T20 World Cup sakal
Cricket

T20 World Cup : व्यस्त वेळापत्रकामुळे श्रीलंकन संघाची नाराजी ; चार सामने चार भिन्न स्टेडियममध्ये होणार असल्याने चिंता

श्रीलंकन क्रिकेट संघाकडून टी-२० विश्‍वकरंडकाच्या वेळापत्रकावर नाराजी व्यक्त करण्यात आली आहे.

सकाळ वृत्तसेवा

न्यूयॉर्क : श्रीलंकन क्रिकेट संघाकडून टी-२० विश्‍वकरंडकाच्या वेळापत्रकावर नाराजी व्यक्त करण्यात आली आहे. कर्णधार वनिंदू हसरंगा व फिरकी गोलंदाज माहीश तीक्षणा यांनी श्रीलंकन संघाच्या साखळी फेरीतील लढतींचे वेळापत्रक अन्यायकारक असल्याचे स्पष्ट मत व्यक्त करतानाच दोन लढतींदरम्यान प्रदीर्घ वेळ प्रवास करावा लागत असल्यामुळे एक सराव सामनाही रद्द करावा लागला असल्याची खंतही त्यांच्याकडून सांगण्यात आली आहे.

माहीश तीक्षणा याने वेळापत्रकावर आपले मत व्यक्त करताना म्हटले आहे की, आम्ही साखळी फेरीतील सामने चार भिन्न मैदानात खेळत आहोत. त्यामुळे प्रत्येक सामन्यानंतर आम्हाला किंचीतही विश्रांती मिळणार नाही. लगेचच मैदान सोडावे लागणार आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या लढतीआधी आम्हाला सरावही करता आला नाही, कारण हॉटेल ते सराव मैदान हे एक तास व ४० मिनिटांच्या अंतरावर होते. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या लढतीसाठी आम्हाला पहाटे पाच वाजता उठावे लागले, असेही तो पुढे आवर्जून म्हणाला.

आमच्यावर अन्याय

माहीश तीक्षणा याने इतर संघांच्या तुलनेत श्रीलंकन संघावर अन्याय होत असल्याचे परखड मत व्यक्त केले. तो म्हणाला, मी कोणत्याही संघाचे नाव येथे घेत नाही; पण काही संघ येथे न्यूयॉर्कमध्येच खेळणार आहेत. त्यांना सरावासाठीही तेच मैदान देण्यात आले आहे. त्यांचे हॉटेल मैदानापासून १४ मिनिटांवर आहे. आम्हालाही त्याच हॉटेलमध्ये वास्तव्य द्यायला हवे होते; पण तसे झाले नाही. आमच्या संघावर अन्याय होत आहे.

आयसीसीकडे तक्रार

श्रीलंकन क्रिकेट संघाचे व्यवस्थापक महिंदा हलानगोडा यांनी वेळापत्रकावरून आयसीसीकडे तक्रार केल्याचे वृत्त आहे. मात्र, आता स्पर्धा सुरू झाली आहे. त्यामुळे वेळापत्रकात बदल होण्याचे संकेत नाहीत.

श्रीलंकेच्या साखळी फेरीच्या लढती

  • ३ जून - दक्षिण आफ्रिका, न्यूयॉर्क

  • ८ जून - बांगलादेश, डल्लास

  • १२ जून - नेपाळ, लॉडरहिल

  • १७ जून - नेदरलँडस्‌, ग्रॉस आईसलेट

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Crime: स्वतःला देव समजणारा राक्षस! ३५० जणांना संपवलं, ११० अल्पवयीन मुलींचा समावेश, कारण... वाचा सर्वात कुख्यात सिरीयल किलरची कहाणी

त्याच्यावरून संस्कार नाही ठरत... रेणुका शहाणेंनी मांडलं मत; म्हणतात- काही जणी पदर घेतात पण इतक्या घाणेरड्या...

DMart Discount Offers : डीमार्टमध्ये सामान एवढं स्वस्त देणं मालकाला परवडतं कसं? डिस्काउंट ऑफरमागं आहे सिक्रेट..समोर आलं शॉकिंग कारण

Latest Marathi News Live Update : रबी हंगामातही पीएम किसान विमा योजना

Akshay Nagalkar Murder Case : बहुचर्चित अक्षय नागलकर खून प्रकरणातील ९ आरोपी अटकेत; मृतकाचे हाडांचे तुकडे, दोन देशी पिस्तुल अन् वाहनेही जप्त

SCROLL FOR NEXT