Natasa Stankovic Hardik Pandya sakal
Cricket

'पडद्यामागे काय घडलं हे कोणाला माहीत नसतं...' पांड्यासोबत घटस्फोटाच्या चर्चेदरम्यान नताशाने शेअर केला 'तो' व्हिडिओ

टीम इंडियाचा स्टार क्रिकेटर हार्दिक पांड्या टी-20 वर्ल्ड कप 2024 मधील कामगिरीमुळे जितका चर्चेत आहे तितकाच तो त्याच्या पत्नीपासून घटस्फोटाच्या अफवांमुळेही चर्चेत आहे.

Kiran Mahanavar

Natasa Stankovic Video : टीम इंडियाचा स्टार क्रिकेटर हार्दिक पांड्या टी-20 वर्ल्ड कप 2024 मधील कामगिरीमुळे जितका चर्चेत आहे तितकाच तो त्याच्या पत्नीपासून घटस्फोटाच्या अफवांमुळेही चर्चेत आहे. जेव्हापासून त्यांचा घटस्फोट होण्याच्या बातम्या समोर आल्या आहेत तेव्हापासून सोशल मीडियावर वेगवेगळ्या दाव्यांचा भरणा होत आहे. दरम्यान, नताशा स्टॅनकोविक हिची इन्स्टा स्टोरी सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

नताशा स्टॅनकोविकने 10 जुलै रोजी इंस्टाग्राम स्टोरीवर एक व्हिडिओ शेअर केला होता, ज्यामध्ये ती बोलत आहे की, 'मी इथे बसून कॉफी पीत आहे, यादरम्यान लोक किती लवकर जजमेंटल होतात याचा मला एक विचार आला. आजूबाजूला कोणी वेगळे वागत असेल आणि ते दिसण्यात आलं तर कोणी त्यासाठी थांबत नाही आणि त्याचा विचारही करत नाही, उलट त्यांच्याबद्दल त्वरित निर्णय घेऊन मोकळे होतात.

पुढे ती म्हणाली की, पडद्यामागे काय घडलं हे कोणाला माहीत आहे का... ते कोणत्या परिस्थितीतून जात आहेत, त्या क्षणी त्या व्यक्तीबरोबर काय सुरु आहे, त्यांच्या मनात काय चालले आहे हे देखील पाहत नाही. म्हणून मला सांगायचे आहे की, थोडे कमी निर्णय घया. धीर धरा आणि त्यांच्याबद्दल थोडी सहानुभूती दाखवा.

हार्दिक पांड्या आणि नताशा स्टॅनकोविचच्या घटस्फोटाच्या बातम्या तेव्हाच सुरू झाल्या होत्या. जेव्हा अभिनेत्रीने तिच्या लग्नाचे फोटो वगळता क्रिकेटरसोबतचे सर्व फोटो इंस्टाग्रामवरून डिलीट केलं. अलीकडेच, जेव्हा टीम इंडियाने टी-20 वर्ल्ड कप 2024 ची ट्रॉफी जिंकली आणि चाहत्यांनी हार्दिक पंड्याचे त्याच्या कामगिरीबद्दल अभिनंदन केले, तेव्हा अभिनेत्रीकडून कोणतीही प्रतिक्रिया दिसली नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

T20 World Cup, IND vs NED : भारतीय संघाचा सर्वात मोठा विजय, नेदरलँड्सला चारली धूळ! शफाली वर्माची बॅटिंगमनंतर बॉलिंगमध्येही कमाल

IND A vs AFG A: आधी बॉल हातातून सुटला, पण वैभव सूर्यवंशीने मागे वळून हवेत झेपावत घेतला अफलातून झेल, पाहा Video

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढेंची मोठी कारवाई! पुणे विद्यापीठाच्या मेसचा परवाना रद्द, गंभीर त्रुटी निदर्शनास आल्याची माहिती

Pune Water Protest: पुण्यात तीव्र पाणीटंचाई; काँग्रेसचे रिकाम्या घागरींसह महापालिकेत हंडा आंदोलन

MLC Election: ठाकरे गटात फूट; खासदारांच्या बंडाची धग! अशातच महाराष्ट्र विधान परिषद निवडणुकीसाठी मतदान, कोण मारणार बाजी?

SCROLL FOR NEXT