ind vs sa 1st t20i riyan parag sakal
Cricket

Ind vs Sa 1st T20 : 'गौतम सरांनी मला आधीच सांगितलं होतं की...', 8 चेंडूत 3 विकेट घेणाऱ्या रियान परागचा मोठा खुलासा

Ind vs Sa 1st T20 : पहिल्या टी-20 सामन्यात भारताने श्रीलंकेचा 43 धावांनी पराभव केला. या दमदार विजयात अनेक खेळाडूंची भूमिका होती, त्यापैकी एक होता रियान पराग.

Kiran Mahanavar

Ind vs Sa 1st T20 : पहिल्या टी-20 सामन्यात भारताने श्रीलंकेचा 43 धावांनी पराभव केला. या दमदार विजयात अनेक खेळाडूंची भूमिका होती, त्यापैकी एक होता रियान पराग. रियान परागला फलंदाजीची फारशी चांगली कामगिरी करता आली नाही, पण भारताच्या क्षेत्ररक्षणादरम्यान त्याने केवळ 8 चेंडू टाकले आणि यामध्ये त्याने एक मोठी कामगिरी केली.

श्रीलंकेला हरवण्यात टीम इंडियाचा नवा खेळाडू रायन परागचा मोठा वाटा होता. फलंदाजीत तो फ्लॉप झाला असला तरी गोलंदाजी करताना त्याने त्याची भरपाई केली. रियान पराग फलंदाजी करताना केवळ 7 धावा करू शकला आणि यासाठी त्याला खूप ट्रोल करण्यात आले. मात्र, गोलंदाजी करताना त्याने सर्वोत्तम कामगिरी केली. परागने श्रीलंकेच्या तीन फलंदाजांना केवळ 1.2 षटकांत पॅव्हेलियनमध्ये पाठवले. यादरम्यान त्याने केवळ 5 धावांत 3 बळी घेतले. एकूण त्याने केवळ 8 चेंडूत 3 बळी घेतले.

पहिल्या टी-20 सामन्यात केलेल्या जबरदस्त गोलंदाजीनंतर रियान परागने मोठी प्रतिक्रिया दिली आहे. या सामन्यात रियान परागने चांगली गोलंदाजी केली आणि याचे श्रेय त्याने मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीरला दिले. रियान परागच्या म्हणण्यानुसार, गौतम गंभीरने त्याला सत्रादरम्यानच सांगितले होते की कोणत्या परिस्थितीत कोणत्या प्रकारची गोलंदाजी करावी.

सामन्यानंतर झालेल्या संवादादरम्यान रियान परागने त्याच्या उत्कृष्ट गोलंदाजीचे रहस्य सांगितले. BCCI.TV वरील संभाषणात तो म्हणाला की, अशा स्टेजसाठी सराव सत्रांमध्ये खरोखर खूप तयारी केली गेली होती. गौतम गंभीर सरांशी असाच संवाद झाला की 16व्या-17व्या षटकात जर गोलंदाजी आली आणि विकेट थोडी फिरत असेल तर कुठे गोलंदाजी करायची. मी सरावाच्या वेळी शक्य तेवढी गोलंदाजी करतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Iran US Conflict : अमेरिकेला इराणचे थेट आव्हान; ‘युद्धाची खरंच तयारी असेल तर जमिनीवर सैन्य उतरवा’

Neighboring Countries: शेजारील देशांना एकाच पारड्यात तोलू नका

Realme Smartphone: हॅरी पॉटर चाहत्यांसाठी खूशखबर! Realme 16 Proचे लिमिटेड एडिशन Flipkartवर होणार लाँच; पाहा फीचर्स!

S Jaishankar SIR Notice : परराष्ट्रमंत्री जयशंकर, सीबीआय संचालक, माजी लष्करप्रमुखांच्या कुटुंबीयांना SIR नोटीस; नेमकं प्रकरण काय?

IND A vs AUS A: CSK चा माजी स्टार खेळाडू आता भारतीय संघाचा हेड कोच! ऑस्ट्रेलियाविरुद्ध ऋतुराज-पडिक्कलच्या संघांना देणार ट्रेनिंग

SCROLL FOR NEXT