Cricket

IND vs BAN 2nd Test : कानपूर कसोटीत सुरक्षारक्षक म्हणून बोलावले Langurs; ऐकावं तर नवलंच, का केलाय हा जुगाड?

India vs Bangladesh 2nd Test : आकाश दीपने भारतीय संघाला कानपूर कसोटीच्या पहिल्या सत्रात चांगली पकड मिळवून दिली आहे.

Swadesh Ghanekar

India vs Bangladesh 2nd Test Marathi Updates : भारत-बांगलादेश यांच्यातल्या कानपूर कसोटीसाठी स्टेडियमवर लंगूर ( मोठ्या शेपटीचं माकड) आणि माकड पळवणाऱ्या कर्मचाऱ्यांना सुरक्षिततेसाठी ठेवले गेले आहे. हे ऐकायला थोडं अजब वाटतंय ना, परंतु हे खरं आहे. कानपूरच्या ग्रीन पार्क स्टेडियमवर दुसरा कसोटी सामना सुरू आहे आणि आकाश दीपने ( Akash Deep) दोन विकेट्स घेऊन भारताला सामन्यावर पकड मिळवून दिली आहे. पण, चर्चा रंगतेय ती LANGURS सुरक्षा रक्षकांची...

कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. भरताने घरच्या मैदानावरील मागील ९ वर्षांत प्रथमच नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे. ९व्या षटकात आकाश दीपने बांगलादेशला पहिला धक्का दिला. यशस्वी जैस्वालने चौथ्या स्लिपला जाकिर हसनचा ( ०) सुरेख झेल टिपून बांगलादेशला २६ धावांवर धक्का दिला. आकाशने त्याच्या पुढच्या षटकात शादमन इस्लामला ( २४) पायचीत पकडले.

लंगूर कशासाठी...

उत्तर प्रदेश क्रिकेट असोसिएशनने ( UPCA) ग्रीन पार्कवर अन्न चोरणाऱ्या माकडांना हिसकावून लावण्यासाठी लंगूर्स व मदाऱ्यांना बोलावले आहे. स्टेडियमचे संचालक संजय कपूर यांनी इंडियन एस्क्प्रेसला सांगितले की, येथे माकडं अन्न व ड्रिंक्स चोरतात आणि या माकडांची दहशत रोखण्यासाठी लंगूर्स आणले गेले आहेत.

यापूर्वीही कानपूर येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय सामन्यांत असा जुगाड केला गेला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Maharashtra News Updates : उल्हासनगरहून विजय मेळाव्यासाठी कार्यकर्ते रवाना

Kondhwa Case कुरिअर बॉय बनून नेहमी फ्लॅटवर यायचा, शरीरसंबंधावरून बिनसलं अन् तरुणीने पोलीस ठाणं गाठलं; तरुणाला माहितीच नाही आपण....

'या' चित्रपटाआधी भारतात नव्हतं संतोषी माताचं मंदिर, सिनेमा आला अन् सुरु झाले व्रत-उपास! चित्रपट पाहण्यासाठी चप्पल काढून जायचे प्रेक्षक

D Gukesh: ज्या कार्लसनने 'कमजोर' म्हणून हिणवलं, त्याच्याच नाकावर टिच्चून गुकेशनं 'रॅपिड' स्पर्धेचं जेतेपद जिंकलं

Nagpur News: ऐकावं ते नवलच! मृत व्यक्तीला दिलं रहिवासी प्रमाणपत्र; वाडी नगरपरिषदेच्या कारभारावर गंभीर प्रश्न

SCROLL FOR NEXT