IPL 2025 Auction BCCI Meeting  sakal
Cricket

IPL 2025 Auction - MS Dhoni, रोहित शर्मा यांच्या भविष्याचा आज फैसला! ५ मुद्यांवर BCCI अन् फ्रँचाझींमध्ये होणार मॅरेथॉन चर्चा

IPL 2025 Auction BCCI Meeting - इंडियन प्रीमिअर लीग मध्येही आता परिवर्तनाचे वारे वाहू लागले आहेत... सीनियर खेळाडूंच्या भविष्याचा निकाल देणारी बैठक आज मुंबईत पार पडणार आहे.

Swadesh Ghanekar

IPL Franchise owners and BCCI Meeting : इंडियन प्रीमिअर लीग २०२५ मध्ये किती खेळाडूंना रिटेन केलं जाणार.. RTM नियम किती जणांसाठी लागू राहणार, इम्पॅक्ट प्लेअर नियम राहणार की नाही... या सर्व प्रश्नांची उत्तरं आज मिळणार आहेत. BCCI आणि आयपीएल फ्रँचायझी मालक यांच्यात IPL 2025 Auction पूर्वी मॅरेथॉन बैठक पार पडणार आहे. या बैठकीत होणाऱ्या निर्णयाचा MS Dhoni, रोहित शर्मा आदी सीनियर्स भारतीय खेळाडूंच्या भवितव्यावरही परिणाम होणार आहे.

आयपीएल २०२५ साठी होणाऱ्या Mega Auction पूर्वी फ्रँचायझी मालकांनी बीसीसीआयकडे काही प्रस्ताव ठेवले होते. त्यात रिटेन खेळाडूंचा ( संघात किती खेळाडूंना कायम राखता येईल) मुद्दा महत्त्वाचा होता. फ्रँचायझींनी सुचवलेल्या प्रस्तावानुसार त्यांना किमान ८ खेळाडूंना रिटेन करण्याची परवानगी हवी आहे. त्याशिवाय अनकॅप्ड खेळाडू, RTM म्हणजेच राईट टू मॅच व इम्पॅक्ट प्लेअर हेही मुद्दे आहेतच. यासाठी बीसीसीआयने मुंबईच्या मुख्यालयात फ्रँचायझी मालकांसोबत बैठक बोलावली आहे.

Impact Player - रद्द करायचा की कायम ठेवायचा?

आयपीएल २०२४ मध्ये आठपेक्षा जास्त सामन्यांत २५० हून अधिक धावा कुटलेल्या पाहायला मिळाल्या. स्पर्धेच्या इतिहासातील सर्वोच्च २८७ धावांचा विक्रम मागील पर्वात सनरायझर्स हैदराबादने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूविरुद्ध सामन्यात केला. इम्पॅक्ट प्लेयर नियम लागू झाल्यापासून आयपीएलच्या इतिहासातील दहा पैकी नऊ सर्वोच्च धावसंख्येची नोंद झाली आहे.

या नियमाचा मूळ हेतू अधिकाधिक भारतीय खेळाडूंना, विशेषत: अनकॅप्ड खेळाडूंना संधी मिळावी हा होता. पण, यावर रोहित शर्माने नाराजी व्यक्त केली होती. काही फ्रँचायझींनी देखील त्यांचे मत मांडले आहे आणि त्यापैकी एकाने ESPNcricinfo ला सांगितले की त्यांनी IPL ला सूचित केले आहे की ते नियम रद्द करण्याच्या बाजूने आहेत.

अनकॅप्ड खेळाडूंच्या रिटेंनशची संख्येत वाढ

अनकॅप्ड खेळाडूंना घडवल्यानंतर तो ऑक्शनमध्ये दुसऱ्या संघात जात असल्याचे दुःख फ्रँचायझींनी बीसीसीआयसमोर व्यक्त केले. त्यामुळे आता या अनकॅप्ड खेळाडूंना रिटेन करण्याचा नियम आणण्याचा मुद्दा मांडला आहे. त्यामुळे अनकॅप्ड खेळाडूंना रिटेन करणाऱ्या खेळाडूंमध्ये घेता यावे किंवा RTM नुसार त्याला संघात कायम ठेवण्याचा आग्रह फ्रँचायझींचा आहे.

सॅलरी पर्समध्ये वाढ

फ्रँचायझीची सध्या सॅलरी पर्स १०० कोटी आहे त्यात वाढ होण्याची शक्यता आहे. आयपीएलने खेळाडूंना मॅच फी देण्याची शिफारस केली असल्याचे मानले जाते. त्याचवेळी जो खेळाडू चांगली कामगिरी करेल, त्याला अतिरिक्त बोनस रक्कम देण्याचाही विचार आहे.

जास्त परदेशी खेळाडू हवेत...

आयपीएल नियमानुसार चार परदेशी खेळाडूंना रिटेन करता येतात, पण ही संख्या वाढवण्याची मागणी एका फ्रँचायझीने केली आहे. त्यामुळे रिटेन करणाऱ्या खेळाडूंची संख्या वाढवण्याचा प्रस्ताव आहे. जर बीसीसीआयने ४ खेळाडूंनाच रिटेन करण्याच्या परवानगी दिली, तर फ्रँचायझींसाठी अवघड होऊन बसेल. चेन्नई सुपर किंग्सचाच विचार केला, तर ते ऋतुराज, रवींद्र, शिवम व डॅरिल मिचेल यांना कायम ठेवण्यास आग्रही आहेत. अशात धोनीला ऑक्शनमध्ये उतरावे लागेल किंवा मार्गदर्शक म्हणून काम करावे लागेल. अशीच परिस्थिती मुंबई इंडियन्सच्या रोहित शर्माबाबत उद्भवू शकते.

IPL 2025 Auction BCCI Meeting

५ वर्षांनी मेगा ऑक्शन

संघाची घडी बसवण्यासाठी फ्रँचायझी बरीच मेहनत घेत असते आणि अशात दरवर्षी ऑक्शन झाल्यास ही घडी बसवणे खूप अवघड जाते. यासाठी दर पाच वर्षांनी मेगा ऑक्शन व्हावे अशी फ्रँचायझीची मागणी आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ENG vs IND: बुमराह लॉर्ड्स कसोटीत खेळणार की नाही? दुसऱ्या कसोटी विजयानंतर कॅप्टन गिलने स्पष्ट शब्दात सांगितलं

Ujani Dam Water: 'उजनीतून पाणी सोडण्याचा निर्णय एक दिवस लांबणीवर'; पंढरपुरातील वारकऱ्यांच्या गर्दीमुळे घेतला निर्णय

CA Final 2025 Results: सोशल मीडियापासून दूर राहिलो, आणि देशात टॉप आलो! सीए टॉपर्सची यशोगाथा

Pune : गांधीजींच्या पुतळ्याचं डोकं उडवण्याचा प्रयत्न, एकाला अटक; काँग्रेस करणार आंदोलन

Raigad Suspicious Boat : अलिबागजवळ समुद्रात आढळलेली संशयास्पद बोट बेपत्ता, सुरक्षा यंत्रणा अलर्टवर; हेलिकॉप्टरद्वारे शोध सुरु

SCROLL FOR NEXT