James Anderson | Team India Sakal
Cricket

ENG vs WI, Test: निवृत्त झालेल्या अँडरसनची जागा घेणार 'हा' वेगवान गोलंदाज, दुसऱ्या कसोटीसाठी इंग्लंड संघ जाहीर

James Anderson: जेम्स अँडरसनच्या निवृत्तीनंतर आता इंग्लंडने संघात त्याच्या बदली खेळाडूची घोषणा केली आहे.

Pranali Kodre

James Anderson Replacement in England Squad: वेस्ट इंडिज सध्या इंग्लंड दौऱ्यावर आहे. या दौऱ्यात वेस्ट इंडीज यजमान इंग्लंड विरुद्ध तीन सामन्यांची कसोटी मालिका खेळत आहे.

या मालिकेतील पहिला सामना लॉर्ड्सवर झाला, या सामन्यात १२ जुलैला इंग्लंडने एक डाव आणि ११४ धावांनी जिंकला. पण हा सामना इंग्लंडचा वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसनचा अखेरचा सामना ठरला.

या सामन्यानंतर ४१ वर्षीय अँडरसनने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. त्याने १८८ कसोटीत ७०४ विकेट्स घेत कारकि‍र्दीची अखेर केली. तो ७०० हून अधिक विकेट्स घेणारा एकूण तिसरा गोलंदाज, तर पहिला वेगवान गोलंदाज ठरला.

आता त्याने निवृत्ती घेतली असल्याने इंग्लंड संघातील त्याची जागा रिकामी झाली आहे. त्यामुळे त्याच्या जागेवर वेगवान गोलंदाज मार्क वूडला दुसऱ्या कसोटीसाठी इंग्लंड संघात सामील करण्यात आले आहे. ३४ वर्षीय वूडने ३४ कसोटीत १०८ विकेट्स घेतल्या आहेत.

संघात याआधी स्टूअर्ट ब्रॉड, जेम्स अँडरसन असे खेळाडू असताना त्याला फारशी संधी मिळत नव्हती. मात्र आता ब्रॉड आणि अँडरसन हे दोघेही निवृत्त झाल्यानंतर या वूडला आता कसोटीतही नियमितपणे संधी मिळण्याची दाट शक्यता आहे.

इंग्लंड आणि वेस्ट इंडीज यांच्यातील दुसरी कसोटी १८ जुलैपासून सुरू होणार आहे. हा सामना नॉटिंगघम येथील ट्रेंट ब्रिज येथे खेळवला जाणार आहे.

इंग्लंडचा दुसऱ्या कसोटी सामन्यासाठी संघ -

बेन स्टोक्स (कर्णधार), गस ऍटकिन्सन, शोएब बाशिर, हॅरि ब्रुक, झॅक क्रावली, बेन डकेट, डॅन लॉरेन्स, डिलियन पेनिंग्टन, ऑली पोप, मॅथ्यू पोट्स, जो रुट, जॅमी स्मिथ, ख्रिस वोक्स, मार्क वूड.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde: शिंदेसेनेला पुन्हा मोठा धक्का! महिनाभरात अजून एका बड्या नेत्याचं पद रद्द; राजकीय समीकरणं बदलणार

आता AI ठरवणार संघात कोणाला संधी मिळणार! क्रिकेटमध्ये तंत्रज्ञानाचा नवा अध्याय; आकडेवारीपासून थेट संघ निवडीसाठी वापर होणार

आनंद शिंदेंच्या आवाजातील 'गोमु सासरला जाते' गाण्याचा धुमाकूळ; 'भुतम भयम'मधील गावरान ठसक्यातील गाणं ऐकलंत का?

Latest Marathi News Live Update : तुळजाभवानी मंदीरातील पेड दर्शन बंद करण्याची मागणी

Vat Purnima 2026: घराजवळ वडाचं झाड नाहीये? मग 'अशी' करा घरच्या घरीच वटपौर्णिमेची पूजा; जाणून घ्या सोपा उपाय

SCROLL FOR NEXT