Cricket

BAN vs SL: दुश्मनी थांबण्याचं नाव घेईना! बांगलादेशने वनडे मालिका जिंकताच 'तसं' सेलिब्रेशन करत श्रीलंकेला डिवचलं

Bangladesh Celebration: वर्ल्डकप 2023 मधील टाईम आऊटच्या घटनेचे पडसाद अद्यापही बांगलादेश आणि श्रीलंका यांच्यातील सामन्यांवर पडताना दिसत असून आता वनडे मालिकेनंतर मुश्फिकूरचे सेलिब्रेशन चर्चेचा विषय ठरत आहे.

सकाळ डिजिटल टीम

Bangladesh vs Sri Lanka ODI Series: श्रीलंका आणि बांगलादेश या दोन क्रिकेट संघात बऱ्याच वर्षापासून कट्टर प्रतिस्पर्धा पाहायला मिळाली आहे. त्यातच 2023 वर्ल्डकपमध्ये या दोन संघांतील सामन्यादरम्यान झालेल्या टाईम आऊटच्या घटनेने नव्या वादाला तोंड फोडले होते. त्याचेच पडसाद अद्यापही या दोन संघांतील सामन्यांमध्ये पाहायला मिळत आहेत.

श्रीलंका संघ सध्या बांगलादेश दौऱ्यावर आहे. या दौऱ्यातील मालिकांमध्येही त्या घटनेचे पडसाद उमटलेले दिसले. 2023 वर्ल्डकपमध्ये झाले असे की 7 नोव्हेंबर रोजी दिल्लीमध्ये श्रीलंका आणि बांगलादेश संघ आमने सामने होते.

त्यावेळी प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाकडून अँजेलो मॅथ्युज सहाव्या क्रमांकावर फलंदाजीला उतरला. परंतु बॅटिंगचा स्टान्स घेण्यापूर्वीच त्याला हेल्मेटमध्ये काहीतरी समस्या झाल्याचे जाणवल्याने तो ते बदलण्यासाठी माघारी फिरला.

त्याचवेळी बांगलादेशचा कर्णधार शाकिब अल हसन आणि संघाने त्याच्याविरुद्ध टाईम आऊटचे अपील केले. त्यावेळी मॅथ्युजने हा निर्णय मागे घ्यावा यासाठी शाकिबकडे विनंती केली होती. परंतु त्याने ही विनंती मान्य केली नाही, त्यावेळी पंचांनी नियमानुसार मॅथ्युजला बाद दिले.

त्यामुळे मॅथ्यूज टाईम आऊट होणारा पहिला खेळाडू ठरला. दरम्यान, या घटनेमुळे मोठ्या प्रमाणात वाद झाला.

या घटनेला आता जवपास चार महिने उलटून गेल्यानंतरही त्याचे परिणाम श्रीलंकेच्या सध्या चालू असलेल्या बांगलादेश दौऱ्यातही पाहायला मिळाले. टी20 मालिका जिंकल्यानंतर श्रीलंका संघाने मनगटावरील काल्पनिक घड्याळाकडे इशारा करत सेलिब्रेशन केले होते.

त्यानंतर आता सोमवारी बांगलादेशने वनडे मालिकेतील तिसऱ्या सामन्यात 4 विकेट्सने विजय मिळवला आणि वनडे मालिका 2-1 ने जिंकली. यानंतर बांगलादेशचा कर्णधार नजमुल हुसेन शांतोने मालिका विजयाची ट्रॉफी स्विकारल्यानंतर संघासह फोटोसाठी तो आला.

त्याचवेळी मुश्फिकूर रहिमने 2023 वर्ल्डकपमधील मॅथ्युजच्या टाईम आऊटवेळी घडलेल्या घटना नाट्यरुपात करून दाखवत श्रीलंकेची खिल्ली उडवली. या घटनेचा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. दरम्यान, यानंतर या दोन क्रिकेट संघांमधील दुश्मनी संपण्याचे नाव घेत नसल्याच्या भावना चाहत्यांमधून उमटत आहेत.

आता या दोन संघात 22 मार्चपासून दोन सामन्यांची कसोटी मालिकाही खेळवली जाणार आहे. या मालिकेतील पहिला सामना 22 ते 26 मार्चदरम्यान सिल्हेटला होणार आहे. त्यानंतर 30 मार्च ते 3 एप्रिल दरम्यान दुसरा कसोटी सामना चितगावला होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maratha Reservation: १९९४ चा जीआर नेमका काय आहे? मराठा समाज आरक्षणाबाहेर राहिला, कारण...

Pachod News : चौकशीसाठी आलेल्या अधिकाऱ्यांच्या धमकीने घाबरलेल्या शेतकऱ्याने विहिरीत उडी घेऊन संपविले जीवन

Latest Marathi News Updates: भाजपमध्ये घराणेशाही नाही- देवेंद्र फडणवीस

कोकणातलं तुम्हाला काय आवडलं? दिलीप प्रभावळकर म्हणाले, 'ते पाहून मीच चकीत झालो कारण...

BCCI ची अब्जावधींची कमाई होते तरी कशी? भारताच्या तुलनेत पाकिस्तान क्रिकेट बोर्ड किती कमावतो पैसा, जाणून घ्या

SCROLL FOR NEXT