
Ganesh Chaturthi 2025 : तुम्हाला आठवत असेल लहानपणी मोठी माणंस सांगायची की, गणपती बाप्पा आलेत आज चुकूनही चंद्र पाहू नको, तेव्हा फक्त ऐकायचो पण चुकून चद्र दर्शन घेतलं जायचं. त्यामागे एक कथा आहे आणि जर आजच्या दिवशी तुम्ही चंद्राचे दर्शन घेतले. तर, त्यावर काय उपाय करावे हे पाहुयात.
आज चंद्र दर्शन का करू नये?
गणपतीला हत्तीचे मुख प्राप्त झाल्यानंतर सर्वजण त्यांना गजमुख म्हणायला लागले. यातच गणपती बाप्पाची शरीर प्रकृती स्थुल होती. मात्र त्यांच्या अफाट बुद्धीमत्तेचा सर्वजण आदर करत. पण चंद्र मात्र गणपतीच्या या रुपाला सदैव नाव ठेवत असे. कारण चंद्राला त्याच्या सौंदर्याचा गर्व झाला होता.
एकदा गणपती बाप्पा आपल्या उंदरावर बसून घाईघाईने जात होते. उंदराला अचानक वाटेत साप दिसला त्यामुळे तो दचकला. उंदीर दचकल्याने त्यावर बसलेले गणपती बाप्पा टुणूकन खाली पडले. तेव्हा त्याला चंद्र उपहासाने हसायला लागला. तें पाहून गणपतीला चंद्राचा फार राग आला. गणपतीने चंद्राला शाप दिला की "आजपासून तुझें कोणी तोंड पाहणार नाही.