SHUBMAN GILL  esakal
Cricket

IND vs ENG 2nd Test: शुभमन गिलच्या ३००+ धावा! मोडला विराट कोहलीचा ११ वर्षांपूर्वीचा विक्रम, रिषभ पंतचीही फिफ्टी

IND vs ENG 2nd Test Day 4 Marathi News: इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीत शुभमन गिलने इतिहास रचला आहे. कसोटी कर्णधार म्हणून पदार्पण करणाऱ्या गिलने एका सामन्यात एकूण ३०० पेक्षा जास्त धावा करत विराट कोहलीचा ११ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला.

Swadesh Ghanekar

India vs England 2nd Test Day 4 Live Updates in Marathi Cricket News : कर्णधार शुभमन गिल आणि रिषभ पंत यांनी आक्रमक फटकेबाजी करताना टीम इंडियाला दुसऱ्या डावात ४०४ धावांची आघाडी मिळवून दिली आहे. लोकेश राहुलच्या अर्धशतकानंतर गिल व पंत यांनी अर्धशतक पूर्ण करताना संघाला ४४ षटकांत ३ बाद २२४ धावांपर्यंत पोहोचवले आहे. पहिल्या डावात २६९ धावा करणाऱ्या गिलने दुसऱ्या डावातील अर्धशतकासह मोठ्या विक्रमाला गवसणी घातली.

हॅरी ब्रूक ( १५४) व जेमी स्मिथ ( १८८*) यांच्या खेळीनंतरही इंग्लंडचा पहिला डाव ४०७ धावांवर गुंडाळून भारताने पहिल्या डावात १९५ धावांची आघाडी घेतली. त्यानंतर दुसऱ्या डावात आक्रमक खेळ केली. यशस्वी जैस्वाल ( २८) व लोकेश राहुल यांच्या अर्धशतकी सलामीला जॉश टंगने धक्का दिला. चौथ्या दिवशी ब्रेडन कार्सने भारताला दुसरा धक्का देताना करुण नायरला ( २६) बाद केले. राहुलसह त्याची ४५ धावांची भागीदारी संपुष्टात आली.

राहुलने अर्धशतक पूर्ण करातना मुरली विजय व वीरेंद्र सेहवाग यांचा विक्रम मोडला. SENA देशांमध्ये सलामीवीर म्हणून राहुलचे ही दहावी ५०+ धावांची खेळी ठरली आणि त्याने मुरली व वीरू ( ९) यांना मागे टाकले. टंग सेट फलंदाज राहुल ८४ चेंडूंत १० चौकारांसह ५५ धावांवर बाद झाला.रिषभ पंतने आक्रमक फटकेबाजी केली. त्याचे चौकार-षटकार पाहून इंग्लंडचे सर्व डावपेच फकले. भारताने पहिल्या सत्रात २५ षटकांत २ विकेट्सच्या मोबदल्यात ११३ धावा केल्या.

लंच ब्रेकनंतर गिलनेही सूर बदलला आणि टंगच्या षटकात ६,४,४ असे फटके खेचले. गिलने चौकारासह ५७ चेंडूंत कसोटीतील आठवे अर्धशतक पूर्ण केले. यासह त्याने SENA देशांमध्ये एका कसोटीत ३०० + धावांचा विक्रम केला आणि असा पराक्रम करणारा तो पहिलाच भारतीय कर्णधार ठरला. राहुल द्रविड ( २००३) व सचिन तेंडुलकर ( २००४ ) यांनी ऑस्ट्रेलियात खेळाडू म्हणून असा पराक्रम केला. विराट कोहलीने २०१७ मध्ये श्रीलंकेविरुद्ध घरच्या मैदानावरील दिल्ली कसोटीत २९३ धावा केल्या होत्या.

कसोटी संघाचा कर्णधार म्हणून पदार्पणाच्या मालिकेत सर्वाधिक धावा

  • ४५९* धावा - शुभमन गिल वि. इंग्लंड, २०२५ ( अवे)

  • ४४९ धावा - विराट कोहली वि. ऑस्ट्रेलिया, २०१४-१५ ( अवे)

  • ३४७ धावा - विजय हजारे वि. इंग्लंड, १९५१-५२ ( होम)

  • ३१९ धावा - नरी काँट्रॅक्टर वि. पाकिस्तन, १९६०-६१ ( होम)

पहिल्या दोन कसोटी सामन्यांमध्ये कर्णधार म्हणून सर्वाधिक धावा

  • ४८२* - शुभमन गिल

  • ४४९ - विराट कोहली

  • ४२९ - सुनील गावस्कर

  • ३६७ - स्टीव्ह स्मिथ

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Viral Video: तुझ्यापेक्षा जास्त टॅक्स देते, मराठी बोलणार नाही; पुण्यात परप्रांतीय महिलेचा कॅबचालकाशी वाद, व्हिडिओ व्हायरल

Ashadhi Ekadashi Upvas Recipes: आषाढी एकादशी स्पेशल पौष्टिक अन् चविष्ट खास २ उपवासाच्या रेसिपीज; नक्की ट्राय करा

Ladki Bahini Yojana : लाडकी बहीण योजनेतून तुमचंही नाव वगळलं नाही ना? असं करा चेक...

Latest Maharashtra News Live Updates: लांजा तालुक्यातील खोरनीनको धबधबा प्रवाहित

IT Park Kolhapur : कोल्हापुरात आय.टी. पार्कचा मार्ग अजून खडतर, कृषी महाविद्यालयाची मनधरणी करण्यातच जात आहेत दिवस

SCROLL FOR NEXT