Rohit Sharma | India vs Sri Lanka Sakal
Cricket

IND vs SL: अन् रोहित शर्मा live सामन्यात वॉशिंग्टन सुंदरला मारायला पळाला, पाहा Video

Rohit Sharma Video: श्रीलंकेविरुद्धच्या दुसऱ्या वनडेत वॉशिंग्टन सुंदर गोलंदाजी करत असताना रोहित शर्मा त्याला मारण्यासाठी धावला होता, नेमकं त्यावेळी काय झालेलं पाहा.

Pranali Kodre

India vs Sri Lanka, 2nd ODI Match: श्रीलंका विरुद्ध भारत संघात वनडे मालिकेतील दुसरा सामना कोलंबोला रविवारी (४ ऑगस्ट) सुरू आहे. या सामन्यात भारतासमोर श्रीलंकेने विजयासाठी २४१ धावांचे लक्ष्य ठेवले आहे. दरम्यान, या सामन्यात एक मजेशीर घटना घडली.

या सामन्यात भारतीय संघ गोलंदाजी करत असताना ३३ व्या षटकात वॉशिंग्टन सुंदर गोलंदाजी करत होता. त्यावेळी श्रीलंकेकडून जनिथ लियानागे फलंदाजी करत होता. त्यावेळी सुंदर दुसरा चेंडू टाकण्यापूर्वी सलग दोन वेळा रनअप घेऊन आल्यानंतर चेंडू न टाकताच थांबला.

त्याच्या या थांबण्याने भारताचा कर्णधार रोहित शर्माही वैतागला. दुसऱ्या वेळी जेव्हा सुंदर थांबला, तेव्हा तो गमतीने त्याला मारायलाही धावला होता. यावेळी त्याची प्रतिक्रिया पाहून सुंदरलाही हसू आले. दरम्यान यानंतर सुंदरने दुसरा चेंडू टाकला.

दरम्यान, सामन्याबद्दल सांगायचे झाले, तर मोहम्मद सिराजने पहिल्याच चेंडूवर पाथम निसंकाला बाद केले होते. मात्र त्यांनंतर श्रीलंकेचा डाव अविष्का फर्नांडो आणि कुशल मेंडिस यांनी ७४ धावांची भागीदारी करत सांभाळला.

मात्र भारताच्या फिरकीपटूंनी मधल्या षटकांमध्ये शानदार गोलंदाजी केली. त्यामुळे श्रीलंकेची मधली फळी कोलमडली. त्यामुळे श्रीलंकेची अवस्था ३५ व्या षटकापर्यंत ६ बाद १३६ अशी होती.

मात्र, त्यानंतर दुनिथ वेल्लालागे, कामिंदू मेंडिस आणि अकिला धनंजया यांनी चांगली फलंदाजी केली आणि श्रीलंकेला २४० धावांपर्यंत पोहचवले. वेल्लालागेने ३९ धावा केल्या, तर मेंडिसने ४० धावा केल्या. याशिवाय धनंजयाने १५ धावांची छोटेखानी पण महत्त्वाची खेळी केली.

भारताकडून गोलंदाजी करताना भारताकडून वॉशिंग्टन सुंदरने ३ विकेट्स घेतले, तर कुलदीप यादवने २ विकेट्स घेतल्या. तसेच मोहम्मद सिराज आणि अक्षर पटेल यांनी प्रत्येकी १ विकेट घेतली.

या मालिकेतील पहिला सामना बरोबरीत सुटला होता. त्यामुळे मालिकेत आघाडी घेण्यासाठी हा सामना दोन्ही संघांसाठी महत्त्वाचा आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT