T20 World Cup team india News Marathi sakal
Cricket

T20 World Cup 2024 : IPL दरम्यान वर्ल्ड कपसाठी टीम इंडिया होणार अमेरिकेला रवाना! तारीख आली समोर

T20 World Cup 2024 : आयपीएल 2024 नंतर लगेगच टी-20 वर्ल्ड कपचा थरार रंगणार आहे. आयपीएलचा अंतिम सामना रविवारी 26 मे रोजी खेळवला जाणार आहे. आणि पाच दिवसांनी म्हणजे 1 जूनपासून टी-20 वर्ल्ड कप सुरू होईल.

Kiran Mahanavar

T20 World Cup 2024 : आयपीएल 2024 नंतर लगेगच टी-20 वर्ल्ड कपचा थरार रंगणार आहे. आयपीएलचा अंतिम सामना रविवारी 26 मे रोजी खेळवला जाणार आहे. आणि पाच दिवसांनी म्हणजे 1 जूनपासून टी-20 वर्ल्ड कप सुरू होईल.

अशा स्थितीत भारतीय खेळाडू अमेरिकेत गेल्यावर पाच दिवसांत संघ वर्ल्ड कपसाठी कसा जाणार, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. आता आयपीएलच्या मध्यावर भारतीय खेळाडू वर्ल्ड कपसाठी अमेरिकेला रवाना होणार असल्याचे मीडिया रिपोर्टमध्ये समोर आले आहे.

'टाइम्स ऑफ इंडिया'च्या वृत्तानुसार, पहिल्या टप्पात जे खेळाडू आयपीएल प्लेऑफचा भाग नसतील, ते 21 मे रोजी अमेरिकेला रवाना होणार आहे. अशा स्थितीत आयपीएल 2024 दरम्यान कोणते भारतीय खेळाडू वर्ल्ड कपसाठी रवाना होणार हे पाहणे रंजक ठरणार आहे.

आयसीसीने टी-20 वर्ल्ड कप 2024 साठी संघांची घोषणा करण्यासाठी 1 मे ही अंतिम मुदत दिली आहे. अशा परिस्थितीत बीसीसीआय भारतीय संघाची घोषणा कधी करते हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे. याशिवाय संघात कोणत्या यष्टीरक्षकांचा समावेश आहे, अशा अनेक बाबीही लक्षात ठेवल्या जातील. याशिवाय संघाच्या सलामीवीरांवरही प्रश्न कायम आहेत.

रोहित शर्मा, शुभमन गिल की यशस्वी जैस्वाल यांच्यासोबत सलामीची जबाबदारी कोण घेणार हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे. याशिवाय ऋषभ पंत, केएल राहुल आणि संजू सॅमसन यांचा यष्टिरक्षकाच्या शर्यतीत समावेश आहे. अशा परिस्थितीत संपूर्ण टीम इंडिया पाहण्यासारखी असेल.

लक्षात घेण्यासारखे आहे की टी-20 वर्ल्ड कपसाठी विराट कोहलीला या स्पर्धेसाठी टीम इंडियामध्ये स्थान मिळणार नसल्याचीही जोरदार चर्चा आहे. अनेक माजी दिग्गज क्रिकेटपटू आणि तज्ञांनी विराट कोहलीला आपापल्या संघात स्थान दिले नाही. अशा स्थितीत कोहलीच्या निवडीकडेही लक्ष असेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT