Hardik Pandya Natasa Stankovic divorced News sakal
Cricket

Hardik-Natasa Divorce : चार वर्षाच्या संसारानंतर हार्दिक पांड्या अन् नताशामध्ये घटस्फोट! मुलाबद्दल घेतला 'हा' निर्णय

Hardik Pandya and Natasa Stankovic Divorce News : "आम्ही नाते वाचवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले, पण..." घटस्फोटाच्या या वृत्ताला हार्दिक पांड्याने दुजोरा दिला आहे.

Kiran Mahanavar

Hardik Pandya Natasa Stankovic Divorce confirmed : टीम इंडियाचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्याने त्याची पत्नी नताशा स्टॅनकोविचसोबत घटस्फोट घेतला आहे. हार्दिक पांड्या आणि नताशाने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करून ही माहिती दिली.

गेल्या अनेक दिवसांपासून ते वेगळे होणार असल्याच्या बातम्या येत होत्या. नुकतीच नताशाही तिच्या आई-वडिलांच्या घरी गेली. अंबानींच्या लग्नातही हार्दिक एकटाच मस्ती करताना दिसला.

सोशल मीडियावर पोस्ट शेअर करून हार्दिकने हा निर्णय दोघांसाठी किती कठीण होता हे सांगितले. त्याने लिहिले की, चार वर्षे एकत्र राहिल्यानंतर नताशा आणि मी वेगळे होण्याचा निर्णय घेतला आहे. आम्ही नाते वाचवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले, सर्व काही दिले. पण आता आम्हा दोघांना हाच निर्णय योग्य आहे असे वाटते. हा आमच्यासाठी खूप कठीण निर्णय होता.

अगस्त्यबद्दल घेतला 'हा' निर्णय (Son Agastya Custody After Divorce)

यामध्ये त्यांनी अगस्त्यबद्दल लिहिले की, 'अगस्त्य दोघांच्या आयुष्याचा एक भाग राहील. आम्ही दोघेही त्याचे पालकत्व सांभाळून त्याला शक्य तितका आनंद देण्याचा प्रयत्न करू. आम्हाला आशा आहे की तुमचा पाठिंबा मिळेल आणि या कठीण काळात तुम्ही आम्हाला समजून घ्याल.

हार्दिक पांड्या आणि नताशाच्या घटस्फोटाच्या बातम्या बऱ्याच दिवसांपासून गाजत होत्या. पांड्या आणि नताशा यांनी दोनदा लग्न केले होते. यापूर्वी 2020 मध्ये लॉकडाऊनमध्ये दोघांनी लग्न केले होते. त्यानंतर गेल्या वर्षी फेब्रुवारीमध्येही हार्दिक आणि नताशाने पुन्हा लग्न केले. यावेळी भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या जोडप्याने उदयपूरमध्ये शाही पद्धतीने दुसरे लग्न केले. नवीन वर्ष 2020 च्या निमित्ताने हार्दिकने नताशाच्या एंगेजमेंटची घोषणा केली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray : ''...अन् बाळासाहेबांनी मराठीसाठी सत्तेवर लाथ मारली''....राज ठाकरेंनी सांगितला २६ वर्षांपूर्वीचा तो किस्सा!

Manoj Jarange: मनोज जरांगे पाटील यांना नारायण गडावर महापूजेचा मान; मराठा समाजाचा सन्मान!

गेटवर वाट बघत थांबलेला एकटा शूटर, ६ सेकंदात भाजप नेत्याची हत्या; CCTV फूटेज समोर

Latest Maharashtra News Updates : सहकार क्षेत्राला शैक्षणिक बळ देणारा ऐतिहासिक टप्पा : केंद्रीय गृहमंत्री व सहकारमंत्री

Delhi Crime: शहर हादरलं! एकाच कुटुंबातील चौघांचे मृतदेह घरात आढळले; मृत्यू कशामुळे?

SCROLL FOR NEXT