Sachin Tendulkar  esakal
Cricket

Sachin Tendulkar पुन्हा मैदानावर उतरणार; Team India श्रीलंका, ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका, वेस्ट इंडिज यांचा सामना करणार

International Masters League – महान फलंदाज सचिन तेंडुलकर पुन्हा एकदा क्रिकेटच्या मैदानावर उतरण्यासाठी सज्ज झाला आहे. नवी मुंबई, लखनौ आणि रायपूर येथे भारतासह सहा संघांमध्ये होणार सामने.

Swadesh Ghanekar

Sachin Tendulkar International Masters League (IML) – सचिन तेंडुलकर, ब्रायन लारा, कुमार संगकारा, शेन वॉटसन, इयॉन मॉर्गन आणि जॅक कॅलिस यांच्यासह अनेक दिग्गज क्रिकेटपटू पुन्हा एकदा क्रिकेटच्या मैदानावर दिसणार आहेत. आंतरराष्ट्रीय मास्टर्स लीग ( IML) स्पर्धेच्या निमित्ताने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील दिग्गजांचा खेळ पाहण्याची संधी क्रिकेटप्रेमींना मिळणार आहे. १७ नोव्हेंबर ते ८ डिसेंबर या कालावधीत पार पडणाऱ्या या स्पर्धेचे सामने नवी मुंबई, लखनौ व रायपूर आदी शहरांमध्ये तीन टप्प्यात पार पडणार आहेत. भारत, श्रीलंका, ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, दक्षिण आफ्रिका आणि वेस्ट इंडिज या सहा संघांमध्ये ही स्पर्धा खेळवली जाणार आहे.  

नवी मुंबईच्या डी वाय पाटील स्टेडियमवर पहिल्या टप्प्यातील चार सामने होणार आहेत. उद्घाटनीय सामना भारत विरुद्ध श्रीलंका यांच्यात होणार आहे. या सामन्याच्या निमित्ताने सचिन तेंडुलकर आणि कुमार संगकारा हे दोन दिग्गज समोरासमोर येतील. कुमार संगकारा श्रीलंका मास्टर्स संघाचे नेतृत्व करणार आहे. शेन वॉटसनकडे ऑस्ट्रेलिया मास्टर्स, जॅक कॅलिसकडे दक्षिण आफ्रिका मास्टर्स, इयॉन मॉर्गनकडे इंग्लंड मास्टर्स आणि ब्रायन लाराकडे वेस्ट इंडिज मास्टर्स संघाचे नेतृत्व असणार आहे. या स्पर्धेतील १८ सामने होणार आहेत.

  • १७ नोव्हेंबर – भारत वि. श्रीलंका, नवी मुंबई

  • १८ नोव्हेंबर – ऑस्ट्रेलिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका, नवी मुंबई

  • १९ नोव्हेंबर – श्रीलंका विरुद्ध इंग्लंड, नवी मुंबई

  • २० नोव्हेंबर – वेस्ट इंडिज विरुद्ध ऑस्ट्रेलिया, नवी मुंबई

  • २१ नोव्हेंबर – भारत वि. दक्षिण आफ्रिका, लखनौ

  • २३ नोव्हेंबर – दक्षिण आफ्रिका वि. इंग्लंड, लखनौ

  • २४ नोव्हेंबर – भारत वि. ऑस्ट्रेलिया, लखनौ

  • २५ नोव्हेंबर – वेस्ट इंडिज वि. श्रीलंका, लखनौ

  • २६ नोव्हेंबर – इंग्लंड वि. ऑस्ट्रेलिया, लखनौ

  • २७ नोव्हेंबर – वेस्ट इंडिज वि. दक्षिण आफ्रिका, लखनौ  

  • २९ नोव्हेंबर – भारत वि. इंग्लंड, रायपूर

  • ३० नोव्हेंबर – श्रीलंका वि. इंग्लंड, रायपूर

  • १ डिसेंबर – भारत वि. वेस्ट इंडिज, रायपूर  

  • २ डिसेंबर – श्रीलंका व. ऑस्ट्रेलिया, रायपूर

  • ३ डिसेंबर – वेस्ट इंडिज वि. इंग्लंड, रायपूर

  • ५ डिसेंबर - Semi Final 1, रायपूर

  • ६ डिसेंबर - Semi Final 2, रायपूर

  • ८ डिसेंबर - Final

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vaibhav Suryavanshi इंग्लंडविरुद्ध विश्वविक्रमी शतक केल्यानंतर शुभमन गिलचं नाव घेत म्हणतोय, आता लक्ष्य २०० धावा; VIDEO

Crime News: "ऐका! आता मी शारीरिक संबंध ठेवणार नाही, माझ्या नवऱ्याला...", प्रियकर मानलाच नाही शेवटी असा धडा शिकवला की...

Thane Politics: पुलाचे घाईत उद्घाटन, चालकांचा जीव धोक्यात, गुन्हा दाखल करा; ठाकरे गट आक्रमक

संतापजनक घटना! 'फोटो व्हायरल करण्याची धमकी देवून महिलेवर अत्याचार'; उरुळी कांचन पोलिसांकडून दोघांना अटक

Pune Accident: 'आषाढी एकादशी दिवशीच पती-पत्नीचा अपघाती मृत्यू'; वारीवरून परतत असताना काळाचा घाला, परिसरात हळहळ

SCROLL FOR NEXT