Kuldeep Yadav  esakal
Cricket

IND vs ENG 5th Test Kuldeep Yadav : कुलदीपनं कमाल केली! 92 वर्षाच्या इतिहासात असं पहिल्यांदाच घडलंय

Kuldeep Yadav Test Record India vs England : कुलदीप यादवने धर्मशाला येथे इंग्लंड विरुद्धच्या सामन्याच्या पहिल्या दिवशी पाच विकेट्स घेतल्या.

अनिरुद्ध संकपाळ

Kuldeep Yadav IND vs ENG 5th Test Record : फिरकीपटू कुलदीप यादवने पाचव्या कसोटीच्या पहिल्या दिवशी सनसनाटी कामगिरी केली. त्याने धर्मशाला येथे इंग्लंड विरुद्धच्या सामन्याच्या पहिल्या दिवशी पाच विकेट्स घेतल्या. यामुळे भारतीय संघ सामन्यावर मजबूत पकड निर्माण करू शकला. कुलदीपने 72 धावात 5 विकेट्स घेत इंग्लंडच्या फलंदाजीचं कंबरडच मोडलं. इंग्लंड 218 धावांत गुंडाळला गेला.

यादरम्यान, कुलदीप हा भारताकडून सर्वात कमी चेंडूत 50 कसोटी बळी घेणारा गोलंदाज ठरला. कुलदीपने फक्त 1871 चेंडू 50 कसोटी विकेट्स घेतल्या. या यादीत अक्षर पटेल (2205) आणि जसप्रीत बुमराह (2520) हे अनुक्रमे दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकावर आहेत. भारताच्या कसोटी इतिहासात 2000 चेंडूंपेक्षा कमी चेंडू टाकून एका गोलंदाजाने 50 कसोटी बळी पूर्ण करण्याची ही पहिलीच वेळ होती.

पाचवी कसोटी ही कुलदीप यादवने आपल्यासाठी खास केली असली तरी ही अश्विनची 100 वी कसोटी असल्याने त्यासाठी देखील हा दिवस खूप महत्वाचा होता. त्याने या दिवशी 4 विकेट्स घेत तो साजरा देखील केला. कुलदीपनेही इनिंग संपल्यानंतर आपला पाच विकेट्सचा चेंडू अश्विनला देऊ केला.

मात्र अश्विनने तो न स्विकारता कुलदीपलाच परत केला अन् त्याला प्रेक्षकांची मानवंदना स्विकारण्यासही पुढं पाठवलं. या प्रसंगाबद्दल कुलदीपने सामन्यानंतर वक्तव्य केलं. तो म्हणाला की, अश्विन भाई खूप दयाळू आणि नम्र व्यक्ती आहे. तो खूप भारी व्यक्ती आहे. मी चेंडू त्याला देऊ केल्यावर तो म्हणाला की माझ्याकडे 5 विकेट्सवाले 35 चेंडूत आहेत त्यामुळे हा चेंडू तू ठेव.'

सामन्याबद्दल बोलायचं झालं तर इंग्लंडचा पहिला डाव 218 धावात गुंडाळल्यानंतर भारताने पहिल्या दिवशी 1 बाद 135 धावा केल्या. भारत अजूनही 83 धावांनी पिछाडीवर असला तरी सामन्यावर मजबूत पकड भारताचीच आहे. दिवसाचा खेळ संपला त्यावेळी रोहित शर्मा 52 धावा तर शुभमन गिल 26 धावा करून नाबाद होता. यशस्वी जैस्वालने देखील 57 धावांचे योगदान देत रोहित सोबत 104 धावांची शतकी भागीदारी रचली.

(Cricket News In Marathi)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dhananjay Munde: ''संतोष देशमुख माहितंय ना? आम्ही काहीही करु शकतो...'', धनंजय मुंडे समर्थकाची महेश डोंगरेंना धमकी

ना बॉम्ब, ना भुईचक्र? तेजश्री प्रधानने स्वतःला दिली 'या' फटाक्याची उपमा; दिवाळीच्या आठवणी सांगत म्हणाली-

Agriculture News : नाशिक अतिवृष्टीचा अंतिम अहवाल: २.९९ लाख हेक्टरवरील पिकांचे नुकसान; ३२८ कोटी अनुदानाची मागणी

Rashtriya Swayamsevak Sangh: आरएसएसच्या शताब्दीनिमित्त वडूजला संचलन; मंत्री जयकुमार गोरेंकडून स्वयंसेवकांवर पुष्पवृष्टी

काय हो... डिलिव्हरी नॉर्मल की सीझर? बदलत्या जीवनशैलीने सिझेरियन 31 ते 39 टक्क्यांवर

SCROLL FOR NEXT