Team India Squad T20 World Cup 2024 News esakal
Cricket

Team India Squad T20 WC : शुभमन गिल अन् यशस्वी जैस्वालचा वर्ल्ड कप संघातून पत्ता कट? लवकरच होणार संघाची घोषणा

Who Will Opening With Rohit Sharma : आयपीएल 2024 नंतर लगेचच टी-20 वर्ल्ड कप 2024 खेळला जाणार आहे. त्यासाठी संघ मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात जाहीर करायचा आहे. त्यामुळे बीसीसीआयमध्ये बैठका सुरू झाल्या आहेत.

Kiran Mahanavar

Team India Squad T20 World Cup 2024 : आयपीएल 2024 नंतर लगेचच टी-20 वर्ल्ड कप 2024 खेळला जाणार आहे. त्यासाठी संघ मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात जाहीर करायचा आहे. त्यामुळे बीसीसीआयमध्ये बैठका सुरू झाल्या आहेत.

यंदाच्या वर्ल्ड कपसाठी टीम इंडियामध्ये कोण-कोणत्या खेळाडूंचा समावेश होणार हा प्रश्न आहे. दरम्यान, आयपीएल खेळणाऱ्या शुभमन गिल आणि यशस्वी जैस्वाल या दोघांपैकी एकाला वगळले जाऊ शकते, अशी बातमी आहे.

वर्ल्डकपमध्ये रोहित शर्मासोबत कोण ओपनिंग करणार हा मोठा प्रश्न आहे. मात्र या प्रश्नाचे उत्तर संघाची घोषणा होण्यापूर्वीच सापडले आहे. मुंबई इंडियन्सचा स्फोटक फलंदाज इशान किशन किंवा गुजरात टायटन्सचा कर्णधार शुभमन गिल रोहित शर्मासोबत ओपनिंग करताना दिसतील, अशी अटकळ बांधली जात होती, पण आता जे नाव समोर आले आहे ते आश्चर्यचकित करणारे आहे.

1 जूनपासून आयसीसी टी-20 वर्ल्ड कपला सुरुवात होत आहे. त्यादृष्टीने सर्वच संघांनी तयारी जोरात सुरू केली आहे. भारतीय संघही यामध्ये कोणाच्या मागे नाही. रोहित शर्मासोबत कोण ओपनिंग करताना दिसणार हे टीम सिलेक्टरने जवळपास ठरवलं आहे.

दैनिक जागरणच्या वृत्तानुसार, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूकडून सलामी करणारा विराट कोहली रोहितसोबत ओपनिंग करताना दिसू शकतो, असा दावा केला जात आहे. काही महिन्याआधी विराट कोहली संघात असणार का नाही यावरही प्रश्नचिन्ह होते.

अहवालात असा दावा केला जात होता की, भारतीय संघ निवडकर्ता विराट कोहलीला सलामीवीर म्हणून खेळवण्याचाही विचार करत आहे. यामुळे ईशान किशन, शुभमन गिल आणि इतर अनेक खेळाडूंना मोठा झटका बसला आहे, जे ओपनिंगचा दावा करत होते.

विराट कोहलीचा ओपनिंग करतानाचा विक्रम खूपच उत्कृष्ट आहे. किंग कोहली आरसीबीसाठी बऱ्याच काळापासून ओपनिंग करत आहे. या आयपीएल हंगामातही कोहलीने आतापर्यंत खेळलेल्या 7 सामन्यात 361 धावा केल्या आहेत. या कालावधीत त्याने 2 अर्धशतके आणि एक शतकही झळकावले आहे.

आरसीबीकडून सलामी करताना त्याने सर्वाधिक धावा केल्या आहेत. कोहलीने बेंगळुरूसाठी 105 डावात सलामी दिली आहे, ज्या दरम्यान त्याने 136.44 च्या स्ट्राइक रेटने 3972 धावा केल्या आहेत. विशेष म्हणजे या सामन्यांमध्ये कोहलीची सरासरीही 45.13 राहिली आहे. यावरून कोहली हाच सलामीचा सर्वोत्तम पर्याय असल्याचे स्पष्ट झाले आहे. याच कारणामुळे तो वर्ल्ड कपमध्ये रोहित शर्मासोबत ओपनिंग करताना दिसू शकतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पोलिस भरतीचे वेळापत्रक ठरलं! राज्यात १५,६३१ पोलिसांची भरती; वयोमर्यादा संपलेल्या ‘या’ उमेदवारांना एक संधी; अर्जासाठी ४५० ते ३५० रुपये शुल्क

Donald Trump: ट्रम्प यांच्या शपथविधीपूर्वीचे अपशकुन अन् दुर्याेधनाच्या जन्माची वेळ; भारतावरचं सर्वात मोठं संकट?

Rain-Maharashtra Latest Live News Update: गडचिरोलीत पुरामुळे अडकलेले विद्यार्थी प्रशासनाच्या तत्परतेने परीक्षेसाठी दिल्ली रवाना

CM Devendra Fadnavis : डेटा, एआय व क्वांटम कॉम्प्युटिंगमुळे उत्तम मनुष्यबळ निर्माण होणार

Selu News : पुरात वाहून गेलेल्या एकाचा मृतदेह सापडला; दुसऱ्याचा शोध सुरू

SCROLL FOR NEXT