India vs South Africa Women news
India vs South Africa Women news sakal
क्रिकेट

Ind vs Sa Series : भारत-दक्षिण आफ्रिका खेळणार ODI-कसोटी अन् टी-20 मालिका, 'या' महिन्यात रंगणार थरार

Kiran Mahanavar

India vs South Africa Women : दक्षिण आफ्रिकन महिला क्रिकेट संघ या वर्षी जून-जुलै महिन्यात भारत दौऱ्यावर मालिका खेळायला येणार आहे. भारत - दक्षिण आफ्रिका यांच्यामध्ये कसोटी, एकदिवसीय व टी-२० सामन्यांची मालिका खेळवण्यात येणार आहे. एकदिवसीय व टी-२० मालिका बंगळूरमध्ये, तर कसोटी चेन्नईमध्ये खेळवण्यात येणार आहे.

भारत-दक्षिण आफ्रिका या दोन देशांमध्ये १६ जूनपासून तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेला सुरुवात होणार आहे. चेन्नईमध्ये २८ जूनपासून एकमेव कसोटीला सुरुवात होईल. त्यानंतर पाच, सात व नऊ जुलै रोजी बंगळूरत टी-२० मालिकेचा थरार रंगणार आहे. या वर्षी सप्टेंबर महिन्यात महिलांचा टी-२० विश्‍वकरंडक खेळवला जाणार आहे. त्याआधी भारतीय महिला क्रिकेट संघाच्या सरावासाठी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध टी-२० मालिकेचे आयोजन करण्यात आले आहे.

बीसीसीआय व दक्षिण आफ्रिकन क्रिकेट मंडळाच्या पुढाकाराने दोन देशांमध्ये एकमेव कसोटीचे आयोजन करण्यात येणार आहे. याआधी गेल्या वर्षी भारतीय महिला क्रिकेट संघ इंग्लंड व ऑस्ट्रेलिया यांच्याविरुद्ध प्रत्येकी एक कसोटी सामना खेळला. या दोन्ही कसोटींत भारतीय संघाने विजय संपादन केले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Supplementary CET : पुरवणी सीईटीबाबत संभ्रम;बीबीए, बीसीएबाबत महाविद्यालयांकडून तारखेचा संदेश प्रसारित

Accident News : मुंब्रा बायपासवरून खाली मिक्सर पलटी होऊन एकाचा मृत्यू,तर सहाजण गंभीर जखमी

Crime News : दारू पिऊन घरात त्रास देत असल्याने आई व बहीणीने सुपारी देऊन केला तरूणाचा खून

Meeting of MLAs : प्रश्न धसास लावण्यासाठी वज्रमूठ;‘सकाळ’तर्फे बैठक,एकत्रित आवाज उठविण्याचा जिल्ह्यातील आमदारांचा निर्धार

Ambadas Danve : टक्केवारीमध्ये अडकले विद्यार्थ्यांचे गणवेश;दानवे, गुजरातच्या कंत्राटदारांना पोसण्याचे धोरण

SCROLL FOR NEXT