gautam gambhir Rohit Sharma Virat kohli IND vs SL  sakal
Cricket

सुट्टी संपली, कामावर या! Gautam Gambhir ॲक्शन मोडवर, रोहित, विराट, जसप्रीतला पाठवला मॅसेज

Gautam Gambhir Rohit Sharma Virat kohli: ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेनंतर भारताच्या सीनियर्सनी निवृत्ती जाहीर केली आणि सुट्टीवर गेले.

सकाळ डिजिटल टीम

Gautam Gambhir in action mode: ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेतील विजेत्या संघातील खेळाडूंची सुट्टी आता संपण्याच्या मार्गावर आहे. ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या फायनलमध्ये टीम इंडियाने बाजी मारून ११ वर्षांचा आयसीसी स्पर्धेचा दुष्काळ संपवला. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या फायनलनंतर रोहित शर्मा ( Rohit Sharma), Virat Kohli, रवींद्र जडेजा यांनी आंतरराष्ट्रीय ट्वेंटी-२० क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. आता टीम इंडियात स्थित्यंतरे पाहायला मिळणार आहेत. पण, अजूनही मिशन आयसीसी स्पर्धा असल्याने सीनियर्स खेळाडूंची गरज संघाला आहे.

ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेनंतर बरेच सीनियर खेळाडू विश्रांतीवर गेले. रोहित शर्मा, विराट कोहली व रवींद्र जडेजा आपापल्या कुटुंबियांसोबत टाईम स्पेंट करत आहेत. विराट लंडनमध्ये गेल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. अशात टीम इंडियाचा नवा मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर ( Gautam Gambhir Head Coach) कामाला लागला आहे. त्याच्यासमोर चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५, ट्वेंटी-२० वर्ल्ड कप २०२६, जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धा ( WTC) अशी आव्हानं आहेत. २०२७ पर्यंत गौतम गंभीरचा टीम इंडियासोबत कार्यकाळ असणार आहे आणि या कालावधीत भारताला आणखी ICC स्पर्धा जिंकून देण्याचा त्याचा निर्धार आहे.

गौतम गंभीरच्या मार्गदर्शनाखाली भारताचा पहिला दौरा श्रीलंकेत होणार आहे. India vs Sri Lanka वन डे मालिकेसाठी गौतमला सर्व सीनियर खेळाडू हवे आहेत. वर्ल्ड कपनंतर झिम्बाब्वे दौऱ्यावर भारताचा युवा संघ गेला आणि पाच सामन्यांची ट्वेंटी-२० मालिका ४-१ अशी जिंकली. पण, त्या दौऱ्यावर व्ही व्ही एस लक्ष्मण संघाचा प्रभारी प्रशिक्षक म्हणून गेला होता. भारताचा मुख्य संघ गौतमच्या मार्गदर्शनखाली श्रीलंकेत ३ ट्वेंटी-२० व ३ वन डे सामन्यांची मालिका खेळणार आहे.

रोहितने ट्वेंटी-२०तून निवृत्ती घेतल्यानंतर भारताच्या ट्वेंटी-२० संघाच्या कर्णधारपदासाठी हार्दिक पांड्याचे ( Hardik Pandya) हे नाव आघाडीवर आहे. पण, आगामी वन डे स्पर्धा लक्षात गौतमला IND vs SL वन डे मालिकेत सीनियर खेळाडू हवे आहेत. त्यामुळेच त्याने रोहित, विराट, जसप्रीत व जडेजा यांना वन डे मालिकेसाठी सुट्टी संपवून परत या असे सांगितले आहे. हे सीनियर खेळाडू गौतमला वन डे संघात हवेच आहेत, असे वृत्त इंडियन एक्स्प्रेसने प्रसिद्ध केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Donald Trump Tariff : डोनाल्ड ट्रम्प यांचा जपान अन् दक्षिण कोरियाला मोठा धक्का! ; २५ टक्के टॅरिफ लादण्याची घोषणा

Modi Government and Farmers : शेतकऱ्यांसाठी GOOD NEWS! ; कृषीमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी दिली मोठी माहिती, 'आता लवकरच...'

Pachod News : शिक्षकांना चक्क विद्यार्थ्यांच्या गणवेषाचीही हवीय टक्केवारी; शिक्षकाने केली पुरवठादाराकडे टक्केवारीची मागणी

Nationwide strike : मोठी बातमी! देशभरात तब्बल २५ कोटी कर्मचारी संपावर जाणार; सर्वसामान्यांना कोणत्या कामांमध्ये फटका बसणार?

ENG vs IND, 3rd Test: लॉर्ड्स कसोटीसाठी भारताच्या प्लेइंग-११ मध्ये बदल निश्चित! बुमराहसाठी 'या' खेळाडूला डच्चू मिळणार?

SCROLL FOR NEXT