ind vs sl 1st t20 suryakumar yadav sakal
Cricket

IND vs SL : 'आम्ही भाग्यवान होतो की...', कर्णधार सूर्याला वाटत होती भीती? मॅच संपल्यानंतर केलं मोठे वक्तव्य

Suryakumar Yadav India vs Sri Lanka : शनिवारी भारताचा नवा टी-20 कर्णधार म्हणून आपल्या प्रवासाची विजयी सुरुवात करणाऱ्या सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली संघाने पहिल्या टी-20 सामन्यात श्रीलंकेचा 43 धावांनी पराभव केला.

Kiran Mahanavar

Suryakumar Yadav : शनिवारी भारताचा नवा टी-20 कर्णधार म्हणून आपल्या प्रवासाची विजयी सुरुवात करणाऱ्या सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली संघाने पहिल्या टी-20 सामन्यात श्रीलंकेचा 43 धावांनी पराभव केला. हा एक हाय स्कोअरिंग सामना होता, ज्यामध्ये लक्ष्याचा पाठलाग करताना श्रीलंका सहज जिंकेल असे एकेकाळी वाटत होते. मात्र, भारतीय गोलंदाजांनी टीम इंडियाला सामना जिंकून दिला. पण सामन्यादरम्यान कर्णधार सूर्यकुमार यादवला एका गोष्टीची भीती वाटत होती, त्याने सामना संपल्यानंतर याबाबत खुलासा केला.

या सामन्यात टीम इंडियाने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 213/7 धावा केल्या. प्रत्युत्तरात श्रीलंकेचा डाव 170 धावांवर आटोपला. एका वेळी लक्ष्याचा पाठलाग करताना श्रीलंकेची धावसंख्या 140/1 होती, त्यानंतर टीम इंडियाने सामना फिरवला.

सामन्यानंतर बोलताना भारतीय कर्णधार सूर्यकुमार यादव म्हणाला की, "श्रीलंका पहिल्याच चेंडूपासून शानदार क्रिकेट खेळत होते आणि याचे श्रेय त्यांना जाते. रात्री विकेट कशी खेळते हे आम्हाला माहीत आहे. पण आम्ही भाग्यवान होतो की दव नव्हते. वर्ल्ड कपमध्ये ज्या प्रकारे आम्ही खेळलो त्यामुळे आम्हाला आठवण झाली की सामना अजून लांब आहे.

कर्णधार सूर्यकुमार यादवने भारतासाठी सर्वात मोठी खेळी खेळली, त्याने 26 चेंडूत 8 चौकार आणि 2 षटकारांच्या मदतीने 58 धावा केल्या, ज्यामध्ये त्याचा स्ट्राइक रेट 223.08 होता. याशिवाय यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंतने 33 चेंडूंत 6 चौकार आणि 1 षटकाराच्या मदतीने 49 धावा केल्या. सलामीला आलेल्या यशस्वी जैस्वालने संघाला वेगवान सुरुवात करून दिली. या दोघांनी पहिल्या विकेटसाठी 36 चेंडूत 74 धावांची भागीदारी केली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Award List: ऑरेंज-पर्पल कॅप आणि बक्कळ पैसा... पुरस्कार सोहळ्यातही वैभव सूर्यवंशीचाच डंका! पाहा विजेत्यांची संपूर्ण यादी

IPL 2026 Final: "जितेश राव, कसं वाटतंय?" हर्षा भोगलेंच्या प्रश्नावर RCB च्या Jitesh Sharma चं मराठीतून उत्तर; म्हणाला...

Virat Kohli Reaction : "आता मॅच जिंकवण्यासाठी मला एकट्यालाच मैदानात उतरावं लागत नाही!" विराट कोहली भावुक

Vaibhav Sooryavanshi : १५ वर्षाच्या पोराने मैदान गाजवले... Orange Cap सह ५ पुरस्कार जिंकल्यानंतर म्हणाला, या पर्वात शिकलो की...

IPL 2026: वैभव सूर्यवंशीला ५ पुरस्कार अन् पैशांचा पाऊस! १५ वर्षांच्या पोराला कारसह BCCI कडून किती रुपयांचे बक्षीस मिळाले?

SCROLL FOR NEXT