्रिकेटपटू साईराज बहुतुले जाणार आहे. बहुतुले हे झिम्बाब्वे दौऱ्यातही भारतीय संघासह होते. तसेच ते राष्ट्रीय क्रिकेट अकादमीमध्ये गेल्या काही वर्षांपासून काम करत आहेत.

बहुतुले यांनी भारतासाठी २ कसोटी आणि ८ वनडे सामने खेळले आहेत. कसोटीत ३ विकेट्स आणि वनडेत २ विकेट्स घेतल्या आहेत. देशांतर्गत क्रिकेटमध्ये त्यांची शानदार कामगिरी राहिली आहे. १८८ प्रथम श्रेणी सामन्यांत त्यांनी ६३० विकेट्स घेतल्या आहेत, तर १४३ लिस्ट ए क्रिकेटमध्ये १९७ विकेट्स घेतल्या आहेत.

क्रिकबझने दिलेल्या वृत्तानुसार सध्या मॉर्ने मॉर्केल उपलब्ध नसल्याने बहुतुले यांना संधी दिल्याचे सांगितले जात आहे.

आगामी श्रीलंका दौरा हा गौतम गंभीरचाही भारताचा मुख्य प्रशिक्षक म्हणून पहिलाच दौरा आहे. दरम्यान, बीसीसीआयने आत्तापर्यंत नव्या मुख्य प्रशिक्षकाची नियुक्ती केली असली, तरी बाकी सहाय्यक प्रशिक्षकांची नियुक्ती केलेली नाही.

पण मिडिया रिपोर्ट्सनुसार श्रीलंका दौऱ्यासाठी बीसीसीआयने सपोर्ट स्टाफमध्ये सहाय्यक प्रशिक्षक म्हणून अभिषेक नायर आणि रायन टेन डोईशेट यांचा समावेश केला आहे.तसेच क्षेत्ररक्षक प्रशिक्षक म्हणून टी दिलीप यांना कायम केले आहे.

टी दिलीप यापूर्वीही राहुल द्रविडच्या सपोर्ट स्टाफचा भाग होते. टी२० वर्ल्ड कपनंतर राहुल द्रविडसह सपोर्ट स्टाफमधील विक्रम राठोड, पारस म्हाब्रे आणि टी दिलीप यांचा कार्यकाळ संपला होता. पण टी दिलीप यांना पुन्हा क्षेत्ररक्षक प्रशिक्षक म्हणून कायम केले जाणार असल्याचे समजत आहे.

याशिवाय अभिषेक नायर आणि डोईशेट यांनाही श्रीलंका दौऱ्यानंतरही गंभीरच्या सपोर्ट स्टाफमध्ये सामील केले जाण्याची शक्यता आहे. याशिवाय गोलंदाजी प्रशिक्षकासाठी मॉर्केलची चर्चा आहे. कदाचीत तो श्रीलंका दौऱ्यानंतर भारतीय संघासाठी उपलब्ध राहू शकतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Almatti Dam Water Level : कोल्हापूर-सांगलीवर पुन्हा महापुराचे सावट? कर्नाटक सरकारने नियम मोडल्याने चिंता वाढली, आलमट्टीत पाणी पातळी 518.88 मीटरवर..

Devendra Fadnavis: मी महाराष्ट्रातच राहणार; दिल्लीतील नियुक्तीच्या चर्चांवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा पूर्णविराम

Latest Marathi News Live Update : एसआयआर मोहिमेमुळे ग्रामपंचायतींच्या निवडणुका लांबण्याची शक्यता

Thane News: शहापुरात ढगफुटीसदृश पाऊस! हनुमान धबधब्याला पूर, ५ जण गेले वाहून; थरारक व्हिडिओ व्हायरल

WI vs PAK 1st Test: बाबर आझम पुन्हा अपयशी... विंडीज पाकिस्तानी कर्णधाराने संतापून हेल्मेटवर मारली बॅट Video Viral

SCROLL FOR NEXT