Surya Kumar Yadav captain hardik Pandya Mumbai indians sakal
Cricket

Rohit Sharma ने मोठा पक्षी मारला? सूर्यकुमार यादवच्या निवडीने Mumbai Indians ची केली कोंडी?

Mumbai Indians Hardik Pandya : रोहित शर्माच्या आग्रहामुळे सूर्यकुमार यादवची ट्वेंटी-२० कॅप्टन म्हणून निवड केली गेल्याची चर्चा आहे.

Swadesh Ghanekar

India T20I Squad for Sri Lanka tour: बीसीसीआयने श्रीलंकेविरुद्धच्या वन डे व ट्वेंटी-२० सामन्यांच्या मालिकेसाठी आज भारतीय संघाची घोषणा केली. २७ जुलैपासून भारताचा हा दौरा सुरू होणार आहे आणि ट्वेंटी-२० संघाचे नेतृत्व सूर्यकुमार यादवकडे ( Suryakumar Yadav) सोपवले गेले आहे. वन डे मालिकेत रोहित शर्मा ( Rohit Sharma) खेळणार असल्याने नेतृत्व त्याच्याकडेच राहिल हे स्पष्ट झाले आहे. पण, याचवेळी रोहितकडून Mumbai Indians ची कोंडी केल्याची चर्चा आता रंगतेय...

इंडियन प्रीमिअर लीग २०२४ पूर्वी झालेल्या सर्व घडामोडी जरा आठवा... गुजरात टायटन्सकडून मोठी रक्कम देऊन मुंबई इंडियन्सने हार्दिक पांड्याला ( Hardik Pandya) आपल्या ताफ्यात घेतले. हार्दिकचे होम कमिंग झाल्याने MI फॅन आनंदित होते, पण त्याचवेळी फ्रँचायझीने त्याला कर्णधारपद देऊन रोष ओढावून घेतला. तो रोष किती टोकाचा होता हे आयपीएल २०२४ च्या मुंबई इंडियन्सच्या प्रत्येक सामन्यात पाहायला मिळाला.

चाहत्यांनी हार्दिक पांड्याला प्रत्येक सामन्यात टीका केली... त्याचा परिणाम संघाच्या कामगिरीवर झाला आणि IPL 2024 मध्ये संघाला १४ सामन्यांत फक्त ४ विजयांसह १०व्या क्रमांकावर राहावे लागले. त्यानंतरही हार्दिकला ट्रोल करणं सुरूच होतं. पण, ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत हार्दिकने मॅच जिंकून दिली आणि चाहत्यांचा रोष मावळला. रोहित शर्मा आणि हार्दिक यांच्यातल्या मिठीचा तो क्षण सर्वांनी नजरेत साठवून ठेवला.

पण, आजच्या संघ निवडीवरून रोहितने डाव साधल्याची चर्चा रंगतेय.. गौतम गंभीरकडे रोहितने सूर्याच्या नावाचा आग्रह धरल्याचे वृत्त अनेक इंग्रजी वृत्तपत्र व वेबसाईटनी दिले होते. त्यावर विश्वास ठेवला तर सूर्याच्या कर्णधार होण्यामागे आणि हार्दिकचे उप कर्णधारपद जाण्यामागे रोहित असल्याचे बोलले जातेय... या केवळ चर्चा आहेत. पण, बीसीसीआयने सूर्याला कॅप्टन बनवून मुंबई इंडियन्सची गोची केली आहे.

सूर्यकुमार यादव, हार्दिक पांड्या व रोहित शर्मा हे तिघेही मुंबई इंडियन्सचे सदस्य आहे. हार्दिक जरी फ्रँचायझीच्या संघाचा कर्णधार असला तरी टीम इंडियाचा कर्णधार सूर्या व रोहित आहे. त्यामुळे आगामी आयपीएलमध्ये सूर्याला कॅप्टन ते करतात का, अशी चर्चा रंगतेय.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shubhanshu Shukla Research : शुभांशु शुक्लांनी अंतराळात केला थरारक प्रयोग! बनले 'या' खास गोष्टीवर संशोधन करणारे पहिले भारतीय..

Nagpur Fraud: खोट्या रजिस्ट्रीच्या आधारे उचलले ३८ लाखांचे गृहकर्ज

Pune News : रस्त्याच्या मधोमध झाडामुळे अपघाताचा धोका; प्रयेजा सिटी सोसायटी परिसरातील स्थिती, जवळच शाळा असल्याने चिंता

Latest Maharashtra News Live Updates: अर्जेंटिनाचा यशस्वी दौऱ्यानंतर , पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं ब्राझीलची राजधानी रिओ दि जनेरियो इथं भव्य स्वागत

Pune News : नानासाहेब पेशवेंच्या समाधीची दुरवस्था; परिसरात कचऱ्याची समस्या; महापालिकेच्या दुर्लक्षामुळे ऐतिहासिक वारसा उपेक्षित

SCROLL FOR NEXT