Rohit Sharma Viral Video Sakal
Cricket

Rohit Sharma: चाहतीची रिक्वेस्ट अन् रोहितला पत्नीसमोरच करावा लागला नागीण डान्स; सूर्या-दुबेला हसू आवरेना, पाहा Viral Video

Rohit Sharma Viral Video: रोहित शर्माचा एका व्हिडिओ सध्या जोरदार व्हायरल होत आहे, ज्यामध्ये त्याला एका चाहतीच्या विनंतीमुळे नागीण डान्स करावा लागला आहे.

Pranali Kodre

Rohit Sharma Video: भारताचा कर्णधार रोहित शर्मा कधी मैदानातील कामगिरीमुळे, तर कधी मैदानाबाहेरील त्याच्या मजेशीर स्वभावामुळे सातत्याने चर्चेत येत असतो. त्याचे काही गमतीशीर व्हिडिओही व्हायरल होत असतात. असाच एक व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे, ज्यामध्ये रोहितला एका चाहतीच्या विनंतीमुळे नागीण डान्स करावा लागला आहे.

झाले असे की प्रसिद्ध कॉमेडी शो 'द ग्रेट इंडियन कपिल शो' याच्या दुसरा सिजनच्या एका एपिसोडमध्ये रोहित शर्मा, शिवम दुबे, सूर्यकुमार यादव, अक्षर पटेल आणि अर्शदीप सिंग यांनीही हजेरी लावली होती. यावेळी त्यांनी धम्माल केली.

या एपिसोडदरम्यानचे अनेक व्हिडिओही सध्या व्हायरल होत आहेत. यातीलच एक व्हिडिओ जो व्हायरल होत आहे, त्याच दिसते की प्रेक्षकांमध्ये बसलेल्या एका महिलेने रोहितला ४ वर्षांपूर्वी व्हायरल झालेल्या त्याच्या नागीण डान्सच्या रिलची आठवण करून दिली.

तसेच त्याच्याबरोबर डान्स करण्याची विनंती केली. यावेळी रोहितची पत्नी रितिकाही समोर बसलेली होती. रोहित सुरुवातीला खूप वेळा नकार देत होता. त्याने असेही सांगितले की ते चार वर्षांपूर्वीचे होते. परंतु, त्या महिलेने अधिक विनंती केल्यानंतर आणि ती स्टेजवर आल्यानंतर रोहितला उठावे लागले आहे त्याने नागीण डान्सच्या स्टेप्स केल्या.

दरम्यान, यावेळी रोहितची मस्करी करताना सूर्यकुमार, दुबे, अक्षर आणि अर्शदीप यांना त्यांचं हसू आवरता येत नव्हते. रितिकाही रोहितला पाहून हसू लागली.

दरम्यान, रोहित सध्या आगामी न्यूझीलंड विरूद्धच्या कसोटी मालिकेची तयारी करत आहे. ही मालिका १६ ऑक्टोबरपासून सुरू होणार आहे. त्याने याआधी सप्टेंबरमध्ये बांगलादेशविरुद्ध २ सामन्यांची कसोटी मालिका खेळली आहे. पण त्याला खास काही करता आले नव्हते, मात्र त्याच्या नेतृत्वाखाली भारताने मालिका २-० फरकाने जिंकली होती.

आता रोहित न्यूझीलंडविरुद्ध खेळताना दिसणार आहे. ही मालिका देखील आयसीसी टेस्ट चॅम्पियनशीपचा भाग असल्याने महत्त्वाची आहे. येत्या काही दिवसात या मालिकेसाठी भारतीय संघाचीही घोषणा होऊ शकते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Viral Video: हा व्हिडिओ खास आहे... नातं रक्ताचं नव्हतं, पण... जंगलात वाजली शहनाई, CRPF जवानांनी निभावलं वधूच्या भावाचं कर्तव्य

Ashadhi Wari 2025 : बंधुभेटीच्या सोहळ्याने अवघे वैष्णव भावुक; संत ज्ञानेश्वर महाराज-संत सोपानदेवांच्या भेटीचा सोहळा अनुभवण्यासाठी गर्दी

Satara Crime : धोमच्या चोरीप्रकरणी एकास अटक; नवनाथ दत्त मंदिरातील दानपेटी फोडून रोख रक्कम लंपास

Public Health Corruption: आरोग्य खात्यात साहित्य खरेदीत गैरव्यवहार; आमदार डाॅ. राहुल पाटील यांचा विधानसभेमध्ये आरोप

Latest Maharashtra News Updates : सीमाप्रश्‍नी तज्ज्ञ समितीच्या अध्यक्षपदी धैर्यशील माने यांची नियुक्ती, महाराष्ट्र सरकारकडून प्रसिद्धीपत्रक जारी

SCROLL FOR NEXT