Gautam Gambhir 3 different teams in future sakal
Cricket

३ फॉरमॅट, ३ संघ? जसप्रीतचे कौतुक अन् सपोर्ट स्टाफची घोषणा; Gautam Gambhir ची स्पष्ट भूमिका

IND vs SL Press Conference; Gautam Gambhir on 3 formats, 3 teams: श्रीलंका दौऱ्यासाठी भारतीय संघ आज रवाना झाला. नवीन मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीरने श्रीलंकेला रवाना होण्यापूर्वी पत्रकार परिषद घेतली.

Swadesh Ghanekar

Gautam Gambhir Press Conference Live: भारतीय संघ ३ ट्वेंटी-२० सामन्यांच्या मालिकेसाठी श्रीलंका दौऱ्यासाठी मुंबईहून रवाना झाला. २ ऑगस्टपासून सुरू होणाऱ्या वन डे मालिकेसाठी उर्वरित संघ लवकरच श्रीलंकेत दाखल होईल. तत्पूर्वी, मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर आणि निवड समिती प्रमुख अजित आगरकर ( Ajit Agarkar) यांनी मुंबईतील पंचतारांकित हॉटेलमध्ये पत्रकार परिषद घेतली. यावेळी विविध विषयांवर दोघांनी आपापल्या भूमिका स्पष्ट केल्या.

आगरकरकडून गिलचे कौतुक

''शुभमन गिल हा तिन्ही फॉरमॅटचा खेळाडू आहे. त्याने मागील काही वर्षांत त्याच्यातले कौशल्य दाखवून दिले आहे. ड्रेसिंग रुममधूनही आम्हाला त्याच्याबद्दल हेच ऐकू आले आहे. त्याच्यातले नेतृत्व कौशल्यही सर्वांनी पाहिले आहे. त्यामुळे त्याला आम्ही संधी देण्याचे ठरवले,''असे आगरकर म्हणाला.

रिषभ पंत आणि लोकेश राहुल यांच्या वन डे संघातील निवडीबाबत आगरकरला विचारले असता तो म्हणाला,''रिषभ पंत बराचकाळ मैदानाबाहेर होता. त्यामुळे त्याच्यावर कोणतेही दडपण न लादता आम्हाला त्याला संघात आणायचे होते. प्रदीर्घ काळानंतर एखादा खेळाडू संघात येत असेल तर त्याला वेळही द्यायला हवा. लोकेश राहुलने त्याच्या कामगिरीतून स्वतःला सिद्ध केले आहे.''

भविष्यात ३ फॉरमॅट तीन संघ?

पत्रकार परिषदेत गौतम गंभीरला भविष्यात ३ फॉरमॅटसाठी तीन संघ दिसतील का? असे विचारले गेले. तो म्हणाला, ''पुढे जात असताना अशा गोष्टी होऊ शकतात. पण, आताच ३ वेगवेगळे संघ असतील, यावर भाष्य करणे योग्य ठरणार नाही. ट्वेंटी-२० क्रिकेट संघात स्थित्यंतर होतंय, वर्ल्ड क्लास खेळाडूंनी निवृत्ती घेतली आहे. सर्व फॉरमॅट खेळणारे जास्त खेळाडू असणे कधीही चांगले.''

यावेळी गौतम गंभीरने जलदगती गोलंदाज जसप्रीत बुमराह याचेही कौतुक केले. तो म्हणाला,''मी यापूर्वीही सांगितले आहे की, जसप्रीत बुमराहसारख्या खेळाडूसाठी वर्कलोड मॅनेजमेंट करणे महत्त्वाचे आहे. जो खेळाडू चांगल्या फॉर्मात आहे, तो सर्व सामने खेळू शकतो. वर्कलोड व्यवस्थापन हे केवळ बुमराहसाठी नव्हे, तर सर्व जलदगती गोलंदाजांसाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. ''

गौतम गंभीरने त्याच्या सपोर्ट स्टाफमध्ये अभिषेक नायर आणि रायन टॅन डोइचेट यांची सहाय्यक प्रशिक्षक म्हणून निवड पक्की झाल्याचे सांगितले. त्याशिवाय साईराज बहुतुले व टी दिलीप हे श्रीलंका दौऱ्यावर सपोर्ट स्टाफ म्हणून येत असल्याची माहिती त्याने दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

माझ्या तोंडात शिव्या येतायत... कुंभमेळ्यासाठी झाडं तोडणाऱ्या सरकारला सयाजी शिंदेंनी विचारला जाब; आवाज उठवणाऱ्याला दाबलं जातंय...

Local Body Elections: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका रद्द होणार? ५० टक्क्यांवरील आरक्षण ‘ट्रिपल टेस्ट’च्या कचाट्यात!

Latest Marathi News Live Update : अंधेरीत एका घरातील टॉयलेटच्या फ्लश टँकमध्ये शेकडो मतदार ओळखपत्र सापडल्याने खळबळ

Viral Video: मुलाच्या स्कूल बॅगमध्ये लंच बॉक्स ऐवजी नोटांचे बंडल, पाहून आईला धक्का; सत्य समजल्यावर तरळले आनंदाश्रू, हृदयस्पर्शी व्हिडिओ

Ashes 2025 : नाद करती काय! स्टार्कने मोडलं इंग्लंडचं कंबरडं, 14 वर्षांच्या कारकिर्दीत पहिल्यांदाच केला 'असा' पराक्रम

SCROLL FOR NEXT