Rohit Sharma Sakal
Cricket

Rohit Sharma Video: 'जेव्हा ICC स्पर्धा खेळातो, तेव्हा...', तब्बल नववा टी20 वर्ल्ड कप खेळण्याआधी रोहितने सांगितला अनुभव

T20 World Cup: रोहितने आत्तापर्यंत झालेले सर्व टी20 वर्ल्ड कप खेळले असून आता तो नवव्यांदा ही स्पर्धा खेळण्यासाठी उतरणार आहे.

Pranali Kodre

Rohit Sharma: टी20 वर्ल्ड कप 2024 स्पर्धेला वेस्ट इंडिज आणि अमेरिका येथे सुरुवात झाली असून या स्पर्धेत भारतीय संघ पहिला सामना बुधवारी (5 जून) खेळणार आहे. यंदाचे हे टी20 वर्ल्ड कपचे हे नववे पर्व आहे.

महत्त्वाचे म्हणजे या सर्व नऊही स्पर्धांमध्ये भारताचा कर्णधार रोहित शर्मा सहभागी झाला आहे. त्याच्या व्यतिरिक्त केवळ शाकिब अल हसनने असा पराक्रम केला आहे. याबद्दल आता रोहित शर्माने भाष्य केले आहे. तसेच प्रत्येक सामन्याआधी तो नर्व्हस का होतो, याबद्दलही खुलासा केला आहे.

आयसीसीने सोशल मीडियावर शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये रोहित म्हणाला, जेव्हा तुम्ही आयसीसी स्पर्धा खेळता, तेव्हा नेहमीच उत्सुकता असते आणि अशा स्पर्धा नेहमीच आव्हान घेऊन येतात.'

'मी जे टी20 वर्ल्ड कप खेळले आहेत, त्यात माझ्यासाठी काहीच बदलले नाही. मला नेहमीच वर्ल्ड कप जिंकायचा होता. मी प्रत्येक टी20 वर्ल्ड कप खेळला आणि त्याची मजा घेतली आहे.'

'टी20 वर्ल्ड कपबाबत माझी सर्वात पहिली कोणती गोष्ट लक्षात येत असेल, तर ती तो बॉल आऊट होता, जो पाकिस्तानविरुद्ध झालेला. हा पहिला बॉल आऊट खूप रोमांचक होता. आम्ही यासाठी सराव केला होता. प्रत्येकाला या सरावात सहभाग घ्यायचा होताय. तेव्हापासूनच टी२० क्रिकेटबाबत खेळाडूंमध्ये रस निर्माण झाला.'

साल 2007 च्या टी20 वर्ल्ड कपमध्ये भारताने पाकिस्तानविरुद्ध खेळलेल्या साखळी सामन्यात बॉल आऊटमध्ये विजय मिळवला होता. या सामन्यात निर्धारित षटकांनंतर बरोबरी झाल्याने बॉलआऊट घेण्यात आले होते, ज्याच भारताचा विजय झालेला.

दरम्यान, रोहितने पुढे सांगितले की तो प्रत्येक सामन्यापूर्वी नर्व्हस होतो. तो म्हणाला, 'इतके वर्षे खेळूनही मला असं वाटतं की प्रत्येक सामन्याआधी मी थोडा नर्व्हस होतो आणि मला विश्वास आहे की ही चांगली गोष्ट आहे. तुम्ही तेव्हाच नर्व्हस होता, जेव्हा काही मिळवायचे असते, हेच मला अनेक वर्षांपासून माहिती आहे.'

'प्रत्येकासाठी हे नैसर्गिक नसते. मला वाटते की अनुभव आणि कारकि‍र्दीत आलेल्या प्रत्येक चढ-उतारांनंतर तुम्ही खूप काही शिकता. आता मला माहित आहे की मला स्वत:ला कसे सांभाळायचे आहे, त्या परिस्थितीतून कसे बाहेर यायचे आहे. आमचे कर्तव्य आहे की येणाऱ्या पिढीलाही पुढे नेऊ.'

रोहित शर्मा भारताने विजय मिळवलेल्या 2007 टी20 वर्ल्ड कपचाही भाग होता. तसेच त्यानंतरही झालेल्या प्रत्येक टी20 वर्ल्ड कपमध्ये तो खेळला असून आता तो यंदा भारतीय संघाचे नेतृत्व करणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

High Court: बलात्काराच्या गुन्ह्यासाठी पुरुषाच्या जननेंद्रियाचा स्त्रीच्या जननेंद्रियात प्रवेश करणे आवश्यक; उच्च न्यायालयाचा निर्णय

Dumper Accident : भरधाव डंपरची आठ वाहनांना धडक; कात्रज ते वडगावदरम्यान महामार्गावर थरार

Mangalwedha News : 1650 अल्पभूधारक शेतकऱ्यांना मनरेगा योजनेचा लाभ देण्याची सुनंदा आवताडे यांची भरत गोगावले यांच्याकडे मागणी

Bike Accident : कात्रजमध्ये दोन दुचाकींच्या अपघातात एकाचा मृत्यू

Sewage Water Issue : पुणे शहरात ७० ठिकाणी पिण्याच्या पाण्यात मैलापाणी

SCROLL FOR NEXT