IND vs BAN 2nd Test esakal
Cricket

IND vs BAN 2nd Test : बॅटिंग पिचवर Rohit Sharma ने गोलंदाजी का करायचं ठरवलं? त्या एका गोष्टीमुळे Kuldeep Yadav संघाबाहेर राहिला

India vs Bangladesh 2nd Test : भारतीय संघाने दुसऱ्या कसोटीच्या पहिल्या सत्रात चांगली पकड घेतली आहे. आकाश दीपने दोन धक्के देताना बांगलादेशला बॅकफूटवर फेकले.

Swadesh Ghanekar

India vs Bangladesh 2nd Test Marathi Updates : कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा धाडसी निर्णय घेतला. भरताने घरच्या मैदानावरील मागील ९ वर्षांत प्रथमच नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे, तर १९६४ नंतर कानपूर येथे असा निर्णय घेणारा रोहित पहिलाच भारतीय कर्णधार ठरला. १९६४ मध्ये पतौडी ज्युनियर यांनी इंग्लंडविरुद्ध असा निर्णय घेतला होता आणि तो सामना ड्रॉ राहिला होता.

भारताच्या संघात आज बदल पाहायला मिळेल अशी अपेक्षा होती, परंतु त्याच प्लेइंग इलेव्हनसह टीम उतरली. कुलदीप यादवला पुन्हा एकदा बाकावर बसवून ठेवले गेले. रोहितने असा निर्णय का घेतला, हा प्रश्न सर्वांचा पडला होता.

  • आज आठव्या षटकात रोहितला फिरकीपटू आर अश्विनला बोलवावे लागले. कानपूरची कसोटी फलंदाजांसाठी पोषक होती आणि भारताने टॉसही जिंकला होता. पण, ढगाळ वातावरण पाहून रोहितने तीन जलदगती गोलंदाजांसह मैदानावर उतरण्याचा निर्णय घेतला.

  • पावसामुळे खेळपट्टीवर दव असल्याने भारताने तीन जलदगती गोलंदाजांसह मैदानावर उतरण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे कुलदीप यादवला प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी मिळाली नाही. तेच दुसरीकडे बांगलादेश तीन फिरकीपटूंसह मैदानावर उतरला.

भारताचा संघ: रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जैस्वाल, शुभमन गिल, विराट कोहली, लोकेश राहुल, ऋषभ पंत, आर अश्विन, रवींद्र जडेजा, मोहम्मद सिराज, आकाश दीप, जसप्रीत बुमराह

आकाश दीपला यश...

आकाश दीपने बांगलादेशच्या दोन्ही सलामीवीरांना माघारी पाठवून भारताला सामन्यावर मजबूत पकड मिळवून दिली आहे. १५ षटकांत बांगलादेशने ४६ धावांत २ विकेट्स गमावल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai News: देशातील सर्वात श्रीमंत महानगरपालिका, पण सुरक्षा कच्ची! बीएमसी मुख्यालयातील बॅग स्कॅनर बंद; सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह

Tenancy Agreement Rule: भाडेकरू आणि घरमालकांनो लक्ष द्या... सरकारकडून ‘नवीन भाडे करार २०२५’ लागू; काय आहेत नवे नियम?

Dondaicha News : दोंडाईचा नगर परिषदेत भाजपचा ऐतिहासिक विजय; नगराध्यक्षांसह ७ नगरसेवक बिनविरोध

Kolhapur Shivaji University: पदव्युत्तर अभ्यासकेंद्रांना कुलूप, अभ्यासक्रम बंद करण्यासाठी महाविद्यालयांचा प्रस्ताव

Jaykumar Rawal : तोंडाला फेस आणणारी घोडदौड; दोंडाईचा निवडणुकीत नगराध्यक्षपद व ७ जागा बिनविरोध, मंत्री जयकुमार रावल यांचा वरचष्मा

SCROLL FOR NEXT