Rohit Sharma | Team India Sakal
Cricket

Rohit Sharma Video: 'अजून तरी तुम्ही...' रोहितने वनडे-कसोटी निवृत्तीबद्दल स्पष्टच दिलं उत्तर

Rohit Sharma on Retirement: रोहित शर्माने आंतरराष्ट्रीय टी२० क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे, यानंतर आता त्याने वनडे आणि कसोटीतील भविष्यावरही स्पष्ट उत्तर दिलं आहे.

Pranali Kodre

Rohit Sharma on his Future in Cricket: भारतीय क्रिकेट संघाने २९ जून रोजी टी२० वर्ल्ड कप २०२४ स्पर्धेचे विजेतेपद जिंकले. या स्पर्धेनंतर भारताचा कर्णधार रोहित शर्माने आंतरराष्ट्रीय टी२० क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली. यानंतर आता तो वनडे आणि कसोटी क्रिकेटमधूनही निवृत्ती घेणार का, अशा चर्चा सुरू झाल्या. त्यावर आता त्यानेच भाष्य केले आहे.

रोहित सध्या क्रिकेटमधून मिळालेल्या सुटीचा आनंद घेत आहे. त्याला या महिन्याच्या अखेरीस होणाऱ्या श्रीलंका दौऱ्यासाठीही विश्रांती दिली जाण्याची शक्यता आहे.

या दरम्यान तो नुकताच अमेरिकेतली एका कार्यक्रमात त्याच्या क्रिकेटमधील भविष्याबद्दल बोलताना म्हणाला, 'मी याआधीही सांगितले, मी फार पुढचा विचार करत नाही. हे तरी स्पष्ट आहे की पुढील काही काळ तरी तुम्ही मला खेळताना पाहाल.'

तो हे बोलत असतानाचा व्हिडिओही सध्या व्हायरल झाला आहे.

रोहितची आंतरराष्ट्रीय टी२० मधून निवृत्ती

रोहित आंतरराष्ट्रीय टी२० मधून निवृत्त झाला असून तो निवृत्त होत असताना त्याच्या नावावर अनेक मोठे विक्रम होते. तो सध्या आंतरराष्ट्रीय टी२० मध्ये सर्वाधिक धावा करणारा आणि सर्वाधिक शतके करणारा खेळाडू आहे.

त्याने आंतरराष्ट्रीय टी२० क्रिकेटमध्ये १५९ सामन्यांमध्ये ३२.०५ च्या सरासरीने ४२३१ धावा केल्या, ज्यात ५ शतके आणि ३२ अर्धशतके आहेत.

पुढीलवर्षापर्यंत तरी खेळणारच

रोहित आंतरराष्ट्रीय टी२० क्रिकेटमधून जरी निवृत्त झाला असला, तरी तो वनडे आणि कसोटी क्रिकेटमधील सक्रिय खेळाडू आहे. काही दिवसांपूर्वीच बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी स्पष्ट केले होते की रोहित चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ आणि वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप २०२३-२५ या स्पर्धांसाठी भारतीय संघाचा कर्णधार म्हणून कायम राहणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs AFG 2nd T20I: 'Toss' चा 'BOSS'! श्रेयस अय्यरने नोंदवला वर्ल्ड रेकॉर्ड; वरूण चक्रवर्तीला नेमकं काय झालं? BCCI म्हणते...

Pune News : पुण्याच्या चारीही दिशांना स्वतंत्र डंबर प्लांट उभारा; महापौर नागपुरे यांचे आयुक्तांना पत्र

Hingoli News : चोंडीत शक्तिपीठ महामार्गाची मोजणी रोखली! ‘जमीन गेली तर जगायचे कसे?’ वृद्ध महिला शेतकऱ्यांचा आक्रोश; तुषार जाधव यांचा पालकमंत्र्यांना थेट इशारा

IND vs AFG 2nd T20I: वैभव सूर्यवंशीला संधी नाहीच, तरीही संघात एक बदल! भारताच्या Playing XI मध्ये कोणाची एन्ट्री?

AI Powered Cancer Diagnosis: तंबाखू, प्रदूषण की केमिकल? DNA पाहून कॅन्सरचं ‘खरं कारण’ शोधणार आता AI!

SCROLL FOR NEXT