ind vs sl 1st odi rohit sharma statement match tie  sakal
Cricket

SL vs IND : 'एक रन राहिला होता पण आम्ही...' सामना बरोबरीत सुटल्यानंतर रोहित संतापला

भारत आणि श्रीलंका यांच्यातील तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना बरोबरीत सुटला.

Kiran Mahanavar

India vs Sri Lanka 1st ODI Match : भारत आणि श्रीलंका यांच्यातील तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना बरोबरीत सुटला. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना श्रीलंकेच्या संघाने 230 धावा केल्या. प्रत्युत्तरात भारतीय संघ केवळ 230 धावा करू शकला. भारतीय संघ हा सामना केवळ 1 धावाने जिंकू शकला नाही. अशा परिस्थितीत कर्णधार रोहित शर्मा खूपच नारज दिसत होता.

231 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारतीय संघ 47.5 षटकांत रोहितच्या 58 धावांच्या खेळीनंतरही 230 धावांवर ऑलआऊट झाला. सामन्यानंतर कर्णधार रोहित म्हणाला की, लक्ष्य गाठता आले असते, पण आम्ही काही ठिकाणी चांगली कामगिरी करू शकलो नाही. सामन्याची सुरुवात चांगली झाली होती पण नंतर विकेट पडल्या.

रोहित शर्मा पुढे म्हणाला की, त्यात केएल राहुल आणि अक्षर पटेल यांनी भागीदारी केली आणि आम्हाला सामन्यात परत आणले. शेवटी 14 चेंडूत एकही धाव काढता आली नाही हे निराशाजनक होत. मी फार काही बोलणार नाही. ही अशी खेळपट्टी नव्हती जिथे तुम्ही मैदानात जाऊन लगेच मोठे फटके मारायला सुरुवात करू शकता. मला वाटले आम्ही चांगले केले, पण तरीही आम्ही एका धावेने मागे पडलो.

या सामन्यात स्वतः कर्णधार रोहित शर्माने टीम इंडियाला दमदार सुरुवात करून दिली. त्याने अवघ्या 33 चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले, पण तो बाद होताच टीम इंडियाची फलंदाजी मैदानात आले आणि परत गेले. याचा परिणाम असा झाला की, भारतीय संघाला 231 धावांचा टप्पाही गाठता आला नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT