Virat Kohli | Neymar Sakal
Cricket

Virat Kohli: विराटचा मोठा विक्रम! चक्क ब्राझीलचा फुटबॉलपटू नेमारला मागे टाकत 'या' यादीत मिळवलाय दुसरा नंबर

Most Followers on X: विराट कोहली केवळ भारतातीलच नाही, तर जगभरातील लोकप्रिय खेळाडूंपैकी एक आहे. त्याने नुकतेच एका विक्रमात ब्राझीलच्या नेमारला मागे टाकले आहे.

Pranali Kodre

Virat Kohli Record: भारताचा स्टार फलंदाज विराट कोहली मैदानात तर मोठे विक्रम करत असतोच, पण मैदानाबाहेरही त्याच्या नावावर मोठे विक्रम आहेत. विराट केवळ भारतातीलच नाही, तर जगभरातील लोकप्रिय खेळाडूंपैकी एक आहे, हे नुकतेच दिसून आले आहे.

विराट एक्स (ट्वीटर) या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर सर्वाधिक फॉलोवर्स असलेला दुसऱ्या क्रमांकाचा खेळाडू ठरला आहे. त्याने याबाबतीत ब्राझीलचा स्टार फुटबॉलपटू नेमार ज्युनियरला मागे टाकले आहे.

35 वर्षीय विराटचे एक्सवर 63.5 मिलियन फॉलोवर्स झाले आहेत. नेमारचे एक्सवर 63.4 मिलियन फॉलोवर्स आहेत. या यादीत पोर्तुगालचा फुटबॉलपटू ख्रिस्तियानो रोनाल्डो अव्वल क्रमांकावर आहे. त्याला 111.4 मिलियन फॉलोवर्स एक्सवर आहेत.

एकूणच विराटची ही लोकप्रियता पाहाता, त्या एक मोठा ब्रँड असल्याचे का म्हटले जाते हे लक्षात येते.

दरम्यान, विराट सध्या टी२० वर्ल्ड कप 2024 स्पर्धेत व्यस्त आहे. भारतीय संघाला या स्पर्धेतील पहिला सामना ५ जून रोजी आयर्लंडविरुद्ध न्युयॉर्क येथे खेळायचा आहे. या स्पर्धेत विराटकडून भारतीय संघाला मोठ्या अपेक्षा असणार आहेत.

त्याने या स्पर्धेपूर्वी नुकतेच खेळलेल्या आयपीएल 2024 स्पर्धेत शानदार कामगिरी केली होती. त्याने आयपीएल 2024 मध्ये सर्वाधिक धावाही केलेल्या.

विराटने आयपीएल 2024 मध्ये 15 सामन्यांत 61.75 च्या सरासरीने आणि 155 च्या स्ट्राईक रेटने 1 शतक आणि 5 अर्धशतकांसह 741 धावा केल्या होत्या. तो आयपीएलच्या एका हंगामात दोनदा 700 धावा पार करणारा ख्रिस गेलनंतरचा दुसराच खेळाडू ठरला होता.

त्याचबरोबर नेमारबद्दल सांगायचे झाले, तर त्याने गेल्या वर्षी अल हिलाल या सौदीमधील फुटबॉल क्लबशी करार केला आहे.

मात्र, तो सध्या दुखापतग्रस्त असल्याने नुकत्याच झालेल्या सौदीच्या किंग्स कप 2024 स्पर्धेच्या अंतिम सामन्यात खेळू शकला नव्हता. पण त्याच्या संघाने ख्रिस्तियानो रोनाल्डोच्या अर-नासर संघाचा पराभव करत विजेतेपद मिळवले होते. यावेळी नेमारही स्टेडियममध्ये उपस्थित होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mahaparinirvan Din : इंदू मिलमधील स्मारकाबाबत मुख्यमंत्री फडणवीसांची मोठी घोषणा; कधी होणार आंबेडकरांचं स्मारक? दिली महत्त्वाची अपडेट

Gold Rate Today : RBI निर्णयानंतर सोनं महागलं, चांदी 2 लाखांच्या जवळ; जाणून घ्या तुमच्या शहरातील ताजे भाव

Year End 2025: 2025 मध्ये मंगळ ग्रहाने 7 वेळा अन् 14 नक्षत्रांमध्ये केले भ्रमण, 12 राशींवर कसा परिणाम झाला वाचा एका क्लिकवर

Indigo संकट आता सर्वोच्च न्यायालयात, याचिकाकर्ते थेट CJI Suryakant यांच्या घरी, तातडीने सुनावणी होणार?

Nagpur Temperature Drop: नागपुरात थंडीची लाट! तापमान १०.८ अंशांवर; नागरिकांना हुडहुडी

SCROLL FOR NEXT