ICC's Team Of T20 World Cup 2024  sakal
Cricket

T20 World Cup 2024 : टी-20 वर्ल्ड कपमध्ये ICCचे झाले इतके कोटींचे नुकसान, बैठकीपूर्वी मोठा खुलासा

यावेळी अमेरिका आणि वेस्ट इंडिजमध्ये टी-20 वर्ल्ड कप 2024 चे आयोजन करण्यात आले होते.

Kiran Mahanavar

यावेळी अमेरिका आणि वेस्ट इंडिजमध्ये टी-20 वर्ल्ड कप 2024 चे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारतीय संघाने दक्षिण आफ्रिकेचा 7 धावांनी पराभव करत 17 वर्षांनंतर टी-20 वर्ल्ड कप जिंकला. आयसीसीने या स्पर्धेदरम्यान खूप पैसा खर्च केला.

क्रिकेटच्या इतिहासात पहिल्यांदाच अमेरिकेत आयसीसी टूर्नामेंटचे आयोजन करण्यात आले होते. आयसीसीला ही स्पर्धा हिट होण्याची पूर्ण अपेक्षा होती, पण आयसीसीच्या वार्षिक बैठकीपूर्वी टी-20 वर्ल्ड कपशी संबंधित एक मोठा खुलासा समोर आला आहे. खरं तर, अमेरिकेत खेळल्या गेलेल्या वर्ल्ड कप सामन्यांमध्ये आयसीसीला करोडोंचे नुकसान झाले आहे.

आयसीसीचे झाले मोठे नुकसान

यावेळी आयसीसी श्रीलंकेची राजधानी कोलंबो येथे वार्षिक बैठक आयोजित केली आहे. 19 जुलै ते 22 जुलै दरम्यान ही बैठक आयोजित होणार आहे. या बैठकीत अनेक मोठ्या मुद्द्यांवर चर्चा होणार आहे. ज्यावर क्रिकेट चाहत्यांच्या नजरा खिळल्या आहेत.

शुक्रवारी बोर्डाच्या बैठकीपासून सुरू होणाऱ्या आयसीसी परिषदेत यूएसमध्ये टी-20 वर्ल्ड कप सामने आयोजित करताना संस्थेला झालेल्या US$20 दशलक्षपेक्षा जास्त नुकसानाबद्दल चर्चा होण्याची अपेक्षा आहे. भारतीय रुपयांमध्ये आयसीसीचे हे नुकसान पाहिले तर ते 167 कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे.

टी-20 वर्ल्ड कपदरम्यान अनेक सामन्यांमध्ये स्टेडियम पूर्णपणे रिकामे दिसले. वेस्ट इंडिजमध्ये खेळल्या गेलेल्या सामन्यांदरम्यान स्टेडियममध्ये चाहत्यांची उपस्थिती असली तरी, अमेरिकेत खेळल्या गेलेल्या सामन्यांदरम्यान अनेक स्टँड भरले नसल्याचे दिसून आले.

वर्ल्ड कपदरम्यान अमेरिकेत स्पर्धेचे प्रमोशन योग्य पद्धतीने झाले नाही, असे मानले जाते. तिकिटाचे दरही खूप जास्त होते. त्यामुळे स्टेडियममध्ये चाहते कमी दिसले. याशिवाय आयसीसीने कोटय़वधी रुपये खर्चून अमेरिकेत नवे स्टेडियमही बांधले होते, मात्र भारताच्या सामन्याशिवाय ते स्टेडियम अन्य कोणत्याही सामन्यात भरलेले दिसले नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

केंद्रीय मंत्री मोहोळ यांच्या ताफ्याला ओव्हरटेक करणं भोवलं, ३२ वर्षीय तरुणावर गुन्हा दाखल; पुणे पोलिसांनी पाठवली नोटीस

Gold Rate Prediction: सोन्याचा भाव 2030 पर्यंत 2 लाखांच्या पुढे जाणार! काय आहे तज्ञांचा नेमका अंदाज?

Latest Marathi News Update : मनोज जरांगे मुंबईला निघताच समर्थक अन् नागरिकांची गर्दी

‘शरीरसंबंधाला नकार दिला तर मालिकेतून काढतात’; अभिनेत्रीच्या वक्तव्याने खळबळ, ७० हजारांच्या भाड्याचंही केलं भाष्य

Maratha Reservation: मनोज जरांगेंचा मुंबईकडे प्रवास सुरू; दोन वाहने आणि दोन रुग्णवाहिका सोबत, पाटोद्यात पहिला मुक्काम

SCROLL FOR NEXT